Lalita Panchami 2026: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra & Significance

Lalita Panchami 2026
Lalita Panchami 2026: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra & Significance

Lalita Panchami 2026: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra & Significance

15 ऑक्टोबर 2026 ललिता पंचमी तिथी, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मंत्र व महत्व

आता या ऑक्टोबर 2026 रविवार पासून नवरात्री आरंभ झाली आहे. 15 ऑक्टोबर 2026 गुरुवार ह्या दिवशी पाचवा दिवस आहे. नवरात्री मधील पाचवा दिवस महत्वाचा आहे. ह्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात.

प्रस्तावना: ललिता पंचमी खास का आहे?
हिंदू धर्मामध्ये देवी शक्ति उपासना खूप महत्वाची आहे. माता दुर्गा ची 9 दिवस 9 रूप आहेत त्यामधील ललिता त्रिपुर सुंदरी चे स्थान अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. त्रिपुर सुंदरीची आराधना ज्ञान, विवेक, करुणा, आध्यात्मिक चेतना व दिव्य शक्तिशी जुडली गेली आहे. शारदीय नवरात्री मध्ये येणारी ललिता पंचमीचे पर्व भक्तांना माताची भक्ति व साधना केल्याने आत्मिक उन्नती ची प्रेरणा मिळते.
ललिता पंचमी आश्विन मास शुल्क पक्ष पंचमी तिथीला साजरी करतात. ह्या दिवशी भक्त माता ललिता त्रिपुर सुंदरी ची पूजा अर्चा करतात. व परिवराच्या सुख-शांती, समृद्धी व कल्याण होण्यासाठी प्रार्थना करतात.

ललिता पंचमी कधी आहे?
15 ऑक्टोबर 2026 गुरुवार ह्या दिवशी ललिता पंचमी आहे. ही पर्व शारदीय नवरात्री मध्ये येते.
पंचमी तिथीचा प्रारंभ व समाप्ती स्थान पंचांग अनुसार पहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या शहराचा पंचांगचा उपयोग केला पाहिजे.

ललिता पंचमी शुभ मुहूर्त:
ललिता पंचमी ला पूजा करण्यासाठी पंचमी तिथीची उपयुक्त वेळ महत्वपूर्ण मानली जाते. शुभ मुहूर्त माहिती होण्यासाठी सूर्योदय, तिथी व पंचांग पहा.
भक्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून साफ वस्त्र परिधान करा. आपल्या परिवारातील परंपरा नुसार माताची पूजा केली पाहिजे. वेगवेगळ्या शहरात पूजेची वेळ वेगळी असते. म्हणूनच आपल्या शहराचा पंचांग पाहिला पाहिजे.

ललिता पंचमी (व्रत) तारीख 15 ऑक्टोबर, 2026 (गुरुवार)
पंचमी तिथि प्रारंभ 15 ऑक्टोबर, 2026 सकाळी 01:13 पासून
पंचमी तिथि समाप्त 16 ऑक्टोबर, 2026 सकाळी 03:25 पर्यंत
अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 पासून दुपारी 12:47 पर्यन्त

माता ललिता त्रिपुर सुंदरी कोण आहे?
माता ललिता त्रिपुर सुंदरीला शाक्त परंपरा व श्रीविद्या साधनाची प्रमुख देवी मानले जाते. तिला ललिता महात्रिपुरसुंदरी व राजराजेश्वरी ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते.

धार्मिक मान्यता अनुसार, माता ललिता परम शक्ति, दिव्य सौंदर्य, ज्ञान व चेतनाचे प्रतीक मानले जाते. तिची उपासना भक्तला शरीरातील सकारात्मक विचार , धैर्य, विनम्रता व विवेक विकसित करण्यासाठी प्रेरणा देते.

श्रीविद्या परंपरा मध्ये श्रीचक्रचे विशेष महत्व आहे. तिला देवी शक्तिचे पवित्र प्रतीक मानले जाते व तिची पूजा पारंपरिक विधी मुसार केली जाते.

ललिता पंचमी धार्मिक महत्व:
1. देवी शक्तिची आराधना: ललिता पंचमी ही देवी शक्तिच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी महत्वपूर्ण वेळ आहे. भक्त माता कडे साहस, सद्बुद्धि व जीवनात येणाऱ्या समस्याशी सामना करण्याची शक्ति मिळावी म्हणून प्रार्थना करू शकतो.

2. आध्यात्मिक उन्नति होण्यासाठी योग्य वेळ: ह्या दिवशी भक्त पूजा, मंत्रजाप व ध्यान करून आपले मन शांत करण्यासाठी व आध्यात्मिक जीवनावर ध्यान केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

3. श्रीविद्या परंपराशी संबंध: माता ललिता त्रिपुर सुंदरी ची उपासना श्रीविद्या परंपरा मध्ये विशेष स्थान आहे. ह्या परंपरामध्ये देवीची परम चेतना व सृष्टिची दिव्य शक्तिचे रूप समजले जाते.

ललिता पंचमी 2026 पूजा विधि:
ललिता पंचमीच्या दिवशी घरात सोप्या पद्धतीने व श्रद्धेने पूजा केली जाऊ शकते.

पूजा साहित्य:
माता ललिता त्रिपुरा सुंदरीचे चित्र किंवा फोटो, लाल किंवा गुलाबी रंगाचा कपडा, फुलांचा हार व फुले, कुंकू, चंदन व अक्षता, दीपक व तूप, धूप व अगरबत्ती, फळ, मिठाई व प्रसाद, साफ पाणी,

ललिता त्रिपुरा सुंदरी पूजा विधी:
सकाळी लवकर उठून स्नान करावे, साफ कपडे परिधान करावे. मग पूजेची जागा साफ करून चौरंग ठेऊन त्यावर माता ललिताचे चित्र किंवा फोटो ठेवावा.
मग दिवा लावावा व माताचे स्मरण करावे. आपल्या श्रद्धाने पूजा संकल्प करून परिवाराच्या सुख-शांती साठी प्रार्थना करावी.
माताच्या फोटोला कुंकू, अक्षता व हार, फूल अर्पित करून आपल्या परंपरा नुसार पूजेचे साहित्य अर्पित करावे.
मग माता ललिताचा श्रद्धेने मंत्र जाप करा. आपण आपल्या सुविधा नुसार 11, 21 किंवा 108 वेळा मंत्र जाप करू शकता.
नेवेद्य अर्पित करताना फळ, मिठाई व सात्विक भोजन अर्पित करा. मग देवीची आरती म्हणा.
पूजा झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटून सर्वाचे कल्याण होऊ दे म्हणून प्रार्थना करा. मग जरूरत मंद लोकांना दान करा.

माता ललिता त्रिपुराचा सोपा मंत्र:
ॐ श्री ललितायै नमः।

माताचे नामस्मरण सुद्धा करू शकता:
जय मां ललिता त्रिपुर सुंदरी।

काही भक्त ललिता पंचमीच्या दिवशी व्रत ठेवतात. ह्या दिवशी फलाहार करतात किंवा सात्विक भोजन करतात. व्रत करणे काही बंधन कारक नाही. तर संयम, श्रद्धा व सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत.

ललिता पंचमी व शारदीय नवरात्रीचा काय संबंध:
शारदीय नवरात्री देवी दुर्गा व त्यांच्या विविध शक्तिची आराधनाचे पर्व आहे. ललिता पंचमी ह्याच काळात साजरी केली जाते. व माता ललिता त्रिपुरा सुंदरीची उपासना विशेष महत्वाची मानली जाते.
हे पर्व भक्ताना आठवण करून देते की खरी आध्यात्मिक साधना पूजा पाठच्या बरोबर ज्ञान, करुणा, विनम्रता व सदाचारचे पण महत्वपूर्ण स्थान आहे.

ललिता पंचमी व्रत कोणत्या उद्देशसाठी ठेवले जाते?
ललिता पंचमीचे व्रत श्रद्धा, सौभाग्य, संतान सुख, वैवाहिक शांति व मानसिक संतुलनसाठी केले जाते. स्त्रिया हे व्रत विशेष रूपनी म्हणजे मातृशक्ति व परिवाराची मंगल कामना राहण्यासाठी करतात.

Lalita Panchami 2026

Lalita Panchami 2026: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra & Significance

परंपरागत मान्यता अनुसार देवी ललिता ची आराधना केल्याने पुढील भावाचे बळ मिळते.
• संतान प्राप्तिची कामना
• संतानचे स्वास्थ्य व दीर्घायु ची प्रार्थना
• दांपत्य जीवन मध्ये सौम्यता
• घरात सुख व शांति
• मनाची चंचलता कमी होते
• आत्मसम्मान व आंतरिक गरिमा
• विद्या, कला व वाणी मध्ये मधुरता
• आर्थिक जीवनमध्ये संतुलन

आपण व्रत करताना सकारात्मक विचार ठेवून केले पाहिजे त्यामुळे आपल्या आचरणात सुधारणा होते संतान संबंधित काही कठीण असेलतर त्याची सुधारणा होते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.