Guru Purnima 2026 Marathi | Ashadh Pournima Puja Vidhi | Lakshmi Krupa Upay | Shubh Muhurat
आषाढ पूर्णिमा (गुरु पूर्णिमा) पावन दिवशी भगवान विष्णु,चंद्रदेव व गुरुपूजन पूजाविधी, दान व लक्ष्मी कृपा उपाय
29 जुलै 2026 बुधवार ह्या दिवशी आषाढ पूर्णिमा आहे. ह्यालाच गुरुपूर्णिमा किंवा व्यास पूर्णिमा असे म्हणतात. आषाढ पूर्णिमा ह्यादिवशी गुरुपूजन, भगवान विष्णु, लक्ष्मी माताची पूजा व कुबेर भगवान ह्यांची पूजा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्याच बरोबर पूर्णिमा असल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने लक्ष्मी माताची कृपा मिळून धन-धान्यची प्राप्ती होते.
आषाढ पूर्णिमा हा दिवस भगवान विष्णुची आराधना , चंद्र देवाची पूजा, स्नान-दान व व्रत करणे शुभ मानले जाते. ह्याच तिथीवर महर्षि वेदव्यास ह्यांचा जन्म झाला होता. मान्यता आहेकी, आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी विधी पूर्वक पूजा अर्चा, व्रत व दान केल्याने भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होऊन चंद्र दोषा पासून मुक्ती मिळते.
आषाढ पूर्णिमा ह्या दिवसाला गुरुपूर्णिमा साजरी करतात. ह्या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूनची पूजा अर्चा मंत्र जाप व व्रत करतात. बरेच भक्त श्री स्वामी समर्थ किंवा शिर्डीचे साईबाबा ह्यांना आपले गुरु मानतात व सतत त्यांचे नामस्मरण करतात, गुरु पूर्णिमा च्या अगोदर बरेच भक्त शिर्डी पर्यन्त साई बाबांची पालखी वाजत गाजत पायी घेऊन जातात, किंवा अक्कलकोट पर्यन्त श्री स्वामी समर्थ ह्यांची पालखी वाजत गाजत पायी घेऊन जातात. गुरु पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या गुरूनची मनोभावे पूजा अर्चा व व्रत संकल्प करतात असे केल्याने गुरु आपल्या सर्व मनोकामना आपोआप पूर्ण करतात.
आषाढ़ पूर्णिमा 2026: शुभ मुहूर्त व तिथि:
वैदिक पंचांग नुसार,ह्या वर्षी आषाढ़ मास शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथि आरंभ व समाप्ती वेळ:
आषाढ़ पूर्णिमा व्रत: 29 जुलै 2026 (बुधवार)
पूर्णिमा तिथि प्रारंभ: 28 जुलै 2026 (मंगलवार) संध्याकाळी 06:18 मिनिट
पूर्णिमा तिथि समाप्ती: 29 जुलै 2026 (बुधवार) रात्रि 08:05 मिनिट
चंद्रोदय वेळ: 29 जुलै 2026 (बुधवार) संध्याकाळी 07:21 मिनिट
उदया तिथि अनुसार आषाढ़ पूर्णिमा व्रत, स्नान-दान व पूजा 29 जुलै 2026 (बुधवार) करायची आहे.
आषाढ़ पूर्णिमा पूजा विधि:
ब्रह्म मुहूर्त वर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे ते शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिक्स करून स्नान करावे. मग साफ वस्त्र परिधान करून व्रत व पूजा संकल्प करावा. एका तांब्याच्या लोटयामध्ये जल, लाल चंदन, अक्षता व लाल फूल टाकून भगवान सूर्य देवाला अर्ध्य अर्पित करावे.
मग पूजा घर साफ करून चौरंगावर पिवळे वस्त्र घालून त्यावर भगवान विष्णु व माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवान विष्णु ह्यांना चंदन, अक्षता, पिवळी फुले, तुळशी पत्र, फळ व पंचामृत अर्पित करावे. त्याच बरोबर मिठाई, फळ व पंचामृतचा भोग दाखवावा. तुपाचा दिवा व सुगंधित अगरबत्ती लावावी. मग पूर्णिमा व्रत कथाचे श्रद्धा पूर्वक पठन करावे.
मग शेवटी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची आरती करून महाप्रसाद वाटावा. संध्याकाळी चंद्रोदय च्या वेळी एका तांब्याच्या लोटयामध्ये जल, दूध, अक्षता व पांढरी फुले मिक्स करून चंद्र देवाला अर्ध्य अर्पित करावे. मग फलाहार किंवा सात्विक भोजन सेवन करावे
आषाढ पूर्णिमा च्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश व कुबेर देवाची पूजा व मनोकामना पूर्ण करणारे सटीक उपाय:
आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश व धनाचे देवता कुबेर ह्यांची उपासना करणे अत्यंत शुभ आहे. हा एक उपाय केल्याने घरात धनाचे आकर्षण होते.
आषाढ पूर्णिमा ह्या तिथीला देवी लक्ष्मीची उपासना व पूजा करून कमळाचे फूल अर्पित करावे. त्याच बरोबर भगवान विष्णु ह्यांची सुद्धा पूजा करावी. हा उपाय केल्याने घरात सुख-शांती व समृद्धी येते.
आषाढ पूर्णिमा मंत्र जाप:
आषाढ़ पूर्णिमा तिथि ला कमलगट्टे च्या जाप माळा घेऊन महालक्ष्मी माताचा पुढे दिलेला मंत्र जाप करावा.
मंत्र – ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः’ हा मंत्र जाप केल्याने घरात सुख समृद्धी येते.

घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा:
आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा. त्यामुळे घरात सकारात्मकता वाढते. धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन नेहमी कृपा ठेवते.
अन्न दान करावे: आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी गरीब व जरूरत मंद लोकांना अन्न दान करणे शुभ मानले जाते. अन्न दान केल्याने घरात धन-धान्य मुबलक प्रमाणात राहते. त्याच बरोबर अन्नपूर्णाची विशेष कृपा राहते.
वस्त्र दान करावे:
आषाढ़ पूर्णिमाच्या दिवशी जरूरतमंद लोकांना वस्त्र दान करावे. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते. त्याच बरोबर समाजात मान-सन्मान वाढतो.
धन दान करावे:
आपल्या आयपती नुसार गरीब व जरूरत मंद लोकांना धन दान करावे. धन दान केल्याने भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा मिळते. त्याच बरोबर धन-धान्यमध्ये वाढ होते.
अध्ययनशी जोडलया गेलेल्या वस्तु दान कराव्या:
आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी गुरु पूर्णिमा साजरी करतात. ह्या दिवशी जरूरतमंद मुलांना शालेय साहित्य, म्हणजे वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, शाळे साठी दपतर द्यावे त्यामुळे ज्ञान बुद्धि ची प्राप्ति होते.
पांढऱ्या वस्तुचे दान करावे:
आषाढ पूर्णिमा ह्या दिवशी पांढऱ्या वस्तुचे दान करावे:
पूर्णिमा ह्या दिवशी तांदूळ, साखर, व पांढऱ्या वस्तु दान कराव्या. त्यामुळे कुंडलीमधील चंद्राची स्थिति मजबूत बनते व चंद्र दोष दूर होतो.
