Give This Secret Gift to Married Women Before Adhik Maas Ends | Powerful Remedy for Good Fortune
अधिक मास संपत आला आहे, सुवासिनीना द्या गुप्त वाण संपूर्ण महिन्याचे पुण्य मिळेल अगदी पॉवरफूल उपाय आहे आपले सौभाग्य निरंतर राहण्यासाठी
17 मे पासून अधिक मास प्रारंभ झाला असून 15 जून 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. आध्यात्मिक दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा आहे. हअधिक मास हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे तसेच खूप पवित्र व पुण्यदायी आहे. अधिक मास लाच मालमस किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात हे आपल्याला माहिती आहेच.
अधिक मासमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणे शुभ आहे. तसेच आपल्या लेकीला व जावयाला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. अधिक मास मध्ये आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा आहे. पण आपल्याला माहिती आहे का धार्मिक मान्यता अनुसार ह्याच महिन्यात सुवासिनिना गुप्त वाण देण्याची प्रथा आहे. सुवासिनिना गुप्त दान दिल्याने अधिक मास च्या संपूर्ण महिन्याचे पुण्य आपल्याला लाभते. आता अधिक मास लवकरच समाप्त होत आहे त्यामुळे आता ज्यांचे कोणाचे वाण द्यायचे राहिले असेलतर अजून वेळ गेलेली नाही.
आता आपण अधिक मास मध्ये काय गुप्त दान द्यावे हे पाहूया:
अधिक मास हा धार्मिक मान्यता अनुसार पुण्यदायी मानला जातो. ह्या काळात दान, धर्म वाण देणे शुभ मानले जाते तसेच विवाहित महिलांना सौभाग्यवर्धक वस्तु देण्याची परंपरा आहे. अधिक मास मध्ये विवाहित स्त्रिया विवाहित मावशी, काकी, आत्या किंवा भाची ह्यांना आमंत्रण देवून त्यांना हळद-कुंकू देवून वाण देतात ही भेटवस्तुची नुसती प्रथा नाहीतर हा एक शुभ संस्कार आहे.
पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे वाण देणार ते आपण आपल्या पैशांनी खरेदी करून आणलेले द्यावे कोणी आपल्याला दिलेली वस्तु किंवा साडी वाण म्हणून देवू नये. तसेच अधिक मास मध्ये सुवासिनी जोडवी बदलतात. पण आपण आपल्यासाठी आणलेले जोडवी कोणाला देवू नये, द्यायची असतील तर त्यांना सोनारच्या दुकानात घेऊन जावे व दुसरी जोडवी घेऊन द्यावीत.
आता आपण पाहू या अधिक मास मध्ये सुवासिनीना काय वाण द्यावे:
धार्मिक मान्यता अनुसार अधिक मास शुभ कार्य, दान-धर्म, जप तप किंवा सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला आहे. त्यामुळे विवाहित महिला सौभगया अखंडित राहण्यासाठी व आपलीला घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी विवाहित महिलांना वाण देतात. आपण वाण म्हणजे साडी, हळद-कुंकू, सौभाग्य अलंकार, मिठाई, खोबरे, फळे किंवा पूजेचे साहित्य देवू शकता. पण प्लॅस्टिक वस्तु देवू नका धातूच्या वस्तु देणे योग्य आहे. पण गोष्ट लक्षात ठेवा वाण देताना प्रामुख्याने आपली मावशी, काकी, आत्या किंवा भाची आपली जवळची सुवासिन ह्यांनाच दिले जाते. आपण विवाहित महिलेची ओटी भरून सुद्धा भेट वस्तु देवू शकता.

अधिक मास मध्ये वाण देण्याचा मुख्य उदेश धार्मिक मान्यता अनुसार अधिक मास मध्ये केलेले दान किंवा सौभाग्यवर्धक वस्तु एक-मेकांना देणे म्हणजे पतीच्या दीर्घायुषासाठी, घरातील सुख-शांतीसाठी व आपली सौभगया वाढवण्यासाठी शुभ मानले जात किंवा फलदायी आहे. ह्या काळात विवाहित महिला एकमएकीना बोलावून वाण देतात त्यामुळे नात्यामद्धे गोडवा वाढतो व सामाजिक बंध मजबूत बनतात.
