अधिक मास 8 जून 2026 सोमवार कालाष्टमी का खास आहे, महत्व व सटीक उपाय
Adhik Maas Kalashtami 2026 | Rare Monday Yog on 8 June | Kaal Bhairav Puja, Remedies & Benefits
अधिक मास मध्ये जून 2026 सोमवार ह्या दिवशी येणारी अष्टमी खूप खास आहे. ही खास का आहे तर ती जेष्ठ अधिक मास मध्ये येत आहे. तसेच सोमवार ह्या दिवशी येणारी अष्टमीचे खूप महत्व आहे. सोमवारीच्या दिवशी अष्टमी ही वर्षातून फक्त एकदाच येते म्हणून तिचे महत्व जास्त आहे.
हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा भगवान विष्णु व भगवान शिव ह्याची कृपा प्राप्त होण्यासाठी खास महिना आहे. म्हणून अधिक मास मध्ये सोमवारी येणारी अष्टमी बाकीच्या दिवशी येणाऱ्या अष्टमी पेक्षा महत्वाची आहे.
हिंदू धर्मामध्ये कालाष्टमीचे व्रत हे विशेष महत्वाचे मानले जाते. दर महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथी साजरी केली जाते. ही तिथी भगवान शिवचे रुद्र स्वरूप काल भैरव ह्यांना समर्पित आहे. काल भैरव ह्यांना वेळ, न्याय व सुरक्षा देवता मानले जाते. पण आता जुन महिन्यात येणारी कालाष्टमी ही खास आहे ह्या दिवशी असा एक दुर्लभ संयोग बनत आहे. जो पूर्ण तीन वर्षानी एकदाच येत आहे.
चला तर मग पाहूया ही कालाष्टमीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी व लाभ काय आहे, तसेच कोणते सटीक उपाय केलेतर संकट निवारण होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल.
अधिक मास मधील कालाष्टमी का खास आहे?
कालाष्टमी भगवान शिव ह्यांचे रुद्र स्वरूप काल भैरव ह्यांना समर्पित आहे. काल भैरव आपल्या भक्ताची रक्षा करतात व जीवनात येणाऱ्या बाधा किंवा संकटे दूर करतात. ह्या दिवशी जप, तप, दान, व्रत व पूजापाठ केल्याने त्याचे फळ अधिक प्राप्त होते. भक्त ह्या दिवशी विशेष पूजा अर्चा करतात व काल भैरव भगवान ह्यांची आराधना करतात.
अधिकमास कालाष्टमी 2026 तिथि:
वैदिक पंचांग अनुसार जेष्ठ मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी 8 जून 2026 सोमवार सकाळी 3:24 मिनिटांनी प्रारंभ होत असून 9 जून 2026 मंगळवार सकाळी 3:23 मिनिटांनी समाप्ती होत आहे. व्रत करण्यासाठी उदय तिथी प्रदोश काल विशेष महत्वाचा मानला जातो. म्हणूनच कालाष्टमी व्रत व पूजा 8 जून 2026 सोमवार ह्या दिवशी करावयाचे आहे.
कालाष्टमीच्या दिवशी पूजा कशी करावी?
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून भगवान शिव व काल भैरव ह्याचे मनोमन ध्यान करावे. आपल्या घरातील देवघरात दिवा लावावा व फूल अर्पित करावी, फळ व मिठाई ठेवावी व ॐ काळभैरवाय नम: ह्या मंत्राचा जाप करणे शुभ मानले जाते. दिवसभर व्रत ठेऊन रात्री पूजा करावी.
कालाष्टमी व्रत महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार कालाष्टमी चे व्रत ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनातिल भय, शत्रू बाधा, व नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याच बरोबर मानसिक शांती, आत्मविश्वास व सकारात्मकता मध्ये वृद्धी होते. असे म्हणतात की मनोभावे काल भैरव ह्यांची पूजा अर्चा केल्याने विशेष कृपा प्राप्त होते व कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन सफलता प्राप्त होते. भगवान शंकर, भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केल्याने सुख समृद्धी येते.
अधिक मास कालाष्टमी सटीक उपाय कोणते करावे?
भगवान विष्णु ह्यांची पूजा तुळशी पत्रच्या बिना पूर्ण होणार नाही. आपल्याला काय करायचे 5 तुळशी पत्र घेऊन भगवान विष्णु ह्यांना अर्पित करावे व एक तुपाचा दिवा लाऊन “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जाप 11 वेळा मनोभावे करून आपली मनोकामना सांगावी त्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल, घरात आजारी व्यक्ति असेलतर तिचा त्रास कमी होईल व विवाह मध्ये अडचणी येत असतील तर दूर होतील.
धन प्राप्तीसाठी हळदीचा हा उपाय जरूर करा. धनाची देवी लक्ष्मी माता आहे. हळद ही पवित्र मानली जाते कोणते सुद्धा शुभ कार्य असलेतर हळद वापरली जाते. आपल्याला काय करायचे आहे तुळशीच्या रोपला एक चिमुट भर हळद अर्पित करायची आहे हळद अर्पित करताना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. त्यामुळे गरीबी दूर होईल, आर्थिक प्रगती होईल. हलदीचा चमत्कार आपल्याला लवकर दिसतो. हळदी मुले गुरु ग्रह प्रबळ होतो व भगवान विष्णु व भगवान महादेव प्रसन्न होतील.

आपल्या घराचे मुख्य दार हे शुभ मानले जाते. मुख्य दार पाहून लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. त्या साठी आपल्याला काय करायचे आहे थोडी हळद घेऊन त्यामध्ये थोडे पाण्याचे थेंब टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आहे त्या पेस्ट नि आपल्या घरातील तिजोरीवर स्वस्तिक काढायचे आहे, दुसरे स्वस्तिक देवघरात काढायचे आहे व दोन स्वस्तिक मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस काढायचे आहेत. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचा वास आपल्या घरात राहित व अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक प्रगती होईल.
अजून एक छान उपाय आहे आपल्याला 3 तुळशीची पाने घेऊन थोडी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे व एक पान घेऊन त्यावर एक हळदीचा टीका लावावा व ते पान भगवान श्री राम ह्यांना अर्पित करावे व बाकीची दोन पाने घेऊन त्यावर हळदीचा तिलक लाऊन एक तुपाचा दिवा व ही दोन पाने तुळशी जवळ ठेवावी त्यामुळे गृह क्लेश दूर होऊन सुख समृद्धी नांदेल व पितृ दोष सुद्धा निघून जाईल.
