Mrityu Panchak 2026: Avoid These 5 Mistakes from 6 to 11 June | Panchak Rules & Remedies

Mrityu Panchak 2026
Mrityu Panchak 2026: Avoid These 5 Mistakes from 6 to 11 June | Panchak Rules & Remedies

6 ते 11 जून 2026 मृत्यु पंचक | चुकूनही करू नका ही 5 कामे | मृत्यु पंचक नियम व उपाय | Adhik Maas 2026

Mrityu Panchak 2026: Avoid These 5 Mistakes from 6 to 11 June | Panchak Rules & Remedies

आता 6 जून 2026 शनिवार ते 11 जून 2026 गुरुवार ह्या काळात आपल्याला खूप सावधगिरी बाळगायची आहे. कारण की ह्या काळात मृत्यु पंचक लागत आहे. हा पंचक काळ खूप खतरनाक मानला जातो. ह्या  काळात  मृत्यु तुल्य कष्टा पासून वाचले पाहिजे त्यासाठी आपल्याला काही नियमांचे काटेकोर पणे पालन करायचे आहे.

सनातन धर्मा मध्ये आपल्याकडे कोणतेसुद्धा शुभ कार्य करण्याच्या अगोदर पंचांग, तिथी व नक्षत्र पाहण्याचे महत्व मानले जाते. ज्योतिष शास्त्रा नुसार पंचक काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जाते.

जून 2026 मध्ये पंचक 6 जून शनिवार संध्याकाळी 7:03 वाजता सुरू होत असून 11 जून, गुरुवार सकाळी 8:16 वाजता समाप्ती होत आहे. ह्या वेळी पंचकची सुरुवात शनिवार पासून सुरू होत आहे. म्हणून त्याला मृत्यु पंचक असे संबोधले आहे. धार्मिक मान्यता अनुसार  मृत्यु पंचकच्या काळात विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

आता आपण पाहू या पंचक म्हणजे काय? 

ज्योतिष शास्त्रा अनुसार जेव्हा चंद्र कुंभ व मीन राशीमध्ये गोचर करतो तेव्हा त्या वेळेला पंचक म्हंटले जाते. ह्या मध्ये पाच विशेष नक्षत्र येतात ते म्हणजे धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद व रेवती. असे मानले जाते की ह्या नक्षत्राच्या काळात केलेल्या कार्याचा प्रभाव सामान्य दिवसां तुलनेने अधिक असतो. म्हणूनच पंचक काळाला विशेष महत्व दिले जाते.

मृत्यु पंचकला संवेदनशील का मानले जाते? 

पंचक चे पाच प्रकार सांगितले जातात व शनिवार पासून आरंभ होणारा पंचक काळाला  मृत्यु पंचक असे म्हणतात. धार्मिक मान्यता अनुसार हा काळ शुभ कार्य किंवा मांगलिक कार्यासाठी अनुकूल मानला जात नाही. बरेच लोक ह्या काळात विवाह, गृह प्रवेश, घर बांधणी ह्या सारख्या नवीन कार्य करण्यास सुरुवात करीत नाहीत किंवा करू नये. असे म्हणतात की ह्या काळात कोणते सुद्धा शुभ कार्य केलेतर त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्याच बरोबर बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पंचक मध्ये मृत्यू च्या संबंधित काय मान्यता आहे? 

गरुड पुराण व ज्योतिष शास्त्रा नुसार जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू हा मृत्यु पंचक काळात झाला तर तो विशेष सवेदनशील मानला जातो. धार्मिक मान्यता अनुसार ह्या स्थितिमध्ये परिवरावर किंवा कुळावर काही संकट येऊ शकते. म्हणूनच अंतिम संस्कार करण्याच्या अगोदर काही विशेष धार्मिक अनुष्ठान व शांती कर्म करण्याची परंपरा सांगितली आहे. असे मानले गेले आहे की पुढील उपाय केलेतर संभावित दोष निवारण होऊ शकते व मृत आत्माच्या शांती साठी प्रार्थना केली जाऊ शकते. तसेच आपण धार्मिक विश्वास व दृष्टिकोण ठेऊन समजले पाहिजे.

मृत्यु पंचक 6 जून ते 11 जून ह्या काळात आहे ज्योतिष शास्त्रा नुसार हा काळ खूप अशुभ मानला गेला आहे.  मृत्यु पंचकह्या काळात चुकून सुद्धा पुढील 5 कामे करू नका.

ज्योतिष शास्त्रा नुसार पंचक पाच दिवसांचे असते व ह्या काळात नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव अधिक असतो. म्हणून पुढे दिलेली कार्य करण्यापासून वाचले पाहिजे.

निर्माण कार्य: निर्माण कार्य म्हणजे घराचे बांधकाम सुरू करू नये किंवा ह्या काळात घराचे स्लॅब टाकणे सुद्धा अशुभ मानले जाते.

Mrityu Panchak 2026
Mrityu Panchak 2026: Avoid These 5 Mistakes from 6 to 11 June | Panchak Rules & Remedies

लाकडी काम: घरातील फर्निचर करणे किंवा फर्निचरसाठी लाकड आणणे सुद्धा टाळावे.

दक्षिण दिशेच्या बाजूला प्रवास करणे टाळावे: ह्या पाच दिवसांत दक्षिण दिशेची यात्रा किंवा प्रवास टाळावे. अगदीच नाईलाज असेलतर प्रवास करावा.

बेड बनवणे किंवा पलंग बनवणे: पंचक ह्या काळात नवीन बेड बनवणे अशुभ मानले आहे.

अंतिम संस्कार: असे म्हणतात की पंचक काळामध्ये कोणचा सुद्धा मृत्यू झाला तर दोष लागतो. त्यासाठी एक उपाय महणजे पाच पुतळे बनवून त्याचा दाह-संस्कार करावा.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता अधिक मास चालू आहे. अधिक मास हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. ह्या पवित्र मास मध्ये पूजापाठ, मंत्र जाप अधिक प्रमाणात केला जातो. अधिक मास मध्ये आपण 33 वतींचा उपाय जरूर करावा आपण ह्या अगोदर 33 वातीनचा दिवा कसा लावावा ह्यांची संपूर्ण माहिती पाहिली आहे. येथे बोल्ड लेटरच्या लिंकवर आपण क्लिक करून पाहू शकता.

आपण 33 वाती घेऊन तुपामध्ये किंवा तेलामध्ये बुडवून वाती लावाव्या. आपण हा दिवा आपल्या घरातील देव्हाऱ्याच्या समोर दिवा लाऊन देवांना ओवाळावे व 33 बत्तासे किंवा 33 अनारसे नेवेद्य म्हणून दाखवावे. मग आपल्या मनातील मनोकामना सांगावी नक्की पूर्ण होईल.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.