Kuldevi Oti Ritual During Adhik Maas | Must Know Rules and Mistakes to Avoid

Adhik Mass 2026
Kuldevi Oti Ritual During Adhik Maas | Must Know Rules and Mistakes to Avoid

अधिक मास संपण्यापूर्वी कुलदेवीची ओटी भरा, ओटी का भरायची,साहित्य, ओटीच्या साहित्याचे काय करावे व ओटी भरताना 1 चूक करू नका.

Kuldevi Oti Ritual During Adhik Maas | Must Know Rules and Mistakes to Avoid

17 मे 2026 रविवार अधिक मास सुरू झाला असून 15 जून 2026 सोमवार समाप्ती होत आहे. अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे. तसेच अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. ह्या महिन्यात भगवान विष्णु ह्यांची पूजा, सेवा, मंत्रजाप, व्रत व दानधर्म केले जाते.

अधिक महिन्यात 33 ह्या अंकाला खूप महत्व आहे. पौराणिक मान्यता अनुसार आपल्या हिंदू संस्कृतिमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे असे म्हणतात. अधिक मास मध्ये दीप दानाचा अर्थ आहे “अंधकार वरती प्रकाशाचा विजय”
आपण जेव्हा 33 वतींचा एक दिवा असे 33 दिवे लावतो तेव्हा ते दिवे 33 कोटी देवी-देवताना समर्पित आहेत. असे केल्याने सर्व देवी-देवतांची दिव्य शक्तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मास हा दर 3 वर्षानी एकदा येतो.

अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे, ह्या मध्ये भगवान विष्णु ह्यांची पूजा करणे फलदायी आहे. रोज “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करावा. त्यामुळे मानसिक शांती मिळून जीवनात सकारात्मकता येईल. त्याच बरोबर विष्णु सहस्त्रनाम, विष्णु चालीसा, श्रीमद्भागवत ह्याचे पठन करणे शुभ आहे. दान-पुण्य करणे विशेष महत्वाचे आहे. जरूरत मंद लोकांना अन्न, जल, वस्त्र व फळ, पुस्तक दान करावी. तसेच शक्य असेलतर पवित्र नदीमध्ये स्नान करावे. किंवा घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. त्याच बरोबर आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नती करणे शुभ मानले जाते. आवल्याच्या झाडाच्या खाली बसून जेवण करावे.

अधिक मास मध्ये 33 वस्तु दान कराव्या कारणकी 33 कोटी देव आहेत म्हणून 33 वस्तु दान कराव्या. ह्या महिन्यात मुलीला व जावयाला घरी जेवायला बोलवावे 33 अनारसे द्यावे, जावई म्हणजे लक्ष्मी नारायणचे रूप मानले जाते.

अधिक मास मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे खूप शुभ मानले आहे. कारणकी कुलदेवी आपल्या परिवाराचे रक्षण करते, आपल्या परिवाराचे संकटापासून, दुखा पासून रक्षण करते. आपल्या कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे आपल्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे. तिची मनोभावे सेवा करणे. तिचा मान राखणे. आपण आपल्या कुलदेवची ओटी घरातील आपल्या देव्हाऱ्यात म्हणजे कुलदेवीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर किंवा टाका समोर घरी सुद्धा भरू शकता किंवा आपल्या घराच्या जवळ आपल्या कुलदेवीचे देऊळ असेलतर किंवा तुळजा माताच्या मंदिरात जाऊन सुद्धा ओटी भरू शकता. कुलदेवी ही आदिशक्तीचे रूप मानलेले आहे.

आज आपण कुलदेवीची ओटी का भरावी, कधी भरावी, ओटी भरताना कोणते साहित्य घ्यावे, ओटी भरल्यावर साहित्याचे काय करावे तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे विधवा स्त्रिया कुलदेवीची ओटी भरू शकतात का? ह्याची संपर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

1. अधिक मास मध्ये आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी?
अधिक मास मध्ये भगवान विष्णु ह्याची पूजा अर्चा मंत्र जाप केले जातात कारणकी अधिकमास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. पण अधिक मास धार्मिक व आध्यात्मिक दृष्ट्या खूप पवित्र आहे म्हणून ह्या महिन्यात कुलदेवीची ओटी भरणे खूप शुभ मानले जाते. कारणकी हा एक कुळाचार चा एक भाग आहे.
कुलदेवी आपल्या कुटुंबाचे रक्षण व कल्याण करते तसेच आपल्या संपूर्ण वंशाचे रक्षण करते तिच्या कृपेने घरात सुख, शांती व आरोग्य व समृद्धी येते. कुलदेवीची नियमित सेवा केल्याने व तिची ओटी भरल्याने घरातील कुलदोष किंवा पितृ दोष दूर होतो. तसेच देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. देवीची कृपा आपल्या परिवरावर राहावी व आपले कल्याण व्हावे म्हणून कुलदेवीची ओटी अधिक मास मध्ये जारून भरावी.

2. कुलदेवीची ओटी अधिक मास मध्ये कधी भरावी?
अधिक मास हा धार्मिक दृष्टीचे व आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्यामुळे संपूर्ण अधिक मास मध्ये आपण कधी सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता. पण मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पूर्णिमा किंवा एकादशी ह्या दिवशी ओटी भरणे अत्यंत शुभ आहे. कारणकी हे वार देवी माताचे आहेत. पण अमावस्या ह्या दिवशी कधी सुद्धा देवीची ओटी भरू नये.

3. कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या वस्तु घ्याव्या
कुलदेवीची ओटी भरताना प्रथम एक स्टीलचे ताट घ्यावे प्लॅस्टिक चे ताट आजिबात घेऊ नये. ओटी भरताना आपण नऊवारी साडी किंवा सहा वारी साडी घेऊ शकता पण जमत नसेलतर ब्लाऊजपीस सुद्धा घेऊन शकता. साडी किंवा ब्लाऊज पीस किंवा खण घ्यावा पण तो सूती किंवा रेशमी असावा. साडी ही लाल रंगाची, हिरव्या रंगाची, केशरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची असावी, काळ्या किंवा निळ्या रंगाची नसावी.

कुलदेवीची ओटी भरण्याच्या अगोदर स्नान करून साफ कपडे परिधान करून मग देवीची पूजा करून घ्यावी. मग एक स्टीलचे किंवा तांब्याचे ताट घेऊन त्यामध्ये प्रथम साडी ठेवून त्यावर ब्लाऊज पीस ठेऊन त्यावर नारळ ठेवावा (नारळाची शेंडी देवीच्या फोटो किंवा मूर्तीच्या दिशेनि पाहिजे) मग हळद-कुंकू, तांदूळ, लेकुरवाळी हळकुंड, बदाम, सुपारी, 5 फळ, शृंगाराचे साहित्य (टिकली, कंगवा, मेंदी, बांगड्या) घ्यावे.

ओटी भरताना ओटीच्या साहित्याचे ताट आपल्या छातीच्या बरोबरीने घेऊन मग कुलदेवीची ओटी भरावी. कुलदेवीची ओटी भरून झाल्यावर देवी माताला एक वास्तु अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे विडयाचे पान (विडयाचे पान ठेवताना त्यामध्ये चुना किंवा सुपारी आजिबात घालू नये) त्यालाच तांबूल असे म्हणतात.

कुलदेवीची ओटी भरताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ओटी भरतानाचे साहित्य आपण आपल्या पैशांनी खरेदी करून घ्या, कोणी दिलेले सामान वापरू नका, देवी आपण ओटी मध्ये काय ठेवतो ते पहात नाहीतर आपण किती श्रद्धेने ओटी भरत आहोत ते पहाते त्यामुळे त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होते.

4. कुलदेवीची ओटी भरताना ही चूक करू नका नाहीतर देवी नाराज होईल, ती चूक म्हणजे शृंगाराचे साहित्य ठेवताना त्यामध्ये लिपस्टिक, काजळ किंवा कोणते सुद्धा मेकअपचे साहित्य ठेवू नका. तसेच कोणी दिलेली वस्तु सुद्धा ठेवू नका.

5. कुलदेवीची ओटी भरल्यावर त्याचे काय करावे?
आपण कुलदेवीच्या मंदिरात जाऊन ओटी न भरता घरीच आपल्या देवघरात कुलदेवीची ओटी भरणार असाल तर भरू शकता. ओटी भरल्यावर साहित्य मधील नारळ त्याचा आपण एखादा गोड पदार्थ बनवू शकता, फळ घरी सेवन करू शकता, तांदळाचा आपण भात बनवू शकता. ओटीतील साडी व ब्लाऊज पीस आपण एका स्वछ जागी ठेवून नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीच्या मंदिर मध्ये जाऊन तेथे ठेऊ शकता किंवा कोणत्या विवाहित स्त्रीची ओटी भरू शकता.

Adhik Mass 2026
Kuldevi Oti Ritual During Adhik Maas | Must Know Rules and Mistakes to Avoid

6. अधिक मास मध्ये कुलदेवीची ओटी फक्त विवाहित स्त्री भरू शकते का? का विधवा स्त्री सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते?

हिंदू धर्मा नुसार विवाहित स्त्री ओटी भरू शकते कारणकी हा विधी सौभाग्य व निर्मिती साठी जोडला गेला आहे त्यामुळे पती शिवाय ओटी भरणे शास्त्रात वर्ज मानले आहे. पण घरात काही मासिक अडचण असली किंवा अजून काही अडचण असली तर अविवाहित मुलगी सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते.

पण असे वाटते की असे का? विधवा स्त्री सुद्धा एक स्त्री आहे तिने का कुलदेवीची ओटी भरू नये. कुलदेवीतर परिवाराचे रक्षण करते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.