Adhik Maas 2026 | How to Celebrate Son-in-Law Rituals & Traditions
जावयाचे महत्व त्याला वाण काय द्यावे सोन्या-चांदी पेक्षा मौल्यवान 3 वस्तु द्या सुख-शांतीसाठी
17 मे 2026 रविवार पासून अधिक मास चालू झाला असून 15 जून 2026 सोमवार पर्यन्त आहे. अधिक मास हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. अधिक मास मध्ये भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा व मंत्र जाप करतात. त्यामुळे घरात सुख-शांती लाभते व मनोकामना पूर्ण होतात.
अधिक मास मध्ये जावयाला खूप महत्व असते. जावयाला भगवान विष्णु ह्यांचे रूप मानले जाते व लेकीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणजेच लेक व जावयाला लक्ष्मी-नारायणाचे रूप मानले जाते. आपण लेक व जावयाचा अधिक मास म्हणजेच धोंडयाचा महिना लग्न झाल्यावर पहिला अधिक मास येतील तेव्हा थाटामाटाने सजरा करतात मग आपण पुढे सुद्धा 5 वर्षे अधिक मास साजरा करू शकतो. जर आपल्याला मुलगी नाही तर आपण पुतणी किंवा भाचही व जावयाला बोलवू शकता.
अधिक मास मध्ये 33 ह्या अंकाला खूप महत्व आहे. आपण डायरेक्ट 33 असे म्हणण्या आयवजी 30 अधिक 3 असे म्हणावे. 33 ह्या अंकाचा अर्थ असा होतो 30 म्हणजे अधिक मास चे 30 दिवस, 31 वा अंक म्हणजे लेकीच्या घरी जेवले असेलतर त्याचा दोष लागू नये, 32 म्हणजे गुरूंच्या किंवा ब्राह्मणाच्या घरी जेवल्याचा दोष व 33 म्हणजे लेकीच्या घरी सूतक काळात जेवलेतर दोष
आता आपण पाहू या जावयाचा व लेकीचा अधिकमास कसा साजरा करायचा:
अधिक मास सुरू झाला की एखादा चांगला दिवस पाहून जावयाला-लेकीला व लेकीच्या सासारच्याना अधिक मासचे रीतसर आमंत्रण द्यावे. आपण त्यांना जेवणाच् सुद्धा आमंत्रण देवू शकता.
अधिकमास जावयाचे वाण त्यासाठी तयारी काय करायची. चांदीचे किंवा तांब्याचे तबक त्यामध्ये हळद-कुंकू, अक्षता, पान-सुपारी, 5 आंबे, 33 अनारसे, किंवा बत्तासे किंवा मैहसुर पाक ठेवावे (फक्त जाळी असलेला पदार्थ पाहिजे ह्या तिन्ही पदार्थाला जाळी असते. मग जावयासाठी कपडे टॉवेल टोपी सोन्याची अंगठी किंवा चांदीची एखादी वस्तु किंवा चांदीचे निरांजन व पितळ्याचे निरांजन द्यावे.
मुलीसाठी साडी-ब्लाऊजपीस तांदूळ, नारळ, फळ ओटी भरण्यासाठी द्यावा. त्याच बरोबर चांदीचा कुंकुचा करंडा घ्यावा किंवा एखादी चांगली भेट वस्तु घ्यावी. सासरच्या लोकांसाठी सुद्धा एखादी भेट वस्तु घ्यावी.
अधिक मास म्हणजेच धोंडयाचा महिना आहे तर स्वयंपाक करताना पुरणाचा स्वयंपाक करावा पुरणाचे धोंडे बनवतात. आपली ही सर्व पूर्व तयारी झाली आता आपण जावयाचे स्वागत व जावयाची पूजा कशी करायची ते पाहू.
आपण ज्या दिवशी लेक व जावयाला बोलावले आहे त्यादिवशी घर छान साज करून मग सजवावे दरवाजा समोर रंगीत रांगोळी काढावी. तसेच पाटा भोवती सुद्धा छान रांगोळी काढावी जवायला पूर्वे कडे तोंड करून पाटावर बसवून जवायला कुंकू अक्षता लाऊन निरंजनाने ओवाळावे मग ताटात अनारसे, किंवा बत्तसे किंवा माहीसुर पाक, चांदीचा दिवा किंवा चांदीची भेट वस्तु ठेवून झाकून मग द्यावे. मग जावई ते ताट उघडून पाहिल. मग जवयाला कपडे, टॉवेल-टोपी द्यावी.
मग मुलीला पाटावर बसवावे तिला हळद-कुंकू, अक्षता लाऊन ओवाळावे व तिची ओटी भरावी. सासरच्या लोकांना सुद्धा एखादी भेट वस्तु द्यावी.
मग जेवायचे आमंत्रण द्यावे, ताटा भोवती रांगोळी काढून आग्रह करून जेवण वाढावे.
आता पहा अधिक मास मध्ये आपण जावयाला व लेकीला सोन्या चांदीची वस्तु घेतो पण ते प्रतेक जणाला द्यायला जमेलच असे नाही आपण आपल्या आयपती प्रमाणे एखादी चांदीची वस्तु द्यावी. छोटे चांदीचे निरंजन दिले किंवा तांब्या पितळाची एखादी वस्तु दिली तरी चालेल.

मला वाटते आपण सोन्या चांदीच्या पेक्षा मौल्यवान गुप्त वस्तु देवू शकता ती कोणतीतर ते आता आपण पाहू या. पुढील तीन वस्तु त्या त्यांच्या कडे कायम स्वरूपी राहू शकतात कपडे दिलेतर ते काही दिवसांनी जून होतात सोने चांदीची वस्तु आपण नेहमी वापरू शकत नाही, तर आता पाहू या त्या कोणत्या 3 वस्तु मौल्यवान आहेत.
पहिली वस्तु म्हणजे श्रीमद भगवत गीता किंवा विष्णु सहस्त्र नामावली द्यावे ते आपल्या लेकीच्या संसारासाठी सुरक्षा कवच चे काम करील , हे दान केल्याने पुण्य सुद्धा मिळते.
दुसरी वस्तु म्हणजे सुख-समृद्धीचा अक्षय कलश त्याने ज्ञान वाढते, लक्ष्मीचा वास राहतो, सकारात्मक ऊर्जा येते. तांब्याचा कलश वाण म्हणून दिल्याने सूर्य प्रबळ होतो. समाजात प्रतिष्ठा वाढते. आपण तांब्याचा कलश, दिवा, समई किंवा भांडे सुद्धा देवू शकता.
तिसरी वस्तु म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा महत्वाची आहे ती म्हणजे दीपदान व त्याच बरोबर 30+3 अन्नदान करा. त्याच बरोबर आपल्या जावयाचा सन्मान करून कृतज्ञतेचे एक पत्र देवून त्याचे कौतुक करा आपल्या मनातील भावना व्यक्त करा लेकी बदल कौतुक करा तुम्ही आम्हाला मुला सारखे आहात तुमच्या बद्दल आम्हाला आदर वाटतो व तुमच्याशी बोलताना आनंद वाटतो. हल्लीह्या काळात जावयाला आर-तुरे व नवाणी संबोधले जाते त्या आयवजी आदराने त्यांचे नाव घ्या हे आपल्या जवायाला नक्कीच आवडेल व ते सुद्धा आपल्याला मान देतील.
