Adhik Maas 2026: How to Fill Mother’s Oti? What If Mother Is Not Alive or Widowed?

Adhik Maas 2026 How to Fill Mother’s Oti
Adhik Maas 2026: How to Fill Mother’s Oti? What If Mother Is Not Alive or Widowed?

अधिक मास आईची ओटी कशी-कधी भरावी? आई नसेलतर? मुलगी विधवा असेलतर?

Adhik Maas 2026: How to Fill Mother’s Oti? What If Mother Is Not Alive or Widowed?

17 मे 2026 रविवार पासून अधिक महिना सुरू होत असून 15 जुन 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. अधिक मास हा धार्मिक दृष्टीने खूप महत्वपूर्ण मानला जाते. अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णु ह्यांना समर्पित आहे. अधिक महिन्यालाच धोंडयाचा महिना किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात. अधिक मास मध्ये भगवान विष्णुची भक्ति, मंत्र जाप, दान-पुण्य व आत्मचिंतन करण्यासाठी खूप श्रेष्ट मानला आहे. अधिक मास हा दर टी वर्षानी एकदा येतो.

आपल्याला माहीत आहे का? हिंदू कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालींवर आधारित आहे.
सूर्य वर्ष हे 365 दिवसांचे असते तर चंद्र वर्ष हे 354 दिवसांचे असते. ह्यामधील फरक म्हणजे 11 दिवसांचा आहे. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. ह्या वर्षी खास असे आहे की अधिक मास मध्ये जेष्ट मास पण आहे. त्यामध्ये अधिक मास हा 30 दिवसांच्या आयवजी 60 दिवसांचा आहे.

अधिक मास मध्ये विष्णु भगवान ह्यांचा मंत्र “ॐ नमो भगवते वासुदेवाय” रोज 108 वेळा जाप करावा, त्याच बरोबर त्याच बरोबर विष्णु सहस्त्रनाम, विष्णु चालीसा, श्रीमद्भागवत ह्याचे पठन करणे शुभ आहे. आपण अधिक महिन्यात सत्यनारायण पूजा करू शकता.

अधिक मास मध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ आहे. जास्तीत जास्त दान धर्म करावे, अधिक मास मध्ये 33 वस्तु दान कराव्या तर 33 वस्तुच का तर 33 कोटी देव आहेत त्यामुळे 33 ह्या आकड्याला खूप महत्व आहे. अधिक मास मध्ये आनारसे ला खूप महत्व आहे. ह्या महिन्यात लेकीला व जावयाला घरी बोलवतात जावई मध्ये नारायणाचे रूप मानले जाते.

आपण ह्या अगोदरच्या टेक्स्ट किंवा विडियो मध्ये आपण अधिक मास बद्दल संपूर्ण माहीत बघितली आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक मास मध्ये आईची ओटी कशी भरायची का भरायची जर आई नसेलतर कोणाची ओटी भरायची, जर आई विधवा असेलतर किंवा मुलगी विधवा असेलतर आईची ओटी कशी भरायची ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Adhik Maas 2026 How to Fill Mother’s Oti
Adhik Maas 2026: How to Fill Mother’s Oti? What If Mother Is Not Alive or Widowed?

अधिक मास मध्ये मुलीने आईची ओटी भरणे हे शुभ, धार्मिक व भावनिक दृष्टीने महत्वाचे आहे. आपल्या जीवनात आईचे स्थान हे मोठे आहे. आपल्या आईसाठी, तिच्या सन्मानासाठी, तिच्या दीर्घ आयुष्यसाठी आपण तिची ओटी भरून तिच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपली आई आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या इछा बाजूला ठेवून सतत काम करीत असते.

आईची ओटी विवाहित मुली किंवा अविवाहित मुली सुद्धा भरू शकतात. अधिक मास मध्ये संपूर्ण महिन्यात कधी सुद्धा ओटी भरू शकता, पण मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पूर्णिमा ह्या दिवशी भरणे उत्तम आहे. आईची ओटी भरताना आपण तांदूळ, खण, नारळ, पान-सुपारी, शक्य असेलतर अनारसे किंवा एखादा गोड पदार्थ घ्यावा, बदाम, सुपारी, लेकुरवाळे हळकुंड, हिरव्या बांगड्या, कंगवा, शृंगारचे सामान घ्यावे, जर शक्य असेलतर आईसाठी साडी घेऊन तीचा सन्मान करावा, कारण साडी घेणे शुभ आहे. आईला हळद-कुंकू लाऊन तिची ओटी भरावी व तिच्या आरोग्यासाठी, दीर्घायुषसाठी प्रार्थना करावी. हिरव्या बांगड्या घेणे खूप शुभ आहे कारण की हिरवा रंग सौभगयचे प्रतीक आहे.

आपली आई नसेल किंवा आई विधवा असेलतर आपण आपली मावशी, मोठी किंवा छोटी बहीण, जाऊची किंवा आत्याची ओटी भरावी. जर मुलगी विधवा असेलतर आपल्या आईची ओटी आपण घरातील विवाहित महिले कडून भरावी.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की सुनेनी कधी सुद्धा सासूची ओटी भरू नये, कारण की सासूच्या ओटीतल्या मुला बरोबर आपले लग्न झालेले असते.

अधिक मास मध्ये कोणते सुद्धा शुभ कार्य, ग्रह प्रवेश, वास्तु शांती, नामकरण विधी, दुकानाचे किंवा शोरूमचे उद्घाटन करू नये, तसेच लग्न, मुंज, साखरपुडा ह्या सारखे विधी करू नयेत.

अधिक मास मध्ये भगवान विष्णु ह्यांची आराधना करावी, मंत्र जाप करावा, सात्विक भोजन करावे, ब्रह्मचार्यचे पालन करावे, खोटे बोलू नये, निंदा करू नये, सकाळ संध्याकाळी देवा जवळ दिवा लावावा, तुळशीच्या रोपाला रोज पाणी घालावे व दिवा लावावा फक्त रविवारी पाणी व दिवा लाऊ नये.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.