May 5 Angarki Chaturthi 2026 Marathi Puja Vidhi Vrat Rules and Salt Modak Secret

May 5 Angarki Chaturthi 2026
Angarki Chaturthi Salt Modak Upay

“अंगारकी चतुर्थी 2026 ला हा एक उपाय केलात तर तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते!”

“अंगारकी चतुर्थीला केलेला हा एक छोटा उपाय तुमची मोठी इच्छा पूर्ण करू शकतो… पण त्यात एक गुपित आहे—मिठाचा मोदक!”

5 मे 2026 मंगळवार एकदंत अंगारकी चतुर्थी आहे.अंगारकी चतुर्थी गणेश भगवान ह्यांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्व पूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये श्री गणेश जीनची पूजा विशेष महत्वाची मानली जाते. दर महिन्यात कृश पक्ष चतुर्थी ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. पण अंगारकी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदाच येते. तसेच मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी मानली जाते जी अत्यंत शुभ व दुर्लभ मानली जाते.

संकष्टी तिथी 5 मे 2026 मंगळवार
चतुर्थी तिथी प्रारंभ: 5 मे सकाळी 5:24 मिनिट
चतुर्थी तिथी समाप्ती 6 मे सकाळी 7:51 मिनिट
चंद्रोदय: रात्री 10:22 मिनिट

एकदंत संकष्टी चतुर्थी महत्व:
संकष्टी चतुर्थी व्रत सूर्योदय पासून सुरू होते ते रात्री चंद्रोदय पर्यन्त असते.
चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांची मनोभावे पूजा केली जाते. पौराणिक कथा अनुसार महाभारत लिहण्यासाठी भगवान गणेश ह्यांनी आपला एक दात त्याग केला होता ही त्याग व कर्तव्यनिष्ठा चे प्रतीक मानले जाते. ह्यादिवशी व्रत केल्याने भगवान गणेश लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात.

ज्योतिष शास्त्रा नुसार हा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो. ह्या दिवशी व्रत केल्याने चंद्र दोष, मानसिक तनाव, आर्थिक परेशानी व शत्रू भय पासून मुक्ती मिळते. जर आपण बऱ्याच काळा पासून कोणत्या तणावा खाली असाल तर भगवान गणेश आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत करतात.

पूजा विधी:
ब्रह्म मुहूर्त वर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गणेशजीनच्या फोटो ची पूजा करावी, गणेशजीनची मूर्ती असेलतर अभिषेक करून हाल-कुंकू, अक्षता, लाल फूल, 21 दूर्वाची जुडी, धूप, दीप अर्पित करावे, नेवेद्य म्हणून त्यांचे आवडतीचे मोदक दाखवावे, अथर्वशीर्ष म्हणावे, गणेशस्तोत्र म्हणावे. संपूर्ण दिवस उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर दिवा आगरबती लाऊन पूजा आरती करावी नेवेद्य दाखवून मग व्रत सोडावे.

आपण नियमीन दर महिन्याला चतुर्थी व्रत करत असाल पण नजर चुकीने जर आपला चतुर्थी व्रत मोडले असेलतर तर आपण अंगारकी चतुर्थी ह्या दिवसा पासून परत चतुर्थी व्रत करू शकता.
आपल्या काही मनकामना असतील व त्या पूर्ण होण्यास खूप अडचणी येत असतील तर अंगारकी चतुर्थी च्या दिवशी आपण आपली मनोकामना बोलून संकल्प करून शकता, गणपती बाप्पा आपली मनोकामना 100% पूर्ण करील.

May 5 Angarki Chaturthi 2026
Angarki Chaturthi Salt Modak Upay

मिठाच्या चतुर्थीचे व्रत नियम:
आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मग ती कोणती सुद्धा असो, जसे की आर्थिक परिस्थिति, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे, पुत्र प्राप्ती, किंवा नोकरी व्यवसाया संबंधित अडचणी किंवा अजून काही त्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे तो म्हणजे मिठाचे मोदक.

आपल्याला काय करायचे आहे चतुर्थीच्या दिवशी आपण एक संकल्प करून आपली मनोकामना सांगून आपण 11चतुर्थी किंवा 21 चतुर्थी व्रत करणार आहोत असा संकल्प करावा, त्यासाठी आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर 21 मोदक चा भोग दाखवायचा आहे. 21 मोदक पैकी 20 मोदक गूळ-खोबरे घालून बनवायचे व एक मोदकच्या सारणात थोडे मीठ घालून बनवायचा आपण सर्व मोदक बनवून तळून घ्यावे. मिठाचा मोदक असा वेगळा ठेवायचा नाही तो बाकीच्या मोदकांमद्धे मिक्स झाला पाहिजे.

आता आपण व्रत सोडताना एक-एक मोदक सेवन करायचा आहे जो पर्यन्त मिठाचा मोदक आपण सेवन करीत नाही तो पर्यन्त मोदक सेवन करायचे, काही वेळेस 2 किंवा 3 मोदक सेवन केल्यावर पुढचा मोदक मिठाचा लागला तर पुढचे मोदक सेवन करायचे नाही तर बाकीचे राहिलेले मोदक गाईला सेवन करायला द्यायचे आहेत. म्हणजे तात्पर्य काय मिठाचा मोदक सेवन करे पर्यन्त मोदक सेवन करायचे मिठाचा मोदक लागला की मोदक खाणे बंद करावे.

आपण 11 किंवा 21 चतुर्थी मिठाच्या मोदकाचा उपाय केल्यावर गणपती बापाना नेवेद्य दाखवून उद्यापन करावे. आपल्या मनोकमाना नक्की पूर्ण होतील हा खूप प्रभावी उपाय आहे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.