Vikat Sankashti Chaturthi 2026 Puja Vidhi,Mahatw, Upay, Mantra In Marathi

Vikat Sankashti Chaturthi 2026
Vikat Sankashti Chaturthi 2026 Puja Vidhi,Mahatw, Upay, Mantra

संकष्टी चतुर्थी तिथी, चंद्रोदय, महत्व, पूजाविधी, मुलांसाठी करा सोपे उपाय व सटीक मंत्र

Vikat Sankashti Chaturthi 2026 Puja Vidhi,Mahatw, Upay, Mantra In Marathi

विकट संकष्टी चतुर्थी चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी 5 एप्रिल 2-26 रविवार ह्या दिवशी आहे. हा पर्व भगवान गणेश ह्यांना समर्पित आहे. हिंदू धर्मा मध्ये भगवान गणेश ही प्रथम पूज्य देवता मानले जातात. असे म्हणतात की त्यांची आराधना केल्याने सर्व दुख निवारण होऊन सर्व बाधाची मुक्ती होते. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता असे म्हणतात.

विकट संकष्टी चतुर्थी 2026: तिथि व मुहूर्त:
तिथि: 5 एप्रिल 2026, रविवार
चतुर्थी तिथि प्रारंभ: सकाळी 11:59 वाजता (5 एप्रिल)
चतुर्थी तिथि समाप्त: दुपारी 2:10 बजे (6 एप्रिल)
संकष्टी चतुर्थी चंद्रोदय – रात्रि 09:58 वाजता

पूजा सामग्री: भगवान गणेश फोटो किंवा मूर्ती, अक्षता, रोली, चंदन, कुमकुम, दूर्वा, धूप, अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा, कलश, मौली, सुपारी, गंगाजल, कपूर, आरती ची थाली, फूल, फल, लड्डू किंवा मोदक

पूजा विधि:
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत संकल्प करा.
पूजेची जागा स्वछ करून त्यावर चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड अंथरा व त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. मूर्ती किंवा फोटोवर गंगाजल शिंपडा, हळद-कुंकू, अक्षता, चंदन, फूल व फळ अर्पित करा, तुपाचा दिवा लावून आगरबती लावा. 21 दूर्वा व लाल रंगाचे जास्वंदीचे किंवा लाल गुलाबाचे फूल अर्पित करा, किंवा झेंडूचे फूल अर्पित केले तरी चालेल. असे करताना “ॐ गं गणपतये नमः” ह्या मंत्राचा जाप करा. अथर्वशीर्ष जरूर म्हणावे त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. मग लाडू किंवा मोदकाचा नेवेद्य दाखवून गणपती बाप्पाची आरती म्हणा, संपूर्ण दिवस उपवास करून रात्री चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करून आरती म्हणून भोग दाखवून मग उपवास सोडावा.

फूल: भगवान गणेश ह्यांना लाल रंगाचे जास्वंदीचे फूल किंवा लाल गुलाबाचे फूल किंवा झेंडूचे फूल अर्पित करणे शुभ मानले जाते.

शुभ रंग: ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. हा रंग उत्साह व ऊर्जाचे प्रतीक मानले जाते.

Vikat Sankashti Chaturthi 2026
Vikat Sankashti Chaturthi 2026 Puja Vidhi,Mahatw, Upay, Mantra

भगवान गणेशजी मंत्र:
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्॥
ॐ लम्बोदराय नमः॥
ॐ गं गणपतये नमः॥
ॐ श्री गणेशाय नमः॥
ॐ नमो भगवते गजाननाय. ॐ वक्रतुण्डाय हुं॥
ॐ हीं श्रीं क्लीं गौं गः श्री महागणधिपतये नमः॥
हीं श्रीं क्लीं गौं वरमूर्तये नमः. ॐ गं गणपतये नमः॥

संकष्टी चतुर्थी महत्व:
संकष्टीचा अर्थ आहे संकटाला हरवणारा. असे म्हणतात की संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मानसिक शांती प्राप्त होऊन, अडकलेली कामे मार्गी लागतात. ज्योतिष शास्त्रा नुसार ह्या दिवशी पूजा केल्याने कुंडली मधील बुध व केतू दोषचा प्रभाव कमी होतो. त्याच बरोबर संतान प्राप्तीचे सुख प्राप्त होते.

संकष्टी चतुर्थीला चुकून सुद्धा ही कामे करू नयेत:
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, हिंदू धर्मा मध्ये कोणत्या सुद्धा शुभ दिनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करीत नाहीत.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र देवाला अर्ध्य देण्याची परंपरा आहे. एका तांब्याच्या कलशामद्धे जल, दूध, अक्षता घेऊन अर्ध्य द्या, अर्ध्य देताना एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ध्य देताना जल आपल्या पायावर पडता कामा नये. ते अशुभ मानले जाते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुळशी पत्र आजिबात वापरायचे नाही. धार्मिक मान्यता अनुसार भगवान गणेश ह्यांना दूर्वा अर्पित करणे शुभ मानले जाते.

संकष्टी चतुर्थी सटीक उपाय:
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांच्या समोर 2 सुपारी व 2 इलायची ठेवून विधी पूर्वक पूजा करा. असे केल्याने भगवान गणेश ह्यांची कृपा प्राप्त होऊन अडकलेली कामे पार पडतात.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड अंथरूण त्यावर श्रीयंत्र स्थापित करा. त्याच्या वर एक सुपारी ठेवून श्रीयंत्राची व सुपरीची पूजा करून दोन्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने आपली आर्थिक स्थिति मजबूत बनते.

चंद्राला अर्ध्य देताना पाण्यात, लाल चंदन, फूल, कुश, व अक्षता मिक्स करून मग अर्ध्य द्या, असे केल्याने घर-परिवारात सुख-शांती येते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.