22 जानेवारी 2026 गुरुवार माघ गणेश चतुर्थी गणेश जयंती व्रत शुभ मुहूर्त महत्व सटीक मंत्र
Magh Vinayak Chaturthi Ganesh Jayanti 2026 Shubh Muhurat, Mahatva, Mantra In Marathi
माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी, संकष्ट किंवा संकटा चौथ असे म्हणतात. ह्या दिवशी गणेश पूजन, तीळ दान, तिळाचे लाडूचा भोग दाखवतात. तसेच गणेश रुद्राक्ष घालावे त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.
22 जानेवारी 2026 गुरुवार ह्या दिवशी विनायकी चतुर्थी आहे ह्याच दिवशी गणेश जयंती सुद्धा आहे म्हणजे गणेश जन्म आहे. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा केली जाते. विनायकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांची विधी पूर्वक पूजा करून व्रत केले जाते. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा केल्याने भक्ताला सुख, समृद्धीची प्राप्ती होऊन भक्तांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
गणेश विनायकी चतुर्थी शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सुरुवात 22 जानेवारी पहाटे 2:44 सुरू होत असून समाप्ती 23 जानेवारी 8:23 आहे. म्हणून विनायक चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती 22 जानेवारी 2026 लाच आहे.
विनायक चतुर्थी पूजा शुभ मुहूर्त:
माघ महिन्यातील विनायक चतुर्थी 22 जानेवारी गुरुवार सकाळी 11:29 मिनिट पासून 1:37 मिनिट पर्यन्त पूजेचा चांगला शुभ मुहूर्त आहे. विनायक चतुर्थी चंद्र दर्शन सकाळी 9:22 मिनिट ते रात्री 9:19 मिनिट आहे तेव्हा चंद्र दर्शन वर्जित आहे.
विनायक चतुर्थी पूजा विधि:
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश ह्यांचे ध्यान करावे.
मग पूजेची जागा साफ करून चौरंग ठेवून वस्त्र घालून गणेश भगवान ह्यांची प्रतिमा ठेवावी.
भगवान गणेश ह्यांची प्रतिमा ठेवल्यावर जल, अक्षता, चंदन, फूल, धूप, दीप व दूर्वा अर्पित कराव्या. भगवान गणेश ह्यांना 21 दूर्वाची जुडी व लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे.
भगवान गणेश ह्यांची पूजा झाल्यावर भगवान गणेश ह्यांच्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा.
श्री गणेश भगवान ह्यांचा मंत्र जाप झाल्यावर आरती म्हणून नेवेद्य दाखवावा.
विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांच्या साठी संपूर्ण दिवस व्रत ठेवावे मग संध्याकाळी नेवेद्य दाखवून व्रत सोडावे.
विनायक चतुर्थी महत्व:
प्रतेक महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असते. ह्या दिवशी प्रथम पूज्य भगवान गणेश ह्यांची पूजा केल्याने साधकाच्या जीवनातील साऱ्या अडचणी दूर होऊन भगवान गणेश ह्यांच्या कृपेने सर्व काम मार्गी लागतात. असे म्हणतात की जी व्यक्ति ह्या दिवशी व्रत ठेवून मनोभावे पूजा अर्चा करेल तिला धन व सौभाग्य मिळून त्याच बरोबर बुद्धी व विकासाची प्राप्ती होते. ह्या दिवशी व्रत केल्याने आत्मबल मध्ये वृद्धी होते.
रवि योग गणेश जयंती:
गणेश जयंतीच्या दिवशी रवी योग सकाळी 7:14 मिनिट सुरू होत असून दुपारी 2:27 मिनिट पर्यन्त आहे. हा एक शुभ योग आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारचे दोष निघून जातात. भगवान गणेश ह्यांची पूजा रवी योग मध्ये करावी.
रवी योगच्या व्यतिरिक्त ह्या दिवशी वरियान योग सकाळ पासून संध्याकाळी 5:38 मिनिट पर्यन्त आहे. त्यानंतर परीघ योग सुरू होईल. गणेश जयंतीच्या दिवशी शतभिषा नक्षत्र पहाटे पासून दुपारी 2:27 मिनिट पर्यन्त आहे. मग भाद्रपद नक्षत्र आहे.

गणेश जयंती ह्या दिवशी भद्रसाया:
गणेश जयंती ह्या दिवशी भद्रची सावली आहे. म्हणून सकाळी शुभ काम होणार नाही. पण पूजा करताना कोणती सुद्धा बाधा येणार नाही. पूजा मुहूर्त झाल्यावर भद्र चालू होणार आहे. गणेश जयंती ह्या दिवशी भद्रा दुपारी 2:40 मिनिट पासून 23 जानेवारी 2:28 मिनिट पर्यन्त आहे.
पौराणिक कथा नुसार गणेश जीनचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता. म्हणून ह्या दिवशी गणेश जयंती साजरी करतात. ह्या दिवशी व्रत व मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात व संकट दूर होतात.
शुभ मुहूर्त (Sakat Chauth 2026 Shubh Muhurat)
ब्रह्म मुहूर्त- सकाळी 5:26 मिनिट ते 8:21 मिनिट
अभिजीत मुहूर्त- दुपारी 12:06 मिनिट ते 12:48 मिनिट पर्यन्त
विजय मुहूर्त- दुपारी 2:11 मिनिट ते दुपारी 2:53 मिनिट पर्यन्त
गोधूली मुहूर्त- संध्याकाळी 5:36 मिनिट ते 6:04 मिनिट परेनत
अमृत काल- सकाळी 10:46 मिनिट ते 12:17 मिनिट पर्यन्त
सर्वार्थ सिद्धि योग- सकाळी 7:15 मिनिट ते 12:17 मिनिट पर्यन्त
विनायकी चतुर्थी चंद्रोदय रात्री 8:54 मिनिट आहे.
रात्री चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करून जल घेऊन अर्ध्य द्या. एका लोटयामध्ये जल, गंगाजल,कचे दूध, पांढरे तीळ, फूल घालून अर्ध्य द्या. मग चंद्राची पूजा करून धूप व तुपाचा दिवा लावून ओवाळा मग नेवेद्य दाखवा.
गणेश मंत्र:
1. ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥
2. ऊँ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥
3. ॐ गं गणपत्ये नम:
