3 जानेवारी पौष पूर्णिमा, चुकून सुद्धा ह्या चुका करू नका, माता लक्ष्मी वर्षभर नाराज राहील
3 January 2026 Paush Purnima Full Information In Marathi
3 जानेवारी 2026 शनिवार ह्या दिवशी पौष पूर्णिमा आहे. ह्याच दिवसाला शाकंभरी पूर्णिमा असे सुद्धा म्हणतात ह्या दिवसा पासून माघ स्नान आरंभ करतात. तसेच ह्या दिवशी शाकंभरी नवरात्री सुद्धा समाप्ती होत आहे.
पौष पूर्णिमा आरंभ 2 जानेवारी शुक्रवार संध्याकाळी 6:54 मिनिट
पौष पूर्णिमा समाप्ती 3 जानेवारी शनिवार दुपारी 3:33 मिनिट
पौष पूर्णिमा हिंदू धर्मामध्ये खूप महत्वपूर्ण तिथी मानली जाते. ह्या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते. पौष पूर्णिमा ह्या दिवशी स्नान-दान व पूजेचे खूप महत्व आहे. 3 जानेवारी 2026 शनिवार ह्या दिवशी नवीन वर्षातील पहिली पूर्णिमा आहे.
पौष पूर्णिमा ह्या दिवशी एक छोटीशी चूक खूप महागात पडू शकते, त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होऊन संपूर्ण वर्ष आर्थिक तंगीला सामोरे जाऊ लागू शकते. म्हणूनच ह्या दिवशी काही कामे करण्या पासून दूर राहिले पाहिजे. आपण काही चुकीची कामे केलीतर आपल्याला नकारात्मक ऊर्जाचा सामना करून आपली धन हानी होऊ शकते.
आता आपण पाहू ऊयाय की कोणती चुकीची कामे केली तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील?
1. सूर्योदयच्या नंतर झोपेतून उठणे- आपली किस्मत म्हणजेच नशीब नाराज होऊ शकते.
पौष पूर्णिमा ह्या दिवशी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठले जरुरीचे आहे. सूर्योदयच्या नंतर उठल्याने सूर्य देव व माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे आपले नशीब नाराज होऊ शकते व संपूर्ण वर्ष भर आळस व परेशानी वाढू शकते.
पौष पूर्णिमा ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठावे, स्नान करून पूजा करावी. त्यामुळे सूर्य देवाची ऊर्जा मिळून दिवसाची सुरुवात शुभ होते. म्हणूनच खूप उशिरा पर्यन्त झोपू नये त्यामुळे धन व स्वास्थ वर परिणाम होऊ शकतो.
2. भांडण-तंटे पासून दूर रहा:
पूर्णिमाच्या दिवशी घरात क्लेश, भांडण किंवा वाद-विवाद करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. परिवारात मतभेद किंवा क्रोध केल्याने आर्थिक तंगी व नाते संबंध बिघडू शकतात. पूर्णिमा ह्या दिवशी विचार करून बोलावे व शांत राहावे, कोणाशी विवाद करू नये त्यामुळे घरात सुख-शांती राहून माता लक्ष्मीची कृपा मिळेल, चुकून सुद्धा राग-राग किंवा क्रोध करू नका त्यामुळे वर्षभर परेशानी येऊ शकते.

3. मसालेदार भोजन सेवन करू नका:
पौष पूर्णिमा ह्या दिवशी सात्विक भोजन करावे,तामसिक भोजन, मास, दारू, आल-लसूण-कांदा सेवन करू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन करियर मध्ये अडचणी येऊ शकतात, धन हानी व स्वास्थ समस्या येऊ शकतात. पूर्णिमा ह्या दिवशी फळ, दूध, भात ह्यासारखा आहार सेवन करावा. तानसिक भोजन केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते व पुण्य नष्ट होते. ही चूक करू नये नाहीतर संपूर्ण वर्ष धन व सुख ह्याची वृद्धी होणार नाही.
4. कर्ज घेवू नये किंवा देवू नये:
पूर्णिमा ह्या दिवशी कर्ज घेऊ नये किंवा देवू नये ते अशुभ आहे. त्यामुळे आर्थिक स्थितिवर वाईट परिणाम होऊण धनाचा प्रवाह थांबू शकतो व माता लक्ष्मीच्या कृपा पासून वंचित राहू शकता. पूर्णिमा ह्या दिवशी दान-पुण्य करा, पण कर्ज घेणे किंवा देणे टाळा. अशी चूक केलीतर धन हानी पासून वाचू शकता व बिघडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
पूर्णिमा ह्या दिवशी वरील सांगितलेल्या चुका करण्या पासून दूर राहिले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण वर्ष बरकत ठेवेल, स्नान, दान व पूजा करा, सात्विक रहा त्यामुळे सुख समृद्धी व शांती मिळेल.
