पौष महिना महत्व, पौष महिन्यात काय करावे-काय करू नये? समज-गैरसमज कोणते?
विवाह, विवाह बोलणी, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्य करावे का?
Poush Mahina Mahatva, Kaay Karawe-Karunya? Samaj-Gairsamaj Konte? In Marathi
पौष महिना 21 डिसेंबर 2025 रविवार पासून सुरू होत असून 19 जानेवारी 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्त होत आहे. भाकड महिना सुद्धा म्हणतात.
पौष महिना हा हिदू पंचांग नुसार 10 वा महिना आहे. ह्याची सुरुवात मार्गशीर्ष अमावस्या झाल्यावर होते. पौष महिना हा चांगला नाही असे म्हणतात कारणकी ह्या महिन्यात कोणते सुद्धा शुभ कार्य, नवीन व्यवहार केले जात नाही. विवाह किंवा विवाह बोलणी, गृह प्रवेश व वास्तु शांती केली जात नाहीत असे म्हणतात. पण नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे तर ते करू नये जर पहिलेच बांधकाम सुरू झाले असेलतर तर ते सुरू ठेवावे फक्त एव्हडेच पाळावे. पण ह्यामध्ये काही अंधश्रद्धा सुद्धा आहेत.
धार्मिक दृष्टीने पौष महिना अत्यंत पवित्र मनाला जातो. ह्या महिन्यात धर्मिक कार्य करू शकतो माघ स्नान सुरू करू शकतो. ह्या महिन्यात शिवलिंग वर संपूर्ण महिना अभिषेक करू शकतो. ह्या महिन्यात पितरांसाठी शांती व दान सेवा करणे फलदायी आहे. पौष महिना हा विशेष म्हणजे सूर्य देवशी जोडला गेला आहे. म्हणून ह्या महिन्यात सूर्य देवाची आराधना करणे अत्यंत पवित्र मानले जाते. पौष महिन्यात सूर्य उपासना केल्याने सौभाग्य व स्वास्थची प्राप्ती होते. ह्या महिन्यात भागवत कथा, रामायण, पाठ, जप-तप व सत्संग केल्याने पापनाश होतो.

पण विवाह करणे अगदी जरुरीचे असेलतर नक्षत्र पाहून गुरुजीन कडून माहिती करून घ्यावी किंवा पंचांग पहावा. पंचांगमध्ये जर विवाह मुहूर्त दिले असतील किंवा वास्तुशांती गृह प्रवेश मुहूर्त दिले असतील तर करावे.
पौष महिन्यात काही प्रमुख व्रत आहेत, सफला एकादशी, संकष्टी चतुर्थी, मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत, व पौष अमावस्या ही विशेष महत्वाची आहे.
पौष महिन्यात नवीन इंग्लिश कॅलेंडर नुसार वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती 14 जानेवारी ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती हा सण महिलांचा अगदी आवडीचा सण आहे.
पौष महिन्यात काय करावे?
* पौष महिन्यात सकाळी स्नान करून एका तांब्याच्या लोटयामध्ये जल, हळद-कुंकू, अक्षता व लाल फूल घालून सूर्य देवाला अर्ध्य द्यावे, अर्ध्य देताना ॐ सूर्याय नम: ह्या मंत्राचा जाप करावा. त्यामुळे रोग नाश होतो व मान-सन्मान वाढतो.
*पौष महिन्यात प्रतेक रविवारी सूर्य नारायणचे व्रत केले जाते ते आपण प्रतेक रविवारी करू शकता.
* पौष महिन्यात शाकंबरी देवीची उपासना केली जाते. म्हणजेच शाकंबरी देवीची नवरात्री साजरी केली जाते.
* पौष महिन्यात रोज नियमित आदित्य हृदय स्तोत्र चे पठन करावे. ह्या स्तोत्रची पठन केल्याने जीवनातील कष्ट कमी होण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.
* पौष महिन्यातील अमावस्या, संक्रांती, पूर्णिमा व एकादशी तिथीला श्रद्धा, तर्पण व दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पितृ दोष दूर होऊन जीवनातील परेशानी कमी होतात.
* संपूर्ण पौष महिन्यात श्री हरी विष्णुची पूजा करा, मंदिरात दान-पुण्य करा, भगवान विष्णु व माता लक्ष्मी दोघाची कृपा मिळेल.
पौष महिन्यात काय करू नये?
* पौष महिन्यात खर म्हणजे जप-तप केले जाते. म्हणून ह्या महिन्यात मांसाहार किंवा दारू पिणे योग्य नाही.
* ह्या काळात वांगी, मुळा, मसूरडाल, उडीदडाळ, किंवा फूलकोबी सारखे भोजन सेवन अशुभ मानले जाते.
* पौष महिन्यात ताजी फळ, भाज्या, दूध, दही व शुद्ध सात्विक भोजन करणे उत्तम मानले जाते. तामसी किंवा मसालेदार जेवण करू नये.