संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी 15 नियम पाळले तर नक्की महालक्ष्मी माताची कृपा मिळेल
Margashirsha Mahina Mahilanni 15 Niyam Palave In Marathi
मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ व पवित्र मानला जातो, आपण श्रावण महिन्यात जशी भगवान शंकर ह्यांची पूजा अर्चा करतो तसेच मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केली जाते.
मार्गशीर्ष महिन्यात कधी 4 गुरुवार येतात किंवा कधी 5 गुरुवार येतात, त्या प्रमाणे आपण पूजा करायची आहे. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप चांगला महिना आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या प्रथम गुरुवार पासून कलश मांडून व्रत करायचे आहे असे चारही गुरुवारी करायचे आहे व संध्याकाळी कहाणी वाचून आरती करून नेवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका व महिलांना घरी हळदी-कुंकूसाठी बोलवून त्यांना एक एक काहणीचे पुस्तक द्यायचे आहे. मार्गशीर्ष गुरुवारी असे केल्याने घरात सुख-समृद्धी-शांती राहते व महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आपण ही व्रत फक्त मार्गशीर्ष गुरुवारी किंवा संपूर्ण वर्षभर सुद्धा करू शकता.
मार्गशीष महिना ह्या वर्षी 21 नोव्हेंबर 2025 पासून प्रारंभ होत असून 20 डिसेंबर 2025 शनिवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे.
पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025
दूसरा गुरुवार 04 डिसेंबर 2025
तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025
चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025
लक्ष्मी माताची कृपा नेहमी आपल्यावर राहावी, तिचा सहवास नेहमी आपल्या घरात रहावा आपला संसार सुख समधानाचा व्हावा म्हणून मार्गशीष महिन्यातील गुरवारचे हे व्रत दरवर्षी करावे किंवा जमल्यास वर्षभर सुद्धा करावे.
मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी पुढील नियम जरूर पाळावेत:
1) मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपल्या घरातील फरशी पुसू नये, आधल्या दिवशीच फरशी पुसून घ्यावी, फक्त पूजेची जागा गंगाजल शिंपडून पुसून घ्यावी.
2) मार्गशीर्ष महिन्यात रोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे मनोभावे पूजा अर्चा करावी. घरातील वातावरण शांत ठेवावे.
3) आपण रोज सकाळी स्नान करताना पाण्यात एक चिमूट हळद टाकावी त्यामुळे आपले मन, शरीर, आत्मा, शुद्ध व पवित्र होतो, आपण पाण्यामध्ये गंगाजल सुद्धा टाकू शकता, त्यामुळे उपवास केल्याचे फळ प्राप्त होते.
4) गुरुवार ह्या दिवशी कधी सुद्धा आपले केस धुवू नयेत जरी आपला उपवास असला तरी धुवू नये. आपण बुधवारिच आपले केस धुवून घ्यावे, कारण की गुरुवारी केस धुतले तर आपल्या कुंडली मधील गुरु ग्रह नाराज होतो व आपल्या मुला बाळाची प्रगती थांबते. तसेच केस कापू नये किंवा नख सुद्धा कापू नयेत.
5) मार्गशीर्ष महिन्यात रोज सकाळी घरातील एका व्यक्तिने सूर्याला अर्ध्य द्यावे, कारण की आपल्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक तेने होते व संपूर्ण दिवस चांगला जातो.
6) गुरुवारी आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा, उंबरट्यावर हळदीचे लेपन करा, जर हळदीचे लेपन करणे शक्य नसेलतर दरवाजा समोर पाण्यात हळद टाकून शिंपडा. मग कुंकू वापरुन स्वस्तिक काढून हळद-कुंकू अर्पित करा.
7) गुरुवारी मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावा, आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी साफ ठेवला पाहिजे करणकी मुख्य दरवाजा मधूनच सकारात्मक ऊर्जा येत असते.
8) गुरुवारी पूजा अर्चा करताना 24 तास अखंड दिवा लावावा, दिवा विजू देवू नये. आपल्या देव घरात श्री यंत्र असेलतर त्याला कमल गट्टेची 108 मण्याची माळ घालावी. जर आपल्याला श्री यंत्र स्थापित करायचे असेलतर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार ह्या दिवशी स्थापित करावे.
9) संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घरातील वातावरण आनंदी ठेवावे, त्यामुळे घरात सकारात्मकता येते, आपली अडलेली कामे पार पडतात. आपली आर्थिक प्रगती होते.

10) आपल्या घरातील महिलांचा अपमान करू नये, घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते, तिचा अपमान किंवा अनादर केल्यास घराची कधी सुद्धा प्रगती होत नाही. घरात वाद-विवाद, भांडणे टाळावीत. कारण की त्याचा परिणाम आपल्या आर्थिक प्रगती वर होतो.
11) गुरुवारी पूजा मांडताना जर आपण संपूर्ण दिवस घरात असाल तर सकाळी पूजा मांडावी, पूजा मांडून आरती व कहाणी दुपारी 12च्या आत करावी जर संध्याकाळी पूजा मांडणार असाल तर 6:30 च्या आत पूजा मांडावी.
12) संपूर्ण दिवस उपवास करताना आपण , फळे, साबुदाणा खिचडी किंवा अन्य उपवासाचे पदार्थ सेवन करू शकता, संध्याकाळी गोडाचा नेवेद्य दाखवून मग उपवास सोडावा.
13) मार्गशीर्ष महिन्यात कोणाची सुद्धा निंदा करू नये, कोणाचा अपमान करू नये किंवा खोटे बोलू नये, कोणाला उसने पैसे देवू नये किंवा कोणा कडून घेऊ नये. कारण की आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.
14) चारही गुरुवार मनोभावे पूजा अर्चा करून शुकवारी उत्तर पूजा करून कलश परत देवघराच्या जवळ ठेवावा त्यातील पाणी घरात शिपडावे राहिलेले पाणी झाडाला घालावे, फुले नदीत सोडावी. चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे व पूजा विसर्जित करावी.
15) संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार सेवन करावा, नॉनव्हेज घरात बनवू नये किंवा आणू नये, जर घरातील व्यक्ति आईकत नसतील तर त्याना समजाऊन सांगावे, किंवा बाहेर जाऊन खाण्यास सांगावे.