Kartik Purnima 2025 Kara He Lakshmi Prapti w Mulnasathi Upay In Marathi
कार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा 2025 लक्ष्मी प्राप्ती व मुलांसाठी उपाय केलातर खूप प्रगती होईल
भगवान शिव-पार्वती-गणेश- कार्तिक पूजा केल्यास शुभ फळ मिळेल
आईने मुलांसाठी उपाय केला तर मुलांची चांगली प्रगती होईल
लक्ष्मी प्राप्ती उपाय
गरीब लोकांना दान धर्म करा
कार्तिक पूर्णिमा ही सर्वात मोठी पवित्र पूर्णिमा आहे. प्रतेक महिन्यात पूर्णिमा येते पण कार्तिक पूर्णिमा ही सर्वात मोठी पूर्णिमा मानली जाते. कारणकी कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देव दिवाळी सुद्धा असते. देव दिवाळीच्या दिवशी सर्व देव पृथ्वीवर दिवाळी साजरी करायला येतात. ह्याच दिवशी गुरुनानक जयंती सुद्धा आहे.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. आपण गंगा, यमुना, गोदावरी किंवा अजून कोणत्या पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता. त्यामुळे पुण्य मिळते व सर्व पापा पासून मुक्ती मिळते.
कार्तिक पूर्णिमा ह्या वर्षी 5 नोव्हेंबर 2025 बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव, माता लक्ष्मी व श्री गणेश ह्यांची पूजा अर्चा करतात. तसेच ह्या दिवशी कार्तिक स्वामीचे देवळात जाऊन दर्शन घेतात.
कार्तिक पूर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पूर्णिमा ह्या दिवशी काही सोपे उपाय केले तर आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आपल्याला कधी सुद्धा धन धान्यची कमतरता होत नाही.
कार्तिक पूर्णिमा करा शिव पूजा:
कार्तिक पूर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पूर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव ह्यांनी महा भयानक राक्षसाचा वध केला होता. राक्षसाचा वध केल्यावर भगवान शिव ह्यांना त्रिपुरापुरी ह्या नावांनी ओळखले जावू लागते. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी भगवान कार्तिक ह्यांची पूजा अर्चा करण्याचे महत्व आहे. ते सहा कृतिकाचे पुत्र मानले जातात कृतिका ही एक नक्षत्र आहे. शिवा, संभूति, संतति, प्रीति, अनुसूय्या व क्षमा ही सहा नावे आहेत. ह्याची पूजा अर्चा केल्यास भगवान शिव ह्यांच्या संपूर्ण परिवाराचे आशीर्वाद मिळतात. म्हणून भगवान शिव-पार्वती, गणेश व कार्तिक ह्यांची पूजा केली जाते. त्यांचा दूध व मध घालून अभिषेक केला जातो. त्यामुळे अभिषेक केल्याचे अक्षय फळ मिळते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी मिळेल लक्ष्मी कृपा:
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाचे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा महत्व आहे. ह्या दिवशी चंद्राचा आकार नेहमी पेक्षा जास्त मोठा दिसून येईल. ज्योतिष शास्त्रा नुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. ह्या दिवशी चंद्राला अर्ध्य देताना मन शांत रहावे म्हणून प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधानी सुद्धा अर्ध्य देण्याची प्रथा आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळण्यासाठी लक्ष्मी माताची पूजा अर्चा करा, श्रीसूक्त चा पाठ करा, सत्यनारायण पूजा करा.
कार्तिक पूर्णिमाला करा सोपे उपाय:
पूर्णिमा ह्या दिवशी गरीब मुलांना पांढरे वस्त्र, दूध, मिठाई व तांदूळ दान करावे. जर आपण कोणत्या गरीब व्यक्तिला देवू शकत नसाल तर मंदिरमध्ये दान करावे. कार्तिक स्वामींचा ह्या दिवशी जन्म झाला होता.
माता लक्ष्मी बरोबर चंद्राला पांढरे तांदूळ व खीरचा भोग दाखवलयाने लक्ष्मी माता प्रसन्न होते.
पूर्णिमा ही दिवशी सकाळी लवकर उठून सन्न करून पिंपळाच्या झाडाला गोड दूध व जल अर्पित करा. पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णु व महेश ह्यांचा वास असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा दिव्यानि सजवावे जसे आपण दिवाळीमध्ये सजवतो तसे. ह्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते.

कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करण्यासाठी व दिवाळी साजरी करण्यासाठी देव पृथ्वीवर येतात. ह्या दिवशी 365 दिवे लावल्याने संपूर्ण वर्षाचे पूर्णिमाचे फळ प्राप्त होते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी आईने मुलांच्या साठी दिवे लावले पाहिजेत त्यामुळे सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे दूर होऊन मुलांची प्रगती होईल त्यांच बरोबर मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागून चांगली प्रगती होईल.