What To Do With Diwali Pooja Diyas After Diwali Festival In Marathi
लक्ष्मी पूजन झाल्यावर पूजेच्या दिव्यांचे काय करावे? चुकून सुद्धा अशी चूक करू नया
दिवाळी हा हिंदू लोकांच्या सर्वात मोठा पवित्र व सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जाणारा सण आहे. आपण धनत्रयोदशी पासून भाऊबीज पर्यन्त घराच्या मुख्य दरवाजावर दिवे लावत असतो.
लक्ष्मी पूजन हा दिवस दिवाळीमधील सर्वात महत्वाचा दिवस ह्या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून आपण मुख्य दरवाजा पासून ते आपल्या घरात असंख्य दिवे लावत असतो. जेणे करून लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी म्हणून.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण तेलाचे किंवा तुपाचे दिवे खूप श्रद्धेनी लावतो. तसेच त्याचे खूप महत्व सुद्धा आहे. आपण दिवाळी झाल्यावर ही दिवे कचरा कुंडीत टाकून देता का? तर अशी चूक करू नका. तर आज आपण दिवाळीच्या दिव्यांचे काय करायचे आहे ते पाहू या.
दिवाळी झाल्यावर दिव्यांचे काय करावे?
दिवाळी मध्ये दिव्यानी घर सजवणे खूप खास मानले जाते. खास करून लक्ष्मी पूजनच्या दिवशी दिवे लावण्याचे महत्व आहे. कारणकी त्यामध्ये लक्ष्मी माताचा वायस असतो. म्हणूनच आपण फक्त दिवे लावायचे नाहीतर ते नीट सांभाळून सुद्धा ठेवले पाहिजे. इकडे तिकडे टाकून देणे खूप अशुभ मानले जाते.
दिवाळी नंतर जर दिव्यांचा उपयोग करणार नसल तर ते नीट सांभाळून ठेवा. जून दिवे मंदिरमध्ये जाऊन लावा. किंवा घराच्या अंगणात, बाल्कनी किंवा टेरेसवर प्रकाशासाठी लावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरात सुख-समृद्धी येते.
लक्ष्मी किंवा गणेश भगवान ह्यांच्यासाठी नेहमी 5 नवीन दिवे लावले पाहिजेत. जुन्या दिव्यांचा उपयोग फक्त सजावटी करिता केला पाहिजे. पण पूजेच्या वेळी नवीन देवी लावणे शुभ मानले जाते. ही परंपरा घरात सकारात्मक ऊर्जा व ऐश्वर्य आणण्यासाठी मदत करते.
जून दिवे नदी, तळे किंवा पाण्याच्या प्रवाहात सोडणे शुभ मानले जाते. जर आपल्या घराच्या आसपास नदी किंवा पाण्याचा प्रवाह नाही तर

जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये दिवे भरून खड्डा बुजवून टाका.
आपण ही जून दिवे कुंभाराला सुद्धा दान करू शकता. किंवा जरूरत मंद मुलांना सुद्धा त्यांच्या घरात आनंद आणण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी देवू शकता.
आपण ही दिवे पुन्हा साफ करून ठेऊ शकता. व परत पूजे मध्ये वापरू शकता. किंवा तुळशीच्या रोपा जवळ सुद्धा ठेवू शकता.
जून दिवे आपण साफ करून त्यामध्ये मेण व सुगंधी तेल टाकून परत वापरू शकता. किंवा दिव्याचे तुकडे करून आपल्या बागेतील कुंड्या मध्ये तळाला ठेवून माती भरून रोप लावू शकता.