नरक चतुर्दशी 2025 करा 5 उपाय, घरातील नकारात्मकता व संकट दूर होईल, अकाली मृत्यू होणार नाही
Narak Chaturdashi 2025 Kara 5 Satik Upay Nakaratmakta-Sankat Hoil Dur In Marathi
नरक चतुर्दशीला रूप चौदस सुद्धा संबोधले जाते. दिवाळी पर्व मधील हा एक महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्ण ह्यांनी नरकासुर राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली होती. हिंदू धर्मा नुसार ह्या दिवशी केलेले उपाय व्यक्तीला पापान पासून मुक्ती, अकाल मृत्यू पासून रक्षा व जीवनात सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.
दिवाळीचे 5 दिवस संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरे केले जातात. ह्या उत्सवाचा दूसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय. जिला रूप चौदस ह्या नावानी सुद्धा ओळखले जाते. हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी ह्या तिथीला साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथा नुसार ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णानी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून 16,000 मुलीना नरकासुरच्या बंधनातून मुक्त केले होते. म्हणूनच ह्या दिवसाला बुराईपर अच्छाई की विजयचे प्रतीक मानले जाते.
हिंदू पंचांग अनुसार 20 ऑक्टोबर 2025 सोमवार ह्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करायची असून ह्या दिवशी विशेष पूजा व दीपदान करण्याचे महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी केलेले उपाय व्यक्तीच्या जीवनात दुख दारिद्र व नकारात्मकता समाप्त करते.
चौमुखी दीपकचे महत्व:
नरक चतुर्दशीच्या रात्री मातीचा चौमुखी दिवा लावण्याचे विशेष महत्व आहे. ह्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल घालून चारी दिशेला चार वाती लावायच्या आहेत. ह्यालाच यम दीपक असे म्हणतात. जो मृत्यूचे देवता यमराज ह्यांना प्रसन्न करण्यासाठी लावतात. दिवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला लावावा कारणकी दक्षिण दिशा ही यमराज ह्यांची मानली जाते.
दिवा लावताना हा मंत्र जरूर म्हणा:
“मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन च मया सह, या त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतामिति॥”
घरातील सर्वात वारिष्ट व्यक्तिने हा दिवा लावावा मग दिवा लावल्यावर परत मागे वळून पाहू नये असे केल्याने अकाल मृत्यूचे भय समाप्त होऊन घरात सुख-शांती राहते.
माता कालीची पूजा:
नरक चतुर्दशीला काली चौदस असे सुद्धा म्हणतात ह्या रात्री माता कालीची पूजा केल्याने व्यक्तिला वाईट शक्ति व संकटा पासून मुक्ती मिळते. पूजा करतांना लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करून पुढे दिलेला मंत्र म्हणा. हा मंत्र जाप केल्याने शत्रूवर विजय व जीवनात सकारात्मकता येते.
मंत्र : “ॐ क्रीं कालिकायै नमः”
हनुमान जी ची आराधना:
नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमानजीनची पूजा करणे विशेष महत्व आहे. हनुमानजिनसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा लावताना पुढे दिलेला मंत्र 11 वेळा म्हणावा त्यामुळे कर्ज पासून मुक्ती मिळून घरात सकारात्मक ऊर्जा व सौभाग्यचा संचार होतो.

मंत्र: “ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा॥”
“ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्”
14 दिवे लावण्याची परंपरा आहे:
नरक चतुर्दशीच्या रात्री 14 दीपक लावण्याची परंपरा आहे. ह्या दिव्यांना यम दीपक वगळून घरातील मंदिर, स्वयंपाक घर, तुळशीच्या जवळ, मुख्य दरवाजा, टेरेस, व बाथरूम मध्ये लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे पितरांना शांती मिळून घरात समृद्धी वाढते.
नरक चतुर्दशी ही फक्त आध्यात्मिक दृष्टीने महत्वपूर्ण नसून व्यक्तीच्या मनातील नाकारात्मकता दूर करून जीवनात प्रकाश व ऊर्जा येण्याचे प्रतीक मानले जाते.