घरात भाजी नाही तेच तेच खावून कंटाळा आला बनवा मस्त चमचमीत नवीन रेसीपी
2 Potato + 1 Cup Besan New Spicy Curry Recipe In Marathi
घरात कधी भाजी नसते किंवा काही कारणांनी भाजी आणायला जायला वेळ सुद्धा नसतो. मग अश्या वेळी काय करावे समजत नाही. तसेच नेहमी नेहमी तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो.
आज आपण अशीच एक नवीन पद्धतीने बटाटा व बेसन वापरुन मस्त चमचमीत भाजी किंवा ग्रेवी बनवणार आहोत. ही नवीन रेसीपी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
साहित्य:
2 छोटे बटाटे (सोलून, तुकडे करून)
1 हिरवी मिरची
½” आले तुकडा
1 कप बेसन (किंवा अजून लागेल तसे)
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून कसूरी मेथी
1 टी स्पून तूप
मीठ चवीने
करी करिता साहित्य:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 मोठे कांदे
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
5-6 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
1 हिरवी मिरची
2-3 टे स्पून दही
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1 टी स्पून कसूरी मेथी
2 टे स्पून कोथिंबीर

कृती: प्रथम बटाटे सोलून, धुवून, चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिरलेले बटाटे, हिरवी मिरची, आल व लुसून बारीक वाटू घ्या, वाटतांना पाणी वापरायचे नाही. कांदे चिरून घ्या.
टोमॅटो आल-लसूण-हिरवी मिरची चिरून वाटून घ्या. एका बाउलमध्ये दही, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर मिक्स करून बाजूला ठेवा.
एका प्लेट मध्ये वाटलेले बटाट्याचे मिश्रण घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कसूरी मेथी, तूप व मीठ चवीने घालून मिक्स करून त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून आपण कणिक कशी मळतो तसे मळून घेऊन बाजूला ठेवा.
आता मळलेल्या बेसनाचे दोन गोळे करून त्यामधील 1 गोळा पातळ लाटून घेऊन त्याच्या 1” आकाराच्या पट्या कापून घ्या, मग एकेका पट्टीवर थोडे पनीर कुस्करून घालून एकेका पट्टीचे रोल बनवून घ्या. अश्या प्रकारे सर्व रोल बनवून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे व हिंग घालून चिरेलेला कांदा घालून मिक्स करून परतून घ्या, मग त्यामध्ये वाटलेला टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये दहींचे मिश्रण घालून 2 मिनिट परतून घ्या, चवीने मीठ घालून 1 वाटी पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा व त्यावर बनवलेले रोल ठेवून प्लेटवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 5-7 मिनिट वाफवून घ्या, त्याच बरोबर मसाला सुद्धा शिजेल.
मग वाफवलेले बेसन चे रोल बाहेर काढून घ्या, आपला मसाला आता छान शिजला असेल त्यामध्ये अजून थोडे पाणी घालून थोडीशी पातळ गेव्ही बनवून एक उकळी आलीकी त्यामध्ये वाफवलेले रोल घालून कसूरी मेथी व थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून 5 मिनिट मंद विस्तवावर एक छान वाफ येवू द्यायची.
आता गरम गरम चपाती बरोबर चमचमीत करी सर्व्ह करा.