ऑफिस, व्यवसाय वेळ नाही सोप्या पद्धतीने हरतालिका पूजा पतीच्या प्रगती व दीर्घायुष्यासाठी
26 August 2025 Hartalika Vrat Sampurn Mahiti Puja Kashi Karaychi In Marathi
26 ऑगस्ट हरतालिका व्रत मुहूर्त, पूजाविधी, महत्व व कथा अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची
हरतालिकाचे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुल्क पक्ष तृतीया ह्या तिथीला करतात. हरतालिका तिथी ह्या वर्षी 26 ऑगस्ट ह्या दिवशी आहे.
हरतालिका चे व्रत कुमारिका चांगला पती मिळवा म्हणून करतात. तर विवाहित महिला अखंड सौभाग्य लाभाव व आपल्या पतीचे आरोग्य नेहमी चांगले रहावे म्हणून करतात.
धार्मिक मान्यता अनुसार हरतालिका व्रत हे माता पार्वती नी सर्वात पहिल्यांदा ठेवले होते. त्यानंतर भगवान शंकर व माता पार्वती ह्यांच्या पुनर्मिलन च्या रूपात साजरे करतात. ज्योतिष शास्त्रा नुसार माता पार्वतीने भोले नाथह्यांना प्राप्त करण्यासाठी 107 वेळा जन्म घेतला होता तरीपण माता पार्वतीला शंकर भगवान ह्यांची प्राप्ती झाली नाही. मग 108 वा जेव्हा जन्म घेतला व हरतालिका व्रत करून कठीण त्याग करून तपस्या करून मग शंकर भगवान ना प्राप्त केले होते. म्हणूनच कुमारिका सुंदर चांगला पती मिळावा व विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष मिळावे म्हणून हे व्रत मनोभावे करतात. हरतालिका हे व्रत करवा चौथ व्रता पेक्षा सुद्धा कठीण मानले जाते. ह्या दिवशी महिला अन्न–जल त्याग करून निर्जल व्रत ठेवतात.
हरतालिका तीज काय आहे महत्व:
हरतालिका ह्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घआयुष्य साठी व्रत करतात व माता पार्वती व शंकर भगवान ह्यांची पूजा अर्चा करतात. ह्या दिवशी विवाहित महिला 16 शृंगार करतात त्यामध्ये कुमकुम, मेहंदी, बिंदी, सिंदूर, जोडवी, काजळ, बांगड्या, कंगवा व अजून अश्या काही वस्तुनी शृंगार करतात.
हरतालिका तीज तिथी: 26 ऑगस्ट 2025 मंगळवार
हरतालिका पूजा मुहूर्त :
शुभ उत्तम मुहूर्त: 26 ऑगस्ट सकाळी 5 वाजून 56 मिनिट ते सकाळी 8 वाजून 31 मिनिट
हरतालिका तीज पूजा विधि:
साहित्य: सखी व पार्वती अश्या दोंन मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा सुपारी गणपती म्हणून, पत्री 5 प्रकारची, हार फूल, 5 प्रकारची फळ, कापसाची माळ, ओटी साठी (हिरव्या बांगड्या, टिकली, छोटा आरसा, पान सुपारी, हळकुंड, खारीक, खोबर) समई व तेलाचा दिवा, तुपाचे निरंजन, कापुर, अगरबती
हरतालिका तीज हे नाव कसे पडले:
ह्या व्रताला हरतालिक व्रत असे म्हणतात कारणकी पार्वती माताची सखी पार्वतीला तिच्या वडिलांच्या घरून जंगलात घेऊन गेली. पार्वती ने भगवान शंकर ह्यांना मनोमन आपले पती म्हणून मानले होते व ती सारखी भगवान शंकर ह्यांची तपस्या करायची हे तिची सखी पार्वतीच्या मनात काय आहे ते जाणत होती. म्हणून ती पार्वती ला जंगलात घेऊन आली.
हरतालिका तीज व्रत कथा:
हरतालिका व्रत हे शंकर व पार्वती ह्याचे व्रत आहे व ते खूप लोकप्रिय आहे. असे म्हणतात की आपल्या वडीलच्या घरी यज्ञ सुरू असताना भगवान शिव ह्याचा झालेला अपमान ती सहन करू शकली नाही व तिने यज्ञमध्ये स्वतः भस्म करून घेतले. मग पुढच्या जन्मात राजा हिमाचल ह्याच्या घरात जन्म घेतला. ह्या जन्मात सुद्धा भगवान शंकर ह्याची खूप तपस्या केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
राजा हिमाचल चिंतातुर झाले:
आपल्या मुलीची हालत पाहून राजा हिमाचल चितीत झाले. मग त्यांनी नारद मुनि बरोबर सल्ला मसलत केली. मग नारद मुनीच्या म्हणण्या नुसार त्यांनी आपल्या मुलीचा विवाह भगवान विष्णु ह्यांच्याशी ठरवला.

पार्वतीने विवाह करण्यास नकार दिला:
पार्वतीला भगवान विष्णु ह्यांचाशी विवाह करण्याचे मनात नव्हते ही गोष्ट तिची सखी जाणत होती म्हणून तिने पार्वतीला जंगलात नेले. म्हणून हरतालिका व्रत असे नाव पडले.
पार्वती मातानी कठोर तपस्या केली:
भाद्रपद शुल्क तृतीया तिथीला हस्त नक्षत्र ह्या दिवशी माता पार्वती नी वाळूची शिव लिंग निर्माण केले व भोलेनाथ ह्यांची तपस्या करण्यात लीन झाली तिने 12 वर्ष कठोर तपस्या केली तेव्हा अन्नचा त्याग केला. अश्या कठोर तपस्या नंतर भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी तिला दर्शन दिले व त्यांनी तिला पत्नीच्या रूपात स्वीकारले.