सगळे करतील कौतुक फक्त 3 साहित्य पासून बनवली लाजवाब तोंडात टाकताच विरघळणारी गणपती स्पेशल मिठाई
Zatpat Delicious Ganpati Bappa Special Mithai For Bhog In Marathi
आता गणपती उत्सव चालू होत आहे, त्यामुळे रोज बाप्पाला नेवेद्य दाखवण्यासाठी काही ना काही गोड पदार्थ किंवा मोदक पाहिजे.
आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत. ही रेसीपी खूप आकर्षक दिसते व स्वादिष्ट लागते. तसेच बनवण्यासाठी खूप सोपी व झटपट होणारी आहे.
साहित्य:
2 छोट्या आकाराच्या वाट्या साखर
1 छोटी वाटी कॉर्नफ्लोर
2 1/2 टे स्पून तूप
2 टे स्पून काजू-बदाम-पिस्ता
2 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प
1 टी स्पून वेलची पावडर

कृती: एका बाउल मध्ये 1 छोटी वाटी कॉर्नफ्लोर व 3 छोट्या वाट्या पाणी मिक्स करून बाजूला ठेवा, गुठळी होता कामा नये. काजू-बदाम-पिस्ता तुकडे करून घ्या.
एका पॅनमध्ये 2 छोट्या वाट्या साखर व 1 वाटी पाणी मिक्स करून मंद विस्तवार साखर विरघळवून 2 मिनिट तसेच गरम करून घ्या.
आता साखरेच्या मिश्रणात कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून मिक्स करून मंद विस्तव्यवर मिश्रण घट्ट होऊ पर्यन्त आटवून घ्या, मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यामध्ये 1 टे स्पून तूप व 2 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प घालून मिक्स करून घ्या, परत 1 मिनिट झाला की 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या, मग परत राहिलेले तूप घालून वेलची पावडर, चिरलेले ड्रायफ्रूट घालून 2 मिनिट तसेच गरम करून घ्या, विस्तव मंदच ठेवावा.
एका ट्रेला तूप लाऊन त्यामध्ये 3/4 मिश्रण ट्रे मध्ये काढून एक सारखे करून घ्या, वरतून ड्रायफ्रूट घालून 1-2 तास तसेच झाकून सेट करायला ठेवा.
मोदक मोल्ड घेऊन त्याला आतून थोडेसे तूप लाऊन त्यामध्ये मिश्रण घालून थोडे दाबून घ्या. मग मोल्ड उघडून मोदक काढून घ्या, अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
आता बर्फी व मोदक गणपती बाप्पा ना नेवेद्य दाखवण्यासाठी तयार आहेत.