नागपंचमी 2025 सोपी पूजाविधी व महत्व | काय करावे-काय करू नये | ज्वारीच्या लाहया बनवण्याची सोपी पद्धत
Nagpanchami 2025 Puja Vidhi, Mahatva, Kay Karave Sampurn Mahiti In Marathi
हिंदु धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात रोजच्या दिवसाचे काहीना काही महत्व आहे. महाराष्ट्रमध्ये नागपंचमी हा सण खूप जोरात साजरा केला जातो. ह्या दिवशी नाग देवताची व शंकर भगवान ह्यांची पूजा अर्चा करण्याचेखूप महत्व आहे.
नाग पंचमी हा सण ह्या वर्षी 29 जुलै 2025 मंगळवार ह्या दिवशी साजरा करावयाचा आहे. देवळात नाग पंचमी ह्या दिवशी नाग देवतांना जल अभिषेक करतात. त्याना दूध व लाहया भोग म्हणून दाखवतात. काही जण ह्या दिवशी उपवास सुद्धा करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी नाग देवताची पूजा केल्यास शंकर भगवान प्रसन्न होऊन आपले सर्व कष्ट दूर करतात.
वैदिक पंचांग नुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी तिथी आरंभ 28 जुलै रात्री 11 वाजून 25 मिनिट व समाप्ती 29 जुलै रात्री 12 वाजून 47 मिनिट
नाग पंचमी ह्या दिवशी शिवयोग, रवियोग, व लक्ष्मी योग ह्याचा शुभ संयोग आहे. तसेच ह्या दिवशी मंगळागौर व्रत सुद्धा आहे.
नाग पंचमी महत्व:
हिंदू धर्मात नाग पंचमी ह्या सणाचे खूप महत्व आहे. भगवान शंकर आपल्या गळ्यात एक आभूषण म्हणून नागा ला घालतात. असे म्हणतात की नाग पंचमी ह्या दिवशी नाग देवता बरोबर भगवान शंकर ह्यांची पूजा अर्चा व रुद्र अभिषेक केल्यास आपल्या जीवनातील काल सर्प दोष नाहीसा होतो. ह्या दिवशी नाग पूजा व अभिषेक करून दूध व लाहया चा नेवेद्य दाखवल्यास पुण्य मिळते. ह्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर नागाचे चित्र बनवल्यास नाग देवताची कृपा आपल्या सर्व कुटुंबावर राहते.
नाग पंचमी ह्या दिवशी काय करावे व काय करू नये:
नाग पंचमी ह्या दिवशी उपवास करून नाग देवताची पूजा व अभिषेक करून फूल वहावी व दुधाचा नेवेद्य दाखवावा. त्याच बरोबर नाग देवताचा मंत्र जाप करावा.
जर कुंडली मध्ये राहू केतु चा त्रास होत असेलतर नाग पंचमी ह्या दिवशी नाग देवतांची जरूर पूजा करावी. त्याच बरोबर शिव लिंग वर दूध सोडताना दूध भांड्यात घ्यावे.
नाग पंचमी ह्या दिवशी सुई दोरा वापरणे अशुभ मानतात. तसेच ह्या दिवशी लोखंडी भांड्यात जेवण बनवू नये.
नाग पंचमी पूजाविधी:
नाग पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
पूजा घर स्वच्छ करून नाग देवताची प्रतिमा काढा किंवा बनवा. पाहिजे तर आपण घरच्या मुख्य दरवाजा जवळ सुद्धा नाग देवाची प्रतिमा काढू शकता.
नाग देवाच्या फोटो किंवा मूर्तीच्या समोर दिवा लावावा व ह्याच दिवशी शिवलिंग वर जल अभिषेक जरूर करा. मग भगवान शंकर पार्वती व गणेश भगवान ह्यांना नेवेध दाखवावा.
नाग पंचमी ह्या दिवशी खाली दिलेली कामे करू नयेत:
धर्म शास्त्र नुसार नाग पंचमी ह्या दिवशी सापांना नुकसान पोहचवू नये.
नाग पंचमी ह्या दिवशी जीवंत सापाला दूध प्यायला देवू नका.
नाग पंचमी ह्या दिवशी तवा व लोखंडी कढई मध्ये जेवण बनवू नका.
नाग पंचमी ह्या दिवशी जमिनीमध्ये खोद काम करू नये.
नाग पंचमी ह्या दिवशी शिवलिंग व नाग देवताला तांब्याच्या भाड्यातून दूध अर्पित करू नका.

नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाहया सोपी पद्धत:
साहित्य:
1 छोटी वाटी ज्वारी
2 मोठे ग्लास पाणी (उकळते)
½ छोटा चमचा मीठ
कृती: ज्वारीच्या लाहया बनवण्यासाठी आपण कोणती सुद्धा ज्वारी घेऊ शकता. आपण भाकरी बनवतो तो ज्वारी सुद्धा घेऊ शकता.
प्रथम 2 मोठे ग्लास पाणी गरम करून घ्या म्हणजे उकळून घ्या. आता एक वाटी ज्वारी निवडून घ्या म्हणजे खडे असेलतर काढून टाका.
मग एका बाउल मध्ये ज्वारी घेऊन त्यामध्ये उकळते पाणी व मीठ घाला (मीठ घातल्याने त्याची छान टेस्ट येते.) ज्वारी पूर्ण बुडाली पाहिजे मग चमच्यानी एकसारखे करून बाउलवर झाकण ठेऊन 10 मिनिट बाजूला ठेवा.
नंतर एक चाळणी घेऊन त्यावर एक स्वच्छ रुमाल घालून बाउल मधील ज्वारी त्यावर ओतून सर्व पाणी काढून घ्या. व त्याची एक पुरचुंडी बांधून बाउलमध्ये 10-15 मिनिट झाकून ठेवा.(असे केल्याने ज्वारीचे वरचे आवरण छान मऊ होऊन आपल्या लाहया मस्त कुरकुरीत होतील व खाताना छान चविष्ट लागतील.)
आता पुरचुंडी सोडून एका स्वच्छ कापडावर ज्वारी पसरवून 7-8 तास बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा चांगला तापला की त्यामध्ये थोडी ज्वारी घालून झाकण ठेवा पहिल्यांदा विस्तव मोठा करून मग लगेच कमी करा व झाकण ठेवून मंद वस्तवावर लाहया फोडून घ्या. झाकण ठेवल्याने लाहया बाहेर उडणार नाहीत. अश्या प्रकारे सर्व लाहया फोडून घ्या.
आता आपल्या लाहया तयार झाल्या आहेत व नाग देवताना आपण नेवद्य म्हणून दाखवू शकतो.