Shravan Somvar 2025 Shiv Ji Chi Krupa prapt Honyasathi Satik Upay In Marathi

shrawan somwar 2025
Shravan Somvar 2025 Shiv Ji Chi Krupa prapt Honyasathi Satik Upay

श्रावण महिन्यात शिवजींची कृपा प्राप्त होण्यासाठी चमत्कारी सर्व मनोकमनापूर्ती उपाय

Shravan Somvar 2025 Shiv Ji Chi Krupa prapt Honyasathi Satik Upay In Marathi

श्रावण सोमवारी लवकर उठून स्नान करून शिव मंदिरात जावे. शिवलिंगवर बेलपत्र व शमी पत्र अर्पित करावे. जल अर्पित करताना मनात प्रार्थना करा की संपत्ती संबंधित सर्व कार्य पूर्ण होवो व सर्व बाधा नष्ट होवो.

श्रावण महिना हा पवित्र भगवान शिव ह्यांची आराधना करण्याचा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांची केलेली पूजा, व्रत व विशेष उपाय हे फक्त आपल्याला आध्यात्मिक लाभ देत नाहीत तर आपल्या समस्यांचे समाधान होते.

धन-संपत्तीची कमी, विवाहमध्ये उशीर, मानसिक अशांती, श्रावण सोमवार ह्या दिवशी श्रद्धा पूर्वक केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदलाव आणतात. आपण काही सोपे सटीक उपाय केलेतर त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

1. धन-संपत्तीमध्ये वृद्धी होण्यासाठी उपाय:
आपल्या जीवनात समृद्धी पाहिजे असेलतर श्रावण सोमवार ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वछ कपडे परिधान करून शिव मंदिरमध्ये जावे. शिवलिंगवर प्रथम गंगाजल अर्पित करावे. मग स्वच्छ जल घेऊन अभिषेक करावा. मग रोली अक्षता अर्पित करावी. साखर व ताजे फळ भोग अर्पित करावा. धूप-दीप लाऊन भगवान शिव ह्यांना प्रणाम करावा व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने जीवनात स्थिरता व समृद्धी येते.

2. उन्नती व सामाजिक ओळखसाठी उपाय:
आपण जर प्रगती व सन्मान मिळवण्यासाठी आकांक्षा ठेवत असाल तर श्रावण सोमवार ह्या दिवशी पंचामृतनी शिवलिंग वर अभिषेक करा. (दूध,दही,मध,साखर व गंगाजल) मिक्स करून तयार करून अर्पित करा मग प्रार्थना करा, त्याने आत्मविश्वास, यश व सफलता प्राप्त होईल.

3. विवाहमध्ये जर बाधा येत असतील तर दूर होतील:
शिवलिंग व जल अभिषेक करा त्यामध्ये केशर मिक्स करून रुद्राभिषेक करा. तेव्हा ॐ नम: शिवाय हा मंत्र जाप करा व विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय केल्याने विवाहमद्धे येणाऱ्या अडचणी दूर होऊन लवकरच चांगली बातमी मिळेल.

4. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभ मिळण्यासाठी उपाय:
जर आपण रोगा पासून मुक्ती व मानसिक शांती मिळण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर शिव मंदिरात जाऊन सेवा करा. मंदिराची साफ-सफाई करण्यास मदत करा. भगवान शिव ह्यांना स्वच्छता प्रिय आहे. त्यामुळे आपल्या जीवनात आरोग्यता, मानसिक संतुलन व सकारात्मक ऊर्जाकहा संचार होईल.

shrawan somwar 2025
Shravan Somvar 2025 Shiv Ji Chi Krupa prapt Honyasathi Satik Upay

5. नकारात्मकता व संकटा पासून मुक्ती मिळण्यासाठी:
आपल्या जीवनात नकारात्मकता व संकटा पासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावण सोमवारी स्नान करून शिव मंदिरात जाऊन शिवलिंग वर भांग व बेलपत्र अर्पित करा. भांग अप्रीत केल्याने मनातील अशुद्धी यांची मुक्ती मिळते. व बेलपत्र अर्पित केल्याने जीवनातील संकट शांत होतात. हा उपाय केल्याने नकारात्मकता व संकटा पासून मुक्ती मिळून भगवान शिव ह्यांची कृपा प्राप्त होते.

6. मनासारखा वर मिळण्यासाठी उपाय:
आपल्याला मना सारखा योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी श्रावण सोमवारी हा सोपा उपाय करा. सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. मग शिवलिंगवर गायच्या कचा दुधानी अभिषेक करा व भगवान शिव ह्यांना पांढरे पुष्प, बेलपत्र व अक्षता अर्पित करा.

“ॐ नमः शिवाय” मंत्र का 108 बार जाप करें। असे केल्याने मनासारखा जीवन साथी मिळेल.

शिवलिंग वर काय अर्पित केल्याने काय प्राप्त होते:
पंचामृत- सौभाग्य, तेज मनोकामनाची प्राप्ति
दूध- आरोग्य प्राप्ति
अत्तर – धर्म व सात्त्विकता प्राप्ति
तांदूळ – सुख-समृद्धि मध्ये वृद्धि
चंदन- मान-सम्मानची प्राप्ति
केसर- वैवाहिक जीवन मध्ये सुख
तूप – तेज व ओजची वृद्धि
तिल- रोगा पासून मुक्ति
सुगंधित तेल- धन-संपत्ति व भौतिक सुख
साखर व उसचा रस- ऐश्वर्य व समृद्धि

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.