Indira Ekadashi 2026 | Pitru Paksha Ekadashi Vrat, Puja Vidhi, Shraddha & Shubh Muhurat In Marathi

Pitru Paksha Indira Ekadashi 2026
Indira Ekadashi 2026 | Pitru Paksha Ekadashi Vrat, Puja Vidhi, Shraddha & Shubh Muhurat

Indira Ekadashi 2026 | Pitru Paksha Ekadashi Vrat, Puja Vidhi, Shraddha & Shubh Muhurat

Indira Ekadashi 2026 | पितृ पक्षातील एकादशी व्रत कसे करावे? तिथी, मुहूर्त, पूजा विधी व महत्व

पितृ पक्षमध्ये एकादशी व्रत कसे करावे? उत्तम मुहूर्त, महत्व व पूजा विधी संपूर्ण माहिती

हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रत हे भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळण्यासाठी उत्तम मानले जाते. पितृ पक्ष मधील एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते. चला तर मग पाहू या पितृ पक्षमध्ये एकादशी कधी आहे.

24 सप्टेंबर 2026 पासून पितृ पक्ष सुरू झाले असून 10 ऑक्टोबर 2026 ह्या दिवशी सर्वपितृ अमावस्या आहे व पितृपक्ष समाप्ती होणार आहे. ह्या 16 दिवसांत एक दिवस एकादशी श्राद्ध आहे ते अत्यंत विशेष व महत्वाचे आहे. पितृ पक्ष मध्ये 6 ऑक्टोबर 2026 मंगळवार ह्या दिवशी एकादशी श्राद्ध आहे.

पितृ पक्ष एकादशी व्रत आश्विन मास कृष्णपक्ष एकादशी तिथी येत आहे. असे म्हणतात की इंदिरा एकादशी व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो व त्याच बरोबर भगवान विष्णु ह्यांची कृपा प्राप्त झाल्याने सर्व पापां पासून मुक्ती मिळते. पितृ पक्ष मधील एकादशी तिथीला व्रत करून त्याच बरोबर पितरांना तर्पण, श्राद्ध व पिंडदान पण करतात. ह्या ववर्षी पितृ पक्ष मध्ये एकादशी व्रत कधी आहे व तर्पण व श्राद्ध मुहूर्त काय आहे.

एकादशी तिथी श्राद्ध मुहूर्त 2026:
कुतुप मुहूर्त: सकाळी 11:46 मिनिट ते दुपारी 12:33 मिनिट पर्यन्त
रौहिण मुहूर्त: दुपारी 12:33 मिनिट ते दुपारी 01:20 मिनिट पर्यन्त
अपराह्न काल: दुपारी 01:20 मिनिट ते दुपारी 03:40 मिनिट पर्यन्त

इंदिरा एकादशी पूजन व दान करण्याचा शुभ मुहूर्त:
एकादशी तिथीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची विधी पूर्वक पूजा केली जाते. ह्या दिवशी गरीब व जरूरतमंद सेवा किंवा दान करणे उत्तम मानले जाते. इंदिरा

एकादशीच्या दिवशी दान व पूजन शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहू या.
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:47 मिनिट पासून सकाळी 5:36 मिनिट पर्यन्त
विजय मुहूर्त: दुपारी 02:17 मिनिट पासून दुपारी 3:04 मिनिट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:13 मिनिट ते 06:38 मिनिट पर्यन्त
निशिता मुहूर्त: रात्री 11:55 मिनिट पासून रात्री 12:44 मिनिट पर्यन्त

पितृ पक्षमध्ये इंदिरा एकादशी व्रत कधी आहे?
हिंदू पंचांग अनुसार, आश्विन मास कृष्ण पक्ष एकादशी तिथी 6 ऑक्टोबर 2026 मंगळवार रात्री 02:07 मिनिट सुरुवात होत असून एकादशी तिथी समाप्ती 7 ऑक्टोबर 2026 रात्री 12:34 मिनिट समाप्ती होत आहे. उदय तिथी अनुसार इंदिरा एकादशी व्रत 6 ऑक्टोबर रोजी ठेवायचे आहे. ह्या व्रताचे पारण दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2026 बुधवार सूर्योदय बरोबर करायचे आहे.

एकादशी तिथीला कोणत्या पितरांचे श्राद्ध केले जाते?
एकादशी तिथीला ज्या पूर्वजांचे श्राद्ध केले जाते, ज्यांचा मृत्यू कोणत्या सुद्धा महिन्याच्या कृष्ण किंवा शुक्ल पक्ष एकादशी तिथीला झालेली असेल. ह्या तिथीला संन्यासी किंवा वैरागी जीवन जगणारे पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे.

इंदिरा एकादशी व्रत महत्व:
विष्णु पुराण अनुसार इंदिरा एकादशी व्रत केल्याने मनुष्यला जन्म-जन्मातर च्या पापांपासून मुक्ती मिळते. जीवनात सुख-समृद्धी व खुशाली येते. पूर्वजांना मोक्ष मिळतो. तसेच ह्या व्रताचा पुण्य प्रभावने यमलोक मध्ये कष्ट भोगत असतील तर वैकुंठची प्राप्ती होते.

एकादशी श्राद्ध अलौकिक महत्व:
नरक व दंड पासून मुक्ती: असे म्हणतात की, कोणी पूर्वज अनाहूत पणे होणाऱ्या पाप कर्मच्या कारणांमुळे यमलोक मध्ये कष्ट भोगत असतील तर ह्या दिवशी पूर्वजांसाठी विधीपूर्वक व्रत ठेऊन त्याचे पुण्य फळ पितरांना अर्पित केल्याने त्यांना यमयातना पासून लगेच मुक्ती मिळून स्वर्गलोकची प्राप्ती होते.

संन्यासी व ऋषिचा आशीर्वाद: एकादशी तिथी संन्यास घेतलेले साधू-महात्मा ह्याचे श्राद्ध साठी सर्वश्रेष्ट मानले जाते. ह्या दिवशी श्राद्ध कर्म केल्याने समस्त वेदचे ज्ञान व ऋषिचे आशीर्वाद प्राप्त होतात.

अर्यमादेव व श्रीहरि ची कृपा: ह्या दिवशी व्रत व तर्पण केल्याने पितृदेव अर्यमा किंवा भगवान शालिग्राम (श्री विष्णु अत्यंत प्रसन्न होतात. त्यामुळे जीवनातील संपूर्ण पाप नष्ट होऊन कर्ज पासून मुक्ती मिळते.

अक्षय ऐश्वर्य ची प्राप्ति: आश्विन कृष्ण पक्ष एकादशी च्या दिवशी दान-तर्पण करणारे साधकांच्या जीवनात निरंतर धन-धान्य, ऐश्वर्य व सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. थांबलेली सर्व कामे पूर्ण होतात.

एकादशी श्राद्ध संपूर्ण पूजाविधी:
शुद्धीकरण व स्नान: साधकनी सकाळी सूर्योदय होण्याच्या पूर्वी उठून स्नान केले पाहिजे व शुद्ध वस्त्र परिधान केले पाहिजेत.

देव व पंचबली भोग: सर्वात पहिल्यांदा देवताना अग्निग्रास द्या, मग गाय, कावळा, कुत्रा, मुंग्या व मासे ह्यांना भोजन द्या. पिंपळाच्या वृक्षाच्या खाली सुद्धा अन्न व जल ठेवा.

तर्पण कर्म: दक्षिण दिशेला मुख करून हातात जल, कुश, जवस व काळे तीळ घेऊन पिरतारांना भक्तिभावाने तर्पण द्या.

पिंडदान: जवस, भात,तीळ व आटा वापरुन पिंड तयार करून पितरांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी अर्पित करा.

सात्विक भोजन तयार करा: बिना कांदा, लसूणने सात्विक भोजन (जसेकी खीर, पुरी व भाजी) तयार करा.

ब्राह्मण भोजन व दान: कुतुप किंवा अपराह्न काल मधील शुभ मुहूर्त वर कोणी योग्य ब्राह्मणला घरी आदरपूर्वक आमंत्रण भोजनसाठी द्या. त्याच बरोबर आपल्या आयपती नुसार दक्षिणा व वस्त्र व दान साहित्य देवून आशीर्वाद घ्या.

Pitru Paksha Indira Ekadashi 2026
Indira Ekadashi 2026 | Pitru Paksha Ekadashi Vrat, Puja Vidhi, Shraddha & Shubh Muhurat

काही गोष्टी जरूर लक्षत घ्या:
ब्रह्मचर्य पालन: श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तिने पूर्ण दिवस मन, वचन व कर्म पासून ब्रह्मचर्य पालन करणे अनिवार्य आहे.

तामसिक आहार पासून दूर रहा: ह्या पवन दिवशी मसूर डाल, लसूण, कांदा, मुळा, वांगे व कोणते सुद्धा तामसी भोजन सेवन करू नये.

शारीरिक नियम: ह्या दिवशी केस कापणे, नख कापणे, दाढी करणे मनाई आहे.

दान-पुण्य: श्राद्ध प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गरीब, असहाय व जरूरतमंद लोकांना आपल्या क्षमते अनुसार भोजन व वस्त्र दान करा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.