10 ऑक्टोबर करवा चौथ, चंद्रोदय वेळ, पूजा मुहूर्त, विधी व नियम काय आहेत.
Karwa Chauth 2025 Pooja Muhurth, Pooja Vidhi w Niyam In Marathi
करवा चौथ ह्या दिवशी बरेच शुभ योग निर्माण झाले आहेत. पंचांग नुसार रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सिद्धी योग आहे.
करवा चौथ शुभ योग:
करवा चौथ ह्या दिवशी बरेच शुभ योग निर्माण झाले आहेत. पंचांग नुसार करवा चौथ ह्या दिवशी सिद्धी योग आहे. त्याच बरोबर चंद्र शुक्रची राशी वृषभ मध्ये प्रवेश करणार आहे. सिद्धी योग हा 10 ऑक्टोबर सकाळी 5 वाजून 41 मिनिट पर्यन्त आहे. त्याच बरोबर शिववासचा सुद्धा योग येत आहे.
करवा चौथ शुभ तिथि 2025
चतुर्थी तिथि आरंभ- 09 ऑक्टोबर रात्री 10 वाजून 54 मिनिट पर्यन्त
चतुर्थी तिथि समाप्त- 10 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिट
पूजा शुभ मुहूर्त- 10 ऑक्टोबर 2025
संध्याकाळी 5 वाजून 57 मिनिट ते संध्याकाळी 7 वाजून 11 मिनिट पर्यन्त
पूजा वेळ – 1 तास 14 मिनिट
करवा चौथ व्रत वेळ सकाळी 6 वाजून 19 मिनिट ते संध्याकाळी 8 वाजून 13 मिनिट पर्यन्त
करवा चौथ व्रत वेळ – 13 तास 54 मिनिट
करवा चौथ 2025
चंद्रोदय वेळ – 10 ऑक्टोबर
संध्याकाळी 8 वाजून 13 मिनिट पर्यन्त
(प्रतेक शहरामध्ये वेगवेगळी वेळ आहे)
करवा चौथ 2025 चंद्रोदय वेळ:
10 ऑक्टोबर 2025 रात्री 8 वाजून 13 मिनिट चंद्रोदय होईल
करवा चौथ विधी 2025 पूजा विधी:
* सर्वात पहिल्यांदा करवा चौथ ह्या दिवशी विवाहित महिलांनी सूर्योदयच्या अगोदर उठून स्नान करून संकल्प करावा.
* मग आपल्या सासुनी दिलेली सरगी सेवन करावी.
* मग करवा चौथचे निर्जल व्रत सुरू करावे.
* करवा चौथच्या रात्री चौरंगवर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे, मग त्यावर भगवान शिव, माता पार्वती, कार्तिक व श्री गणेश ह्यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी.
* एका तांब्यात जल भरून नारळ घेऊन त्याला कलवा बांधून नारळ कलशावर ठेवावा.
* मग अजून एक मातीचा मटका मध्यम आकाराचा घेऊन त्यामध्ये जल भरावे व त्यावर झाकण ठेवून त्यावर मिठाई ठेवून दक्षिण दिशेला ठेवावी. मग त्यावर कुंकूनि स्वस्तिक काढावे.
* मग दिवा लाऊन अगरबत्ती लावावी व फूल व अक्षता ठेवाव्या.
* मग चौथ माताची कहाणी आइकावी.
* चंद्रोदय झाल्यावर चंद्र दर्शन घेऊन, पूजा करून चंद्रदेवाला अर्ध्य देवून आशीर्वाद घ्यावा.

करवा चौथ नियम कोणते आहेत.
करवा चौथचे व्रत विवाहित महिला करतात. पण अविवाहित मुली सुद्धा ही व्रत चांगला पती मिळवा म्हणून करू शकतात.
करवा चौथचे व्रत ही निर्जल व्रत करतात. सूर्योदय झाल्यावर स्नान करून व्रत संकल्प करवा. मग रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्र दर्शन घेऊन पतीच्या हातून जल सेवन करावे मग व्रत सोडावे.
करवा चौथ ह्या दिवशी जर मासिक पाळी आली तर फक्त व्रत करावे पूजा करून नये.
जर कोणी महिला आजारी असेलतर तिने निर्जल व्रत नकरता दूध, फळ सेवन करावी.
जर गरोदर महिला असलेतर तिने सुद्धा निर्जल व्रत करून नये. दूध फळ सेवन करावी.
विवाहित महिलांनी 16 शृंगार करून मग पूजा करावी.
करवा चौथ ही व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करावे.