श्रावण मास 2025 भगवान शिव बरोबर शनिदेवची पूजा का करावी? शनिदेवांचे उपाय कृपा मिळेल
Sharwan 2025 Shanidev Puja Ka Karawi In Marathi
श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांच्या बरोबर शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष पासून मुक्ती मिळेल. भगवान शनिदेव हे भगवान शिव ह्यांचे गुरु आहेत व त्याची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतात. भगवान शनिदेव ह्यांची पूजा केल्याने लाभ होतात.
श्रावण संपूर्ण महिना भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात सोमवार ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे. म्हणून शिवभक्त पूर्ण श्रद्धेने भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करतात. पण आपल्याला माहीत आहे का? श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांच्या बरोबर शनिदेव ह्यांची पूजा करतात. त्यामुळे शनिदोष पासून मुक्ती मिळते.
श्रावण महिन्यात शनिवारी न्यायचे देवता शनिदेव ह्यांची पूजा व उपाय केल्याने शनिदोष पासून मुक्ती मिळते. पण काही भक्त असे म्हणातात श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांच्या बरोबर शनिदेव ह्यांची पूजा का करायची? शनिदेव ह्यांना न्यायाचे देवता का म्हणतात? श्रावण महिन्यात शनिदेव ह्यांची पूजा करण्याचे काय लाभ? ते आपण पाहू या.
श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांच्या बरोबर शनिदेव ह्यांची पूजा का करावी:
भगवान शिव शनिदेवाचे गुरु आहेत. भगवान शिव ह्यांनी शनि देव यांना न्यायाधीशची पदवी दिली आहे. त्यामुळे शनिदेव मनुष्य, देव व पशु सर्वांना कर्मा नुसार फळ देतात. म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांच्या बरोबर भगवान शनि ह्यांची पूजा करतात त्यांना शनि देव शुभ फळ देतात.
श्रावण महिन्यात शनिवार ह्या दिवशी पुढील उपाय केलेतर होतील लाभ:
* वायुपुत्र शनिदेवची आराधना: श्रावण महिन्यात वायुपुत्र हनुमानजीनची आराधना जरूर केली पाहिजे. असे केल्याने मनुष्याचे शरीर बलवान व निरोगी बनते. अंजनीपुत्र हनुमानची कृपा होऊन कोणते सुद्धा काम करण्यास गती मिळून बुद्धीमध्ये चांगली सुधारणा होते. त्याच बरोबर शत्रू नष्ट होऊन मित्र परिवार वाढतो.

* ब्राह्मणाला दान द्यावे: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शरीर पीडा असणाऱ्या ब्राह्मणाच्या शरीराला तेल लाऊन गरम पाणी वापरुन स्नान घालावे. मग श्रद्धा पूर्वक खिचडी सेवन करावयास द्यावी. त्याच बरोबर तेल, लोखंड, काळे तिल, काळे उडीद, काळे घोंगडे दान करावे.
*शनिदेवाला तेलानी अभिषेक: शनिवारी तिळाच्या तेलानी अभिषेक करावा. त्याच बरोबर उडीद व अक्षता अर्पित कराव्या. हे उपाय केलेतर शुभफळ प्राप्त होतात. त्याच बरोबर कुंडलीमधील शनिदोष दूर होतो.
* शनिदेवाचा वैदिक मंत्र जाप करावा: शनिदेवाच्या पूजे बरोबर शनि देवाचा मंत्र जाप करणे जरुरीचे आहे. त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळून सर्व संकटे दूर होतील.