Tasty Spicy Garlic Butter Sweet Corn For Kids Nashta In Marathi
टेस्टी स्पाइसी गार्लिक बटर स्वीट कॉर्न मुलांच्या नाश्तासाठी
आता स्वीट कॉर्नचा सीझन चालू आहे. त्यामुळे बाजारात आपल्याला स्वीट कॉर्न सहज उपलब्ध होतात. आपण ह्या अगोदर स्वीट कॉर्न वापरुन आप्पे कसे बनवायचे किंवा कटलेट किंवा पुलाव कसा बनायचा ते पाहिले.
आज आपण स्वीट कॉर्न ची अजून एक मस्त डिश बनवणार आहोत. ही डिश खूप टेस्टि स्पायसी लागते. त्यासाठी आपण बटर व गार्लिक म्हणजेच लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरणार आहोत. बटर व लसूण वापरुन ही डिश खूप मस्त टेस्टि लागते. अगदी नवीन प्रकार आहे करून पहा सगळ्याना आवडेल.
साहित्य:
2 मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न
2 टे स्पून बटर
12-15 लसूण पाकळ्या (किसून)
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1 टी स्पून मिक्स्ड ह्रब्स
2 टे स्पून टोमॅटो सॉस
मीठ चवीने
कोथिंबीर सजावाटी करिता

कृती: प्रथम स्वीट कॉर्न स्वछ करून घ्या, मग त्याचे 1″ छोटे छोटे गोल चकती सारखे तुकडे करून घ्या. लसूण सोलून, किसून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या कढई मध्ये 2 मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये 1/4 टी स्पून मीठ घाला. मग त्यामध्ये स्वीट कॉर्नचे तुकडे ठेवा मध्यम विस्तवावर 4-5 मिनिट स्वीट कॉर्न उकडून घ्या. स्वीट कॉर्न उकडून झाले की एका चाळणीवर निथळत ठेवा. कढई मधील पाणी टाकून द्या.
कढई किंवा पॅनमध्ये 2 टे स्पून बटर गरम करून त्यामध्ये किसलेले लसूण घालून मंद विस्तवावर 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये टोमॅटो सॉस, मिक्स्ड ह्रब्स व चिलीफ्लेस्क घालून थोडेसे मीठ घालून 1 मिनिट मंद विस्तवावर परतून त्यामध्ये उकडलेले स्वीट कॉर्न घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मसाला सर्व स्वीट कॉर्न ला लागला पाहिजे.
आता गरम गरम टेस्टि स्पायसी गार्लिक बटर स्वीट कॉर्न कोथिंबीरनी सजवून सर्व्ह करा.