Easy And Zatpat Paneer 65 | Chili Paneer In Marathi
झटपट सोपे ढाबा स्टाइल पनीर 65 | पनीर चिली एकदा असे बनवा रोज बनवायल
आपण पनीर वापरुन नवीन नवीन पदार्थ बनवू शकतो. आज आपण पनीर वापरुन पनीर 65 ही स्टार्टर रेसीपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत.
पनीर 65 बनवताना अगदी ताजे पनीर वापरायचे आहे. त्यामुळे त्याची चव मस्त लागते. पनीर 65 आपण ढाबा स्टाइल बनवणार आहोत. ही एक स्टार्टर रेसीपी आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण पाहुणे येणार असतील किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो.
साहित्य:
200 ग्राम पनीर
3 टे स्पून कॉर्नफ्लोर
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
7-8 कडीपत्ता पाने
1 1/2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टे स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल फ्राय करण्यासाठी
तडका करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1” आले (उभे पातळ चिरून)
2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
7-8 कडीपत्ता पाने

कृती: पनीरचे छोटे छोटे क्युब बनवून बाजूला ठेवा. एका बाउलमध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आल-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, मीठ, कोथिंबीर, कडीपत्ता मिक्स करून त्यामध्ये पनीर क्युब घालून मिक्स करून घेऊन मग त्यामध्ये लिंबुरस घालून मिक्स करून घ्या.
आता त्यामध्ये 1/4 वाटी पाणी घालून आपण भजाचे जसे पीठ भिजवतो तसे भिजवून घ्या. प्रतेक पनीरच्या क्युबला मिश्रण लागले पाहिजे.
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की त्यामध्ये एक एक पनीर क्युब घालून मध्यम विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व पनीर क्युब तळून घ्या.
पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता पाने, हिरवी मिरची घालून 1 मिनिट परतून घेऊन त्यामध्ये तळलेले पनीर 65 टाकून टॉस करा.
आता गरम गरम पनीर 65 सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर टाका.