12 August 2025 Angarki Chaturthi Tithi, Mahatva, Upay Mantra In Marathi
12 ऑगस्ट 2025 अंगारकी चतुर्थी तिथी, महत्व, उपाय व मनोकामना पूर्ती मंत्र
अंगारकी चतुर्थी 2025, मंगळवार 12 ऑगस्ट
चतुर्थी तिथि प्रारंभ: 12 ऑगस्ट 2025 सकाळी 08:40
चतुर्थी तिथि समाप्त: 13 ऑगस्ट 2025 सकाळी 06:35 पर्यन्त
अंगारकी चतुर्थी चंद्रोदय: 12 ऑगस्ट रात्री 9:18
अंगारकी चतुर्थीचा उपवास हा हिंदु लोकांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. मंगळवार ह्या दिवशी चतुर्थी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. अंगारकी चतुर्थी चे व्रत हे भगवान गणेश ह्यांना समर्पित आहे. त्यालाच अंगारकी संकष्टी चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. चतुर्थी हा दिवस पूर्णिमा झाल्यावर चौथ्या दिवशी येतो.
अंगारकी चतुर्थी हा दिवस सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये अगदी शुभ दिवस मानला जातो. मराठी लोकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रात हा दिवस खूप शुभ म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात ह्या दिवशी सर्व गणेश मंदिरात विशेष रूपात पूजा करून साजरा करतात.
अंगारकी चा अर्थ आहे “जळलेल्या कोळशा सारखा लाल” हिंदु भक्तांना विश्वास आहे की ह्या दिवशी पूजा व व्रत ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांनी भगवान मंगळ ह्यांना आशीर्वाद दिला होता, म्हणून ह्या दिवशी जो कोणी मनोभावे पूजा करून व्रत करतो त्यांना भगवान गणेश बरोबर भगवान मंगळ ह्यांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्या जीवनातील संकट दूर होऊन आपले जीवन शांतिपूर्ण होते.
अंगारकी चतुर्थी महत्व:
अंगारकी चतुर्थीचे महत्व व अनुष्ठानचा उल्लेख “गणेश पुराण” व स्मृति कौस्तुभ’ सारख्या धार्मिक ग्रंथामध्ये मिळतो. गणेश भक्त भगवान गणेशची पूजा करून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात. भगवान गणेश ह्यांना बुद्धीचे सर्वोच्च स्वामी व सर्व बाधा दूर करणारे मानले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत ठेवल्याने संपूर्ण वर्षातील चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते. तसेच श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा उपवास ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होऊन लाभ मिळतात.
अंगारकी चतुर्थी अनुष्ठान म्हणजेच पूजाविधी:
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भक्त सकाळी पासून संध्याकाळ पर्यन्त उपवास ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यावर नेवेद्य दाखवून उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थी हा शब्द संस्कृत भाषेतून अंगारक ह्या शब्दा पासून आला आहे. हा खूप शुभ दिवस आहे.
आपल्याला जर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी करायची असेलतर आपण अंगारकी चतुर्थीचे व्रत ठेवून मग दर महिन्याला संकष्टी चतुर्थी करू शकता. अंगारिका संकष्टी चा अर्थ संकटा पासून मुक्ती मिळणे. हे व्रत जरूर करावे त्यामुळे सर्व समस्या दूर होतात. भगवान गणेशना सर्व बाधा दूर करणारा व बुद्धीचा सर्वोच्च स्वामी मानले जाते. चंद्रोदय होण्याच्या अगोदर गणेश भगवान ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ‘गणपति अथर्वशीर्ष’ चे पठन करावे.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण श्रद्धा व समर्पण नी भगवान गणेश ह्यांची पूजा केल्याने त्याचा आशीर्वाद व कृपा मिळते. आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करतात.
अंगारकी चतुर्थी विशेष मंत्राचा जाप करणे फलदायी आहे:
– ॐ गं गणपतये नमः
– वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
– ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करावयाचे उपाय:
आपण जर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी शोधत असालतर ह्या दिवशी सकाळी स्नान करून बेसन साजूक तुपामध्ये भाजून पिठीसाखर घालून त्याचे लाडू बनवून भगवान गणेश ह्यांची पूजा करून त्याचा नेवेद्य दाखवून 3 प्रदक्षिणा घालावी मग चांगल्या नोकरीसाठी प्रार्थना करून नेवेद्य दाखवावा.
* आपल्या विवाहित जीवनात सुखाच्या आयवजी समस्या असतील तर सुखी जीवनासाठी संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची पूजा करून हवन करावा.

* आपण खूप परिश्रम घेऊन सुद्धा आपल्या मेहनतीला यश येत नसेलतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी “गं गणपतये नम: ह्या मंत्राचा 11 वेळा जाप करावा. मंत्र जाप करताना भगवान गणेश ह्यांना पुष्पांजलि अर्पित करावी.
* आपल्या परिवारातील सदस्याची तबेत ठीक नसेलतर ह्या दिवशी 3 गोमती चक्र, 11 नागकेशर च्या जोड्या व 7 कवड्या एका पांढऱ्या कापडात बांधून ज्या व्यक्तीची तबेत ठीक नाही त्याच्या वरून 6 वेळा उतरवून (घड्याळाच्या दिशेने) व 1 वेळा उलट्या दिशेने फिरवून गणेश मंदिरात ठेवावे.
* आपल्या जीवनात सुख-शांती व परेशानी असतीलतर संकष्टी चतुर्थी च्या दिवशी भगवान गणेश ह्यांना दूर्वा अर्पित करून गणेश गायत्री मंत्र जाप करावा.
मंत्र: ‘एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।’