Delicious Zatpat Vatlelya Daliche Ladoo For Bhog In Marathi
स्वादिष्ट सोपे वाटलेल्या डाळीचे लाडू कुकरचा वापर करून कमी तुपात एकदा बनवा नेहमी बनवाल
आपण नेहमी बेसन लाडू, किंवा नाराळाचे लाडू किंवा अजून बरेच निरनिराळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो. पण आज आपण अगदी नवीन पद्धतीने निराळे लाडू बनवणार आहोत.
आपण चनाडाळ भिजवून त्याचे लाडू बनवणार आहोत. लाडू बनवताना आपण कधी कुकरचा वापर केला आहे का नाही ना मग आज आपण कुकरचा वापर करून लाडू बनवणार आहोत.
चनाडाळ भिजवून त्याचे लाडू खूप स्वादिष्ट लागतात व दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 12 लाडू बनतात
साहित्य:
1 वाटी चनाडाळ
1 वाटी साखर
3 टे स्पून तूप
काजू, बदाम-किसमिस
1 टी स्पून वेलची पावडर

कृती: प्रथम चनाडाळ स्वच्छ धुवून 5 तास पाण्यात भिजत ठेवा, मग पाणी काढून डाळ चाळणीवार काढून ठेवा. मग मिक्सरच्या भांड्यात चनाडाळ घेऊन बारीक वाटून घ्या, पाण्याचा वापर करायचा नाही डाळ तशीच वाटून घ्यायची.
मग एका स्टीलच्या छोट्या डब्याला थोडेसे तूप लाऊन त्यामध्ये वाटलेली डाळ काढून एक सारखे पसरवून घ्या.
कुकरमध्ये पाणी घालून गरम झालेकी त्यामध्ये डब्बा ठेवून त्यावर झाकण लावा, मग कुकरचे झाकण लाऊन मध्यम विस्तवावर 4 शिट्या काढून घ्या, 4 शिट्या झाल्यावर विस्तव बंद करून कुकर थंड होऊ द्या. आता कुकर मधील डब्बा बाहेर काढून ठेवा, झकण काढून शिजवलेली डाळ थंड होऊ द्या.
आता शिजवलेली डाळ घेऊन त्याचे 4 भाग कापून घ्या. मग एक भाग घेऊन किसणीवर किसून घ्या, आता चार ही भाग किसून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये 2 टे स्पून तूप घाला. तूप गरम झालेकी त्यामध्ये किसलेले मिश्रण घालून मिक्स करून 10-12 मिनिट मंद विस्तवावर छान खमंग भाजून घ्या, रंग छान गोल्डन आला की त्यामध्ये चीरलेले ड्रायफ्रूट घालून मिक्स करून 2 मिनिट परतून मग एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्या.
पॅनमध्ये 1 वाटी साखर व 1/2 वाटी पाणी घालून मंद विस्तवावर एक तारी थोडा चिकट असा पाक बनवून घ्या. पाक थोडा चिकट झाला की त्यामध्ये खमंग भाजलेले मिश्रण घालून मिक्स करून घ्या, पाक घट्ट नको नाहीतर लाडू कडक होतील. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. मग मिश्रण थोडे थंड झालेकी हातांनी सारखे करून त्याचे मस्त गोल गोल लाडू वळून घ्या.
आपले वाटलेल्या डाळीचे खमंग स्वादिष्ट लाडू नेवेद्य दाखवण्यासाठी रेडी आहे.