श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
31 मार्च श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, 3 सेवा सुखी जीवनासाठी, मुलांसाठी व सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी
Shri Swami Samarth Prakat Din Sewa From 11 March In Marathi
31 मार्च 2025 सोमवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रकट दिन आहे. त्यासाठी आपण श्री स्वामीची सेवा करावी अशी विनंती आहे. आपण 3 वेगवेगळ्या सेवा करू शकता.
श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रकट दिन 31 मार्च ह्या दिवशी असून आपण 21 दिवसांची सेवा करायची आहे. ही सेवा आपण 11 मार्चला सुरू करून 31 मार्च पर्यन्त करायची आहे.
पहिली सेवा:
आपण श्री स्वामी महाराजांचे 21 अध्याय रोज वाचू शकता, समजा रोज 21 आध्याय वाचने शक्य नसेलतर रोज 3 आध्याय नक्की वाचा.
दुसरी सेवा:
आपण रोज 11 वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता. तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर एका तांब्याच्या लोटयामध्ये किंवा भांड्यात पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्राचा जाप करावा, मंत्रजाप झाल्यावर तांब्यातील पाणी घरातील व्यक्तिना तीर्थ म्हणून द्यावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील.
तिसरी सेवा:
आपण ही सेवा करताना फक्त पुढे दिलेला अगदी सोपा षडा:क्षरी मंत्र म्हणायचा आहे. रोज किमान 108 वेळा मंत्र जाप करावा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केला तरी चालेल.
मंत्र: “श्री स्वामी समर्थ”

आपण सेवा सुरू करताना श्री स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर दिवा, आगरबती लावावी, फुले अर्पित करावीत. खडीसाखर ठेवावी. आपण आपल्या मनातील काही इछा असतील तर स्वामींना सांगव्या तसे स्वामी आपल्या मनातील सर्व इछा आपोआप समजून घेतात. आपल्या उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा व स्वामींना प्रार्थना करावी की आपण जो संकल्प करीत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळू दे. मग पाणी आपण ताम्हणात सोडायचे आहे. मग आपण सेवा सुरू करायची आहे. आपण हा संकल्प आपल्या घरी स्वामीच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून सुद्धा करू शकता किंवा स्वामीच्या मठात जाऊन सुद्धा करू शकता. पहिल्या दिवशी फक्त एकदा संकल्प करायचा आहे रोज नाही.
मंत्र जाप करताना आपण कोणती सुद्धा जाप माल वापरावी. स्वच्छ आसन घेऊन त्यावर बसावे व मंत्र जाप सुरू करावा. आपण इतर वेळी सुद्धा मंत्र जाप करू शकता म्हणजे आपण उठता बसता, काम करताना, प्रवास करताना सुद्धा करू शकता. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत:
21 दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये सात्विक जेवण सेवन करावे. शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते. मासिक पाळी असेलतर ही सेवा करू नये
आपण ही सेवा दिवस भरात कधी सुद्धा करू शकता. फक्त सकाळी 12 ते 12:30 ह्या वेळत सेवा करू नये. कारणकी ही वेळ स्वामींची भिक्षेची वेळ आहे.
आपण ही सेवा शक्य असेल तेव्हडे दिवस करू शकता, उदा. 21 दिवस, 11, दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा प्रकट दिवसाच्या दिवशी.
श्री स्वामी समर्थ ह्यांचे नामस्मरण करण्याचे महत्व:
प्रारब्धाची तीव्रता कमी होते.
मन शांत व आनंदी राहते.
सेवा केल्याचे समाधान मिळते
आपली वास्तु शुद्ध होते व वास्तु दोष असेलतर निघून जातो
प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते
घरात सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते
संसारीक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात
घरातील व्यक्तिमद्धे प्रेमभाव निर्माण होतो
घरात भगवंताचा वास राहतो.
काळजी मिटून भीती जाते
संकटाला सामोरे जाण्याच्या शक्ति मिळते
आपण स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते
आपल्या सदगुणांत जलद गती येवून वृद्धी होते
साकक्षांत सद्गुरूनचा हात आपल्या मस्तकी असतो.