होळी पूर्णिमा खास उपाय सर्व बाधा दूर धनप्राप्ती होईल शुभ महूर्त पूजाविधी यंदा भद्राचे सावट
यंदा भद्राचे सावट काय करावे?
Holi 2025 Upay Shubh Muhurat Puja Vidhi Bhadra Sawant In Marathi
13 मार्च 2025 गुरुवार ह्या दिवशी होळी पूर्णिमा आहे व 14 मार्च शुक्रवार ह्या दिवशी रंगाचा सण म्हणजेच रंगाची होळी खेळायची आहे.
13 मार्च 2025, गुरुवार शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथी सूर्योदय सकाळी 10:35 मिनिट भद्र सुरू होत असून रात्री 11:26 मिनिट पर्यन्त आहे. त्यामुळे होळी दहन रात्री 11:26 मिनिट नंतर करायचे आहे. पूर्णिमा व्रत 13 मार्चला आहे. भद्र काळात होळी दहन हे शास्त्रामध्ये निषध मानले आहे. म्हणूनच होळी दहन भद्र काळा नंतर करावे असे म्हणतात. होळी दहनचा मुहूर्त रात्री 11 वाजून 26 मिनिट पासून रात्री 12 वाजून 18 मिनिट पर्यन्त आहे.
14 मार्च 2025 शुकवार पूर्णिमा दुपारी 12 वाजून 23 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून दुपार नंतर रंगांची होळी साजरी करायची आहे.
14 मार्च होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण आहे, पण चंद्र ग्रहणचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही त्यामुळे ह्या ग्रहणचे सूतक मान्य नाही. भारतामध्ये ग्रहण दिसणार नाही त्यामुळे कोणते सुद्धा नियम पाळायची जरूरत नाही.
होळीच्या दिवशी करा हे उपाय:
होळीच्या दिवशी होळीच्या वेळी घरातील सर्व व्यक्तींनी एका वेळीच होळीला प्रदक्षिणा घालणे शुभ आहे. प्रदक्षिणा मारताना होळीमध्ये चणे, मटर, गहू, जवस जरूर घालावे. त्यामुळे धनलाभ होण्यासाठी अचूक उपाय आहे.
होळीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडा खाली तुपाचा दिवा लाऊन 7 प्रदक्षिणा माराव्या. असे केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम देवळाट जाऊन देवी देवतांना गुलाल लावावा मगच होळी खेळावी.
होळी पेटल्यावर त्यामध्ये कपूर टाकावा त्यामुळे आसपास असणारी हानिकारक किटाणू नष्ट होतात.
होळी पेटल्यावर त्यामध्ये थोडे मोहरीचे दाणे अर्पित करावे व माता लक्ष्मीचे स्मरण करावे. त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा होईल.
होळीची पूजा कशी करायची व नियम:
हिंदू शास्त्रा नुसार होळी दहन भद्र काल नसताना पूर्णिमा तिथीमध्ये करायला पाहिजे. घरात सुख-शांती समृद्धी येण्यासाठी होळी दहन करण्याच्या अगोदर होळीची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे.
होळी दहनच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूजा थालीमध्ये पूजेचे साहित्य, म्हणजेच रोली, माळ, नारळ, धागा, हळकुंड, मुग, गुलाल, व 5 प्रकारचे धान्य, गव्हाच्या ओंबया व 1 लोटा पाणी घ्या. होळीच्या वेळी घरातील व्यक्तींनी प्रदक्षिणा मारताना होळीला धागा बाधवा. मग विधीपूर्वक पूजा करावी व कलशामधील पाणी घेऊन अर्ध्य द्या. मग सूर्यास्ता नंतर भद्र झाल्यावर होळी दहन करावी. होळीची राख खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख
आपल्या शरीरावर लावावी त्यामुळे रोज निवारण होऊन दुखाचा नाश होईल.
होळी दहन करण्याच्या अगोदर परिवारातील व्यक्तिनी थंड होळीची पूजा करावी त्यामुळे परिवारात सुख समृद्धी येऊन वाईट शक्ति दूर हातात, ही पूजा विवाहित महिला करतात. त्यामुळे परिवारात संकट येत नाही. संतान दीर्घायुषी व सुखी होते.