ब्रह्म मुहूर्त वेळ, त्याचे रहस्य व ह्यावेळी जे मागाल त्या मनोकामना पूर्ण होतील
Brahma Muhurta Time, Benefits And Mantra In Marathi
आपल्याला वाटत असेलकी आपल्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हाव्यात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ब्रह्म मुहूर्त वर उठून पुढे दिलेला मंत्र जाप व ध्यान करावे.
ब्रह्म मुहूर्तचे आश्चर्य कारक फायदे:
आपल्या घरातील वयस्कर व्यक्ति नेहमी म्हणतात की ब्रह्म मुहूर्तवर उठले पाहिजे. आपण कधी हा विचात केला का की ब्रह्म मुहूर्तवर का उठावे? आपण पहिले असेलच आपल्या घरातील वयस्कर व्यक्ति अजूनसुद्धा ब्रह्म मुहूर्तवर उठतात. खर म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये त्याचे रहस्य लपलेले आहे. ब्रह्म मुहूर्त ही वेळ अशी आहे की ह्यावेळी आपण ईश्वराचे ध्यान केलेतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
ब्रह्म मुहूर्तची वेळ:
सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या आधी म्हणजेच सुर्योदयाच्या आधी 1 तास 36 मिनिट ही ब्रह्म मुहूर्तची वेळ असते. ह्या वेळेला ब्रह्म देवाची वेळ मानली जाते. ब्रह्मदेवानीच सृष्टिची रचना केली आहे त्यामुळे ही वेळ त्यांचीच आहे. ब्रह्म मुहूर्त वेळ ही प्रतेक देशात विभिन्न असते. सूर्योदयाच्या वेळवर ती समजली जाते. पण 48 मिनिटाची वेळ ही आपल्या सर्व शंका निरसन करते.
ब्रह्म मुहूर्त ची वेळ ही 48 मिनिटांची असते त्यावेळे मध्ये आपण आपली किस्मत बदलू शकतो. ह्या वेळे मध्ये ध्यान केले पाहिजे कारणकी ह्या वेळेमध्ये कोण, काय केव्हा ह्याचे जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न निघून जातात. ह्या वेळेमध्ये आपण फक्त आपल्या बरोबर असतो व आपण ह्या वेळेत आपल्या आत्माशी जोडले जातो. त्यामुळे आपण सरल परमात्माशी जोडले जातो.
सकाळी ध्यान केल्यावर आपण फक्त कल्पना केली पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टीचा विचार ब्रह्म मुहूर्तवर केला पाहिजे.

ब्रह्म मुहूर्तवर काही चांगले वाचावे:
ब्रह्म मुहूर्तच्या वेळी काही चांगले वाचावे. म्हणून स्टूडेंट्स ना ह्या वेळी अभ्यास करण्यास सुचवले जाते. कारण की ह्या वेळी अभ्यासात चांगले लक्ष लागते. व जे वाचलेले असते ते कायम स्वरूपी लक्षात राहते. फक्त सरावाची जरूरत असते.
ब्रह्म मुहूर्तवर म्हणावयाचा चमत्कारी मंत्र:
।।करागे वसति लक्ष्मी, करमध्ये सरस्वती। कर मूले स्थितो ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम्॥
ब्रह्म मुहूर्तवर उठल्यावर ह्या मंत्राचा जाप केला पाहिजे मंत्र म्हणताना आपले दोन्ही हात जोडले पाहिजेत. मंत्र जाप केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जानी होते व आपले शरीर आनंदी होऊन आपली सर्व कामे व्यवस्थित पार पडतात.