8 मार्च महिला शक्ति दिवस म्हणून खास का मानला जातो?
8 March International Women’s Day History In Marathi
8 मार्च दरवर्षी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस महिलांसाठी महत्व पूर्ण आहे कारणकी महिलांना समाजात समान हक्क मिळाला पाहिजे व त्यांचा सन्मान केला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे काय की ह्या दिवसाची सुरवात कशी झाली? व त्याचे काउ महत्व आहे.
महिलांचा सन्मान ही परंपरा किंवा एक औपचारिकता नसून समाजातील उन्नती व विकास ह्या वर अवलंबून आहे. आपण जेव्हा महिलांच्या ताकदीचा विचार करतो तेव्हा 8 मार्चचा दिवस आपोआप एक प्रतीक दिवस म्हणून मानला जातो.
8 मार्च ही फक्त एक तारीख नसून, नारी शक्तिचा संघर्ष, संकल्प, व सफलता चा उत्सव आहे. जगभरात हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मानला जातो. पण आपल्याला माहिती आहे का ह्या दिवसाची सुरवात कधी व कशी झाली?
महिला दिवस सुरुवात कधी झाली?
आजकाल महिला प्रतेक क्षेत्र मध्ये आपली ओळख निर्माण करीत आहेत. पण हे काही इतके सोपे नव्हते. एक वेळ अशी होती की महिलाना शिक्षण दिले जात नव्हते, व्होट पण दिले जात नव्हते व पुरुषाच्या बरोबर समान हक्क दिले जात नव्हते. म्हणून
महिलांनी असमानताच्या विरुद्ध आवाज उठवला, सण 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरमध्ये 15,000 महिलानी एक मोठा मोर्चा केला, कमी पगार, चांगले काम, व्होट करण्याचा अधिकार मागितला. अश्या आंदोलनांनी पूर्ण जगाचे लक्ष वेधले मग 1910 मध्ये डेन्मार्क मध्ये जागतिक महिला संमेलन झाले, मग संमेलन मध्ये जर्मनीची समाजवादी नेता क्लारा जेटकिन ने असा प्रस्ताव ठेवलंकी प्रतेक वर्षातील एक दिवस महिलांचे अधिकार व समानता ह्याचा आदर केला पाहिजे. मग बऱ्याच देशांनी हा विचार आचरणात आणला व 1911 मध्ये प्रथम ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी व स्विट्जरलैंड मध्ये अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मानला जाऊ लागला.
8 मार्चला महिला दिवस म्हणून का मानला जातो?
रूसमध्ये 1917 मध्ये क्रांति झाली तेव्हा महिलांनी मोठ्या संखेने प्रदर्शन केले त्यांनी युद्धच्या विरुद्ध आवाज उठवला की चांगले अधिकार मिळाले पाहिजेत. महिलांच्या ह्या आंदोलनामुळे तेथील सरकार नी माघार घेऊन महिलांना व्होटिगचे अधिकार दिले. तो दिवस 8 मार्च होता. म्हणून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मानला जातो. मग संयुक्त राष्ट्र (UN) ने 1977 मध्ये 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केले.

महिला दिवस हा खास का आहे?
आज महिला पुरुषांच्या बरोबरीनी काम करतात त्यांना अधिकार सुद्धा मिळाले आहेत पण अजून सुद्धा समाजात लैंगिक असमानता, घरेलू हिंसा, वेतन मध्ये भेदभाव व महिला शिक्षा असे अजून मुद्दे आहेत, म्हणूनच हा दिवस महिलांचा सन्मान, सुरक्षित व सशक्त समाज ह्यामध्ये अजून प्रयत्न केले पाहिजेत.
महिला दिवस मानण्याचा काय कारण आहे?
महिलांना अधिकार मिळण्यासाठी जागरूकता वाढवली पाहिजे.
महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवले पाहिजे
लैंगिक समानता साठी झटले पाहिजे.
महिला शिक्षा, स्वास्थ्य, व रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे
नारिशक्तीला सलाम केला पाहिजे
आज महिला प्रेतक क्षेत्रमध्ये आपली ओळख बनवत आहेत. राजकीय क्षेत्र असो, विज्ञान असो किंवा खेळ असो किंवा कला किंवा व्यापार असो.
कल्पना चावला नी अंतरिक्ष मध्ये भरारी घेऊन आपल्या भारताचे नाव मोठे केले होते.
मैरी कॉम ने बॉक्सिंग मध्ये विश्व विजेता बनून नारी शक्तिची मिसा दाखवली होती.
इंदिरा गांधीह्या भारताच्या पहिल्या महिला प्रधान मंत्री झाल्या होत्या.
अजून अश्या बऱ्याच महिला आहेत त्यांनी आपल्या कर्तुत्वनी कमाल करून दाखवली होती. म्हणून महिला दिवसच्या दिवशी महिलांना सन्मान, अधिकार दिले पाहिजेत त्यामुळेच एक चांगला समाज बनतो.