Krishna Janmashtami 2022 Muhurat | Puja Vidhi | Mahiti | Panjiri Sunthwada Bhog in Marathi

Krishna Janmashtami 2022
Krishna Janmashtami 2022 Muhurat | Puja Vidhi | Mahiti | Panjiri Sunthwada Bhog

कृष्ण जन्माष्टमी मुहूर्त | पूजाविधी | माहिती | भोग पांजिरी व सुंठवडा | चुकून सुद्धा ह्या गोष्टी करू नका 

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी ह्या तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. ह्या वर्षी 18 ऑगस्ट 2022 ह्या दिवशी श्री कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. तसेच संपूर्ण भारतात हा दिवस खूप उत्साहात साजरा करतात. रात्री 12 वाजता कान्हाचा जन्म झाला व त्यान प्रसन्न करण्यासाठी नानाविध पकवान अर्पित केली जातात. त्याना झोपाळ्यात बसवले जाते. कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी काही कार्य केली नाही पाहिजेत नाहीतर आपण केलेली पूजा लाभत नाही.

The text Krishna Janmashtami 2022 Muhurat | Puja Vidhi | Mahiti | Panjiri Sunthwada Bhog in Marathi be seen on our You tube Chanel Krishna Janmashtami 2022

श्रीकृष्ण हयाना पुढील दिलेल्या 5 वस्तु अतिप्रिय आहेत. व ह्या वस्तु फार महत्व पूर्ण आहेत त्या पूजेमद्धे जरूर शामील कराव्यात नाहीतर आपली पूजा अपुरी आहे असे मानले जाईल.
धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री कृष्ण ह्यांचा जन्म श्रावण महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी ह्या दिवशी झाला व ह्या वर्षी 18 ऑगस्ट ह्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीआहे. भगवान कृष्ण ह्यांच्यामध्ये 64 कला आहेत. कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी रात्री 12 वाजता जन्म झाल्यावर मग उपवास सोडावा.

त्यांची पूजा करताना त्यांच्या प्रिय 5 वस्तु पूजामध्ये शामील केल्याने त्यांची विशेष कृपा मिळते.
मोरपंख म्हणजेच मोरपिस:
आपल्याला माहीत आहेच की श्री कृष्ण आपल्या मुकुटमध्ये मोरपंख लावतात. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजेमद्धे मोरपंख जरूर ठेवावे. मोरपंख घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते.

मुरली म्हणजेच बासुरी:
कन्हैया ला मुरली अति प्रिय आहे. म्हणूनच त्यांना मुरलीधर सुद्धा म्हणतात. जर आपल्याला श्री कृष्णची कृपा पाहिजे असेलतर पूजेमद्धे बासुरी नक्की ठेवा.

शंख:
शंख शुभ मानला जातो. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी कान्हाला आंघोळ घालताना व पूजेमद्धे वाजवने शुभ मानले जाते.

तुलसी म्हणजेच तुळस:
पूजेचा प्रसाद हा तुळशीच्या पानाशिवाय अपुरा आहे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी प्रसाद मध्ये तुळस ठेवावी. कारण की भगवान कृष्ण हयना तुळस प्रिय आहे. प्रसाद मध्ये तुळस ठेवल्यास भगवान कृष्ण प्रसन्न होतात. व ते आपल्याला मनचाहा वरदान देतात.

जन्माष्टमी 2022 कृष्ण पूजा मुहूर्त | Krishna Janmashtami 2022 Muhurat
कृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्ट 2022 गुरुवार ह्या दिवशी असून रात्री 12 ते 1 वाजेपर्यन्त शुभ वेळ आहे ह्या वेलेत कृष्ण जन्म करावा.

Krishna Janmashtami 2022
Krishna Janmashtami 2022 Muhurat | Puja Vidhi | Mahiti | Panjiri Sunthwada Bhog

कृष्णा जन्माष्टमी महत्व | Significance of Krishna Janmashtami
हिंदू धर्मामध्ये भगवान श्री कृष्ण ह्याचा जन्म दिवस खूप धाम धुमीत साजरा करतात.
कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी महिला संपूर्ण दिवस उपवास करतात. मग त्यांच्या मूर्तीला रीतसर स्नान घालतात पूजा अर्चा करून देवळात दिवे लावून श्री कृष्ण भगवान ह्याच्या जन्माची वाट पहातात.
ह्या व्रताला व्रतराज असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी व्रत केल्यास चांगले लाभ होतात.
आपण जर श्री कृष्ण भगवान ह्यांना पाळण्यात झुलवले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात

जन्माष्टमी पूजा विधि | Janmashtami Puja Vidhi
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. मग पूजेची जागा स्वच्छ करून तेथे चौरंग ठेवावा त्यावर लाल रंगाचे कापड घालावे. मग त्यावर श्री कृष्णची मूर्ती ठेवावी.
मग अगदी मनापासून ध्यान करून पंचामृतने स्नान घालावे. मग गंगा जल नी स्नान घालावे.
त्यानंतर श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण ह्यांना वस्त्र घालावे व संपूर्ण शृंगार करावा.
मग कुमकुम लाऊन अक्षता अर्पित कराव्या.
मग श्री कृष्ण भगवान ह्यांचे आवडतीचे दही भोग म्हणून दाखवावे त्यामध्ये तुलसी घालायला विसरू नका. मग गंगाजल सेवन करायला द्या. मनोभावे प्रार्थना करा.

कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी पुढील गोष्टी करणे वर्ज आहे.

तुळशीच्या झाडाची पाने तोडू नका:
श्री कृष्ण हे भगवान विष्णुचे आवतार मानले जातात व तुळशी ही भगवान विष्णूची अति प्रिय आहे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पाने तोडू नका. श्री कृष्ण भगवान ह्यांना प्रसादमध्ये तुळशी अर्पित करायची तर आधल्या दिवशीच तोडून ठेवा. कारणकी तुळशीच्या पानांना शिळे असे मानले जात नाही.

भात सेवन करू नये:
जसे एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज आहे तसेच कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी भात खाऊ नये. समजा आपण उपवास धरला नसेलतरी भात खाऊ नये.

सात्विक जेवण करा:
कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी सात्विक भोजन केले पाहिजे. ह्या दिवशी आल-लसूण सेवन केले नाही पाहिजे. कारणकी आल 0 लसूण हे तामसी अश्या पदार्थामध्ये असते. त्याच बरोबर ह्या दिवशी नॉनवेज व दारू सेवन केली नाही पाहिजे.

गाईला त्रास देऊ नये:
कान्हा ला गाय खूप प्रिय आहे. लहान पणी गाईला चारा खाऊ घायला घेऊन जायचे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी गाय किंवा तिच्या बछडया ला चुकून सुद्धा मारू नका किंवा त्रास देऊ नका असे केलेतर भगवान श्री कृष्ण नाराज होतात. उलट गाईची सेवा केल्यास भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतात.

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचा सुद्धा अपमान करू नका:
भगवान श्री कृष्ण ह्यांना गरीब किंवा श्रीमंत दोघे भक्त प्रिय आहेत. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचा सुद्धा अपमान करू नये. गरीब माणसाचा अपमान केल्यास श्री कृष्ण भगवान नाराज होतात,

श्री कृष्ण भगवान जन्माष्टमी भोग सुंठवडा व पांजिरी कशी बनवायची

सुंठवडा
साहित्य:
1 कप सुके खोबरे (पातळ तुकडे करून)
½ कप काजू बदाम
4 टी स्पून सुंठ पावडर
2 टी स्पून साखर
1 टी स्पून बडीशेप
½ टी स्पून वेलची पावडर
½ टी स्पून जायफळ
कृती: खोबऱ्याचे काप करून घ्या. मग एका [पॅन मध्ये सुके खोबरे गुलाबी रंगावर भाजून बाजूला ठेवा. मग बडीशेप भाजून बाजूला ठेवा. काजू बदाम थोडे भाजून घ्या.
मग मिक्सरच्या भांड्यात सुंठ पावडर, काजू बदाम, सुके खोबरे, साखर, वेलची, जायफळ घालून थोडे जाडसर वाटून घ्या.
मग एका वाटीत काढून श्री कृष्ण भगवान ह्यांना भोग दाखवा.

पांजिरी:
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
1 कप साखर (बुरा शक्कर)
1 टी स्पून वेलची पावडर
¼ कप काजू बदाम (चिरून )
2 टे स्पून चारोळी
1 टे स्पून खायचा डिंक (इछिक)
1 टे स्पून तूप

कृती: पण गरम करून त्यामध्ये तूप गरम करून गव्हाचे पीठ छान खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये बुरा शक्कर, वेलची पावडर, काजू बदाम, चारोळी घालून थोडे भाजून घ्या. डिंक घालायचा असेलतर थोडा तुपात भाजून बारीक करून घालावा. मग सर्व जिन्नस एक सारखे मिक्स करून विस्तव बंद करावा. थंड झाल्यावर भांड्यात काढून मग श्री कृष्ण भगवान ना नेवेद्य दाखवावा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.