Lal Kitab Upay | Lal Kitab Totke In Marathi

Lal Kitab
Lal Kitab Upay | Lal Kitab Totke

लाल किताब मधील उपाय खूप प्रयत्न करूनसुद्धा काम होत नाही करा हे उपाय करून परेशानी दूर करा 

आपण बऱ्याच वेळा पहात असलकी खूप प्रयत्न करून सुद्धा काही वेळेस आपले एखादे महत्वाचे काम होत नाही किंवा यश येत नाही व त्यामुळे आपण निराश होतो. मग आपल्याला वाटते की आपली मेहनत सगळी वाया गेली. पण जर आपल्याला ह्या असफलते पासून मुक्त व्हायचे असेलतर लाल किताब मधील काही उपाय किंवा टोटके आपल्याला मदत करतील व आपल्या जीवनातील समस्या दूर होऊन आपण आपले जीवन सुखी समाधानी घालवू शकतो. हे उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा मानले जातात. लाल किताब मध्ये ग्रह बाधा, शत्रू बाधा, नोकरी, व्यापार, आपले वैयक्तिक जीवन ह्या संबंधित समस्यांवर उपाय सांगितले आहेत. असे म्हणतात की लाल किताब मधील उपाय किंवा टोटके आपण श्रद्धा ठेऊन व पूर्ण आत्मविश्वानि केले तर नक्की सफलता मिळेल व आपल्या समस्या सुद्धा दूर होतील.

The text Lal Kitab Simple Totke Or Upay In Marathi be seen on our You tube Chanel Lal Kitab Easy Simple Totke Or Upay

लाल किताब मधील टोटके किंवा उपाय हे फार सोपे व सहज करण्या सारखे आहेत. आता आपण पाहू या हे सोपे उपाय काय आहेत.

Lal Kitab
Lal Kitab Upay | Lal Kitab Totke

पंचमुखी हनुमानजीनचे पूजन करावे:
आपण हातात कोणते काम करायला घेतो मग कितीही प्रयत्न केले तरी यश येत नाही. किंवा आपल्या प्रयत्नचे यश दुसरे घेतात. मग आपण निराश होतो. लाल किताब मध्ये अश्या वेळी काय करायचे ते आपण लाल किताब मधील उपाय पाहूया. त्यासाठी आपल्याला पंचमुखी हनुनामजीनची पूजा करावी. पूजा करताना एका मौलीमध्ये एक नारळ ठेऊन त्यावर तांदूळ, सिंदूर, व फूल अर्पित करा. असे केल्याने आपल्या कामात सफलता येईल.

गणेश मंत्र जाप करा:
आपण जर कोणत्या महत्वाच्या कामासाठी प्रयत्न करत आहात पण ते काम करण्यासाठी अडचणी येत असतील व टे काम पूर्ण होत नसेलतर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. खर म्हणजे आपण काम सुरू करण्याच्या अगोदर श्री गणेश भगवान ह्यांचा मंत्र म्हणून सुरुवात करावी. गणेश मंत्र अश्या प्रकारे आहे. ॐ श्री गणेशाय नमः कामाची सुरुवात करण्या अगोदर गणेश पूजन करून मंत्र जाप करून मग सुरुवात करा. कोणत्या सुद्धा कामाची सुरुवात करताना गणेश जीनचे पूजन करूनच मग सुरुवात करावी. समजा आपण बाहेर गावी आहात व आपल्याला काम सुरू करण्याच्या अगोदर गणेश पूजन करणे शक्य नाही तर कामा साठी बाहेर निघताना प्रथम 4 पावले मागे जा मग पुढे चालायला लागा असे केल्याने आपल्या कामात नक्की सफलता मिळेल.

नकारात्मक शक्तिपासून बचाव करण्यासाठी करा हे उपाय:
हा उपाय केल्याने नजर लागली असेलतर ती सुद्धा निघून जाते. त्यासाठी एक काळ्या रंगाचा सूती दोरा घ्या. आता ज्या व्यक्तिची नकारात्मक शक्ति काढायची आहे त्या व्यक्तीच्या वया इतक्या त्या सूती काळ्या दोऱ्याला गाठी मारा. जर त्या व्यक्तीचे वय 25 आहे तर 25 गाठी माराव्या. मग त्या गाठीवर तुळस व केळ्याचा अर्क लावावा मग हळद लावावी मग तो दोरा देवाच्या जवळ मंदिरात ठेवा. मग तो धागा म्हणजेच दोरा आपल्या डाव्या दंडावर बांधा. 21 दिवस दोरा तसाच दंडावर ठेवावा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाईन व आपली कार्य सिद्धी होईल.

काळ्या कुत्र्याला जेवण द्या:
जर आपण कोणते काम करीत आहात व टे पूर्ण होण्यासाठी अडचणी येत आहेत तर काळ्या कुत्र्याची सेवा करा त्याला जेवण द्या. व आपल्या पितरांची माफी मागा. त्याच बरोबर ज्याना गरम आहे त्यांची मदत करा. असे म्हणतात की असे केल्याने तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल व समस्या दूर होतील.

नोट :
1. लाल किताब मधील उपाय किंवा तोटके दिवसा म्हणजे सूर्योदय झाल्यावर व सूर्यास्त होण्याच्या आता करावे.
2. खरे बोलावे व शाकाहारी भोजन करावे.
3. लाल किताब मधील उपाय करताना खोटे बोलणे, मांस, खोटे वचन, परस्त्री, दारू सेवन करणे वर्ज आहे.
4. उपाय करताना पूर्ण विश्वास व श्रद्धा पूर्वक करावे म्हणजे फायदा होईल.
5. रोज एकच उपाय करा जर अजून उपाय करणार असाल तर छोटा उपाय पहिले करावा व दूसरा उपाय करणार असाल तर त्याचे सामान पहिला उपाय झाल्यावर मगच घरात आणावे आधीच आणू ठेवू नये.
6. कोणता सुद्धा उपाय करताना पहिला उपाय पूर्ण करून मगच दूसरा उपाय सुरू करावा अर्धवट उपाय सोडू नये.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.