Lal Kitab 9 Easy Simple Totke Or Upay Part-II In Marathi

Lal Kitab
Lal Kitab 9 Easy Simple Totke Or Upay Part-II

लाल किताब मधील सटीक सोपे घरगुती टोटके उपाय भाग-2 

माणूस म्हंटले की समस्या, पीडा, आर्थिक संकट, विवाह, आजारपण, नोकरी-व्यवसाय मधील परेशानी, मुलांचे प्रश्न, कोर्ट केस अश्या नानाविध प्रकारच्या समस्या आल्याच. पण आपण त्यामधून सुखरूप बाहेर पडू शकतो. त्यासाठी लाल किताब मधील काही सोपे व सरल टोटके आहेत. हे टोटके कोणी सुद्धा व्यक्ति अगदी सहज रित्या करू शकतो.

The text Lal Kitab 9 Easy Simple Totke Or Upay Part-II In Marathi be seen on our You tube Chanel Lal Kitab 9 Easy Simple Totke Or Upay Part-II

आता आपण लाल किताब मधील काही सोपे घरगुती टोटके किंवा उपाय जे आहेत ते पाहू या.

Lal Kitab
Lal Kitab 9 Easy Simple Totke Or Upay Part-II

11. मानसिक परेशानी दूर करण्यासाठी:

रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानजीनचे पूजन करून हनुमान चाळीसाचे वाचन करावे. प्रतेक शनिवारी हनुमानजीना तेल वहावे. आपली एकदा वापरलेली चप्पल गरीबाला दान करावी.

12. आपल्या मुलांच्या उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुषासाठी:

१. एक काळा रेशमी दोरा घेऊन ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र म्हणत थोड्या थोड्या अंतरावर 7 गाठी माराव्या.

२. प्रतेक मंगळवारी आपल्या मुलाच्या डोक्यावरून कच्चे दूध 11 वेळा उतरवून संध्याकाळी जंगली कुत्र्याला प्यायला द्यावे. त्यांच्यामुळे आपल्या मुलाला दीर्घायुष लाभेल.

13. कोणत्या रोगानी त्रस्त असाल तर:

रात्री झोपताना पूर्व दिशेला तोंड करून झोपावे व झोपताना आपल्या खोलीत एका वाटीत थोडेसे सेंधा नमक म्हणजेच रॉक सॉट ठेवा तब्येत चांगली राहील.

14. प्रेम विवाहमध्ये सफलता मिळण्यासाठी:

जर आपल्याला प्रेम विवाहमध्ये अडचणी येत असतील तर शुक्ल पक्षमध्य मधील गुरुवार ह्या दिवसा पासून विष्णु व लक्ष्मी माता ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती च्या समोर बसून स्पटिक च्या जाप माळनी रोज 3 माळा तीन महीने लक्ष्मी माताचा जाप करावा तसेच तीन महीने दर गुरुवारी मंदिरात जाऊन प्रसाद ठेऊन प्रार्थना करावी की आमच्या विवाहामध्ये सफलता मिळू दे.

15. नौकर जर टिकत नसेल किंवा परेशान करत असेलतर:

मंगळवारी गोड बुंदीचा प्रसाद घेऊन देवळात जावे व तो प्रसाद मुलींमद्धे वाटावा. असे चार मंगळवार करावे.

16. कोणते सुद्धा महत्वाचे काम बनता बनता बिघडत असेल किंवा परेशानी होत असेल: प्रतेक मंगळवारी लक्षी माताच्या मंदिरात जाऊन मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या लोकाना गोड बुंदीचा प्रसाद वाटावा.

17. जर आपल्याला चांगली नोकरी मिळण्यासाठी प्रॉब्लेम येत असेलतर:

१. पाणी असलेल्या विहिरीत दूध टाका.

२. काळे ब्लँकेट गरीब माणसाला दान करावे.

३. 6 मुखी रूद्राक्ष माळा त्यामध्ये 108 रुद्राक्ष पाहिजे व प्रतेक रुद्राक्ष नंतर एक चांदीचा तुकडा घालून माळ बनवावी. मग ती गळ्यात घालावी.

18. जर आपले प्रमोशन होत नसेलतर:

१. गुरूवार ह्या दिवशी कोणत्या सुद्धा मंदिरामध्ये पिवळी वस्तु किंवा खाद्य पदार्थ, फळ, कपडे दान करावे.

२. रोज सकाळी अनवाणी पायांनी गवता वरती चालावे.

19. आपल्या पतीला वश करण्यासाठी:
हा प्रयोग शुक्ल पक्षमध्ये करावा. एक खाण्याचे पान घ्या. त्यावर केशर व चंदन पावडर मिक्स करून ठेवा. मग दुर्गा माता च्या फोटो समोर बसून दुर्गा माता स्तुति मधील चंडी स्त्रोत्र 43 दिवस म्हणावे. मग चँडी स्त्रोत वाचन झाल्यावर पानावरील चंदन व केशरचा तिलक आपल्या कपाळावर लावावा. मग आपल्या पती समोर जावे. जर पती जागेवर नसेलतर त्यांच्या फोटो समोर जावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पान रोज नवीन घ्या व ते फाटलेले नसावे. रोज पान बदललेकी ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. मग 43 दिवस झाल्यावर सर्व पान नदीत विसर्जित करावी.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.