Lal Kitab 10 Easy Simple Totke Or Upay Part-I In Marathi

Lal Kitab
10 Easy Simple Totke Or Upay From Lala Kitab

लाल किताब मधील सटीक सोपे घरगुती टोटके उपाय भाग 1 

माणूस म्हंटले की समस्या, पीडा, आर्थिक संकट, विवाह, आजारपण, नोकरी-व्यवसाय मधील परेशानी, मुलांचे प्रश्न, कोर्ट केस अश्या नानाविध प्रकारच्या समस्या आल्याच. पण आपण त्यामधून सुखरूप बाहेर पडू शकतो. त्यासाठी लाल किताब मधील काही सोपे व सरल टोटके आहेत. हे टोटके कोणी सुद्धा व्यक्ति अगदी सहज रित्या करू शकतो.

The Lal Kitab 10 Easy Simple Totke Or Upay Part-I In Marathi be seen on our You tube Chanel Lal Kitab 10 Easy Simple Totke Or Upay Part-I

लाल किताब म्हणजे काय?
आपण असे म्हणू शकता की लाल किताब म्हणजे एक रहस्यमय ज्ञान आहे. लाल किताब मध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत टे करून आपण आपल्या परेशानी दूर करू शकतो. त्याच बरोबर लाल किताब मध्ये आपल्या आचार संहिता बद्दल सुडजा छान माहिती दिली आहे. आपण जसे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते. लाल किताब मधील उपाय करण्यासाठी कोणी ज्योतिषी नको किंवा काही पूजापाठ करण्याची जरूरत नाही. आपल्या परेशानी ह्या आपल्या कुंडलीतील दशावर सुद्धा अवलंबून असतात.

आपण फक्त आपल्या दैनदीन जीवनात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिले म्हणजे खोटे बोलू नये. आपण एकदा खोटे बोललो तर आपल्याला एकाच गोष्टी साठी मग 4 वेळा खोटे बोलावे लागते. मग आपल्याला ती सवयच लागते. त्याच बरोबर आपण कोणत्यासुद्धा गोष्टी विषयी खोटी साक्ष देवू नका. आपल्या तोंडातून दुसऱ्या विषयी अपशब्द काढू नका. आपण निर्दयी बनू नका. देवावर विश्वास व श्रद्धा ठेवा. कधी सुद्धा व्याजाचा व्यवसाय करू नका. शाकाहारी रहा. दारू पिऊ नका, परस्त्रीशी संबंध ठेवू नका. लाल किताबमध्ये अजून अश्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

Lal Kitab
10 Easy Simple Totke Or Upay From Lala Kitab

आता आपण लाल किताब मधील काही सोपे घरगुती टोटके किंवा उपाय जे आहेत ते पाहू या.
1. आर्थिक समस्या पासून छुटकारा:
जर आपण नेहमी आर्थिक परेशानीमध्ये असाल तर 21 शुक्रवार 9 वर्षांच्या आतील कन्याना खीर व खडीसाखर प्रसाद म्हणून द्या.

2. घर व व्यवसायाचे ठिकाण येथे धनवर्षा साठी:
त्यासाठी आपण आपल्या घरात एक छोटेसे कारंजे किंवा फिश टॅंक ठेवा. व फिश टॅंकमध्ये 8 सोनेरी व एक काळ्या रंगाचा मासा ठेवा. जर कोणता मासा मेला तर दूसरा तसाच मासा फिश टॅंकमध्ये सोडा. फिश टॅंक उत्तर किंवा उत्तरपूर्व ह्या दिशेला ठेवावे.

3. परेशानीपासून मुक्ति मिळण्यासाठी:
आज काल सर्वजण काहीना काही समस्यानी परेशान आहात, समस्या कोणती सुद्धा असू दे त्यासाठी एक सोपा उपाय आहे. एका तांब्याच्या ताटात पाणी भरून त्यामध्ये थोडेसे लाल चंदन मिक्स करून रात्री झोपताना आपल्या उशाशी ठेवा व सकाळी उठल्यावर ते पाणी तुळशीला रोपाला घाला. असे रोज करा त्यामुळे आपल्या समस्या हळू हळू कमी होत जातील.

4. अविवाहित मुलीच्या लग्नात व्यत्यय:

१. जर अविवाहित मुलीच्या लग्नात व्यत्यय येत असेलतर 5 नारळ घेऊन शंकर भगवान ह्यांच्या फोटो किंवा मूर्तीच्या समोर ठेवून “ऊं श्रीं वर प्रदाय श्री नामः” ह्या मंत्राचा 5 माळा जाप करावा (1 माळ म्हणजे 108 वेळा व पाच माळा म्हणजे 540 वेळा) मग टे नारळ शंकर भगवान ह्यांच्या देवळात वहावे. त्यामुळे विवाहातील अडचणी आपोआप दूर होईल.

२. प्रत्येक सोमवार ह्या दिवशी मुलीने आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून शिवलिंग वर दूध व पाणी मिक्स करून अभिषेक करत ॐ सोमेश्वराय नमः” ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. जाप करताना रुद्राक्ष जाप माळ वापरावी. असे केल्याने लवकरच विवाह होऊ शकतो.

5. व्यवसायात प्रगती होण्यासाठी:

१. शुक्ल पक्ष मध्ये कोणत्या सुद्धा दिवशी आपल्या दुकान किंवा फॅक्टरीच्या दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला गव्हाचे पीठ ठेवा. पण गव्हाचे पीठ ठेवताना आपल्याला कोणी पाहात नाहीना ह्याची काळजी घ्या.

२. आपल्या पूजा घरामध्ये श्री यंत्र ठेवा:

३. शुक्र्वार ह्या दिवशी रात्री सव्वा किलो काळे चणे भिजत ठेवा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी सरसूच्या तेलात बनवून त्याचे तीन भाग करून पहिला हिस्सा घोडे किंवा म्हशीला खायला द्या. दूसरा भाग कुष्ट रोगीना खायला द्या. तिसरा हिस्सा आपल्या डोक्यावरून अॅंटी क्लॉक वाईज फिरवून कोणत्या सुद्धा चौकात ठेवून या. हा प्रयोग 40 दिवस करा. असे केल्याने आपल्या व्यवसायात नक्की प्रगती होईल.

6. अंगामद्धे सारखा ताप येत असेलतर:

१. जर कोणाला सारखा ताप येत असेल व कोणते सुद्धा औषध काम करीत नसेल रुईच्या झाडाचे मूळ एका कापडात घट्ट बांधून ते आजारी माणसाच्या कानाला बंधावे ताप निघून जाईन.

२. रविवार किंवा गुरुवार ह्या दिवशी साखर, दूध, तांदूळ व पेठा घेऊन आजारी माणसाच्या डोक्यावरून उतरवून कोणत्या सुद्धा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जेथे लंगर असेल तेथे दान करावे.

३. जर कोणला टायफाईड झाला असेलतर त्या माणसाला रोज एक शहाळे सेवन करायला द्यावे. त्यामुळे लवकरच बरे वाटेल.

7. नौकरी जाण्याची भीती किंवा ट्रांसफर थांबवायची असेलतर:

पांच ग्राम सुरमा (खडे) घेऊन सुनसान जागी पुरावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या अवजाराने आपण खडा करणार आहोत ते आवजार परत आणायचे नाही. ते तेथेच फेकून द्यायचे आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरमा हा पाच ग्राम पाहिजे म्हणजे पाच ग्राम चा एकच खडा पाहिजे. एका पेक्षा जास्त खडे नकोत.

8. व्यवसाया मध्ये नुकसान होत असेल व काम करण्याच्या ठिकाणी भांडण किंवा क्लेश होत असेलतर:
आपण आपल्या शरीराच्या वजनाचा कोळसा वजन करून नदीमध्ये सोडावा नक्की फायदा होईल.

9. कोर्ट केस जिकण्यासाठी:

जर आपली कोणाच्या विरुद्ध केस चालू असेल व आपल्याला ती जिकायची असेलतर कोर्टमध्ये जाताना थोडेसे तांदूळ घेऊन जा व ते तांदूळ कोर्टरूममध्ये कोठे सुद्धा फेकून द्या. पान लक्षात ठेवा आपण तांदूळ घेऊन जाताना किंवा तेथे फेकताना कोणी सुद्धा पाहिले नाही पाहिजे तरच त्याचा फायदा होईल. आपल्याला हा उपाय कोणाला सुद्धा ण कळता करायचा आहे.

10. धन कसे आपण साठून ठेऊ शकतो:

आपण महिनाभर कष्ट करून पैसा कमवता व तो पैसा जमा ण होता त्याच्या पेक्षा जास्त खर्च होत असेल व तो साठत नसेलतर एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील पाण्याचा नळ नक्की गळत असेल ते पहावे किंवा अजून एक लक्षात ठेवा की विस्तवावर ठेवलेले दूध किंवा चहा उकळला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या पगारा पेक्षा जास्त खर्च होत असेल असे समजावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.