7 सटीक लौंग व कपूरचे उपाय टोटके सुख समृद्धी साठी करून पहा नक्की प्रत्यय येईल
तसे पहिले तर आपण लवंगचा वापर मसाला बनवण्यासाठी किंवा स्वयंपाक करताना करतो. पण त्याचे धार्मिक महत्व सुद्धा खूप आहे. त्याच बरोबर ज्योतिषशास्त्र मध्ये सुद्धा त्याचे महत्व आहे. तसेच त्याच बरोबर आपली किस्मत बदलण्यासाठी त्याचा वापर सुद्धा केला जातो. तसेच आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रयोग केला जातो. लवंगचा वापर टोटके करण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो.
लवंगचा उपयोग आपण आपल्या घरातील पूजापाठ व अजून काही कामासाठी करतो. हेच लवंग आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याच्या बरोबर अजून काही बरेच फायदे सुद्धा आहेत. लवंगच्या फायद्या बद्दल आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे. आता आपल्याला लवंगचे अजून काय काय चमत्कारी फायदे आहेत जे आपण कधी आईकले नसतील ते येथे सांगणार आहोत.
आर्थिक परेशानी दूर करण्यासाठी लवंग. जर खूप मेहनत करून सुद्धा आपल्याला त्याचे चीज मिळत नसेल तर अश्या प्रकारचे टोटके करून पहा.
The 7 Amazing Totkas of Burning Cloves and Camphor at Home can be seen on our YouTube Channel 7 Amazing Totkas of Burning Cloves and Camphor at Home
लौंग व कपूर चे उपाय टोटके:
1) ज्या लोकांचे राहू-केतू बरोबर नाहीत त्या लोकानी शनिवारी लवंग दान केले पाहिजे किंवा शिवलिंग वर लवंग अर्पित करायला पाहिजे. असे काही दिवस केलेतर राहू-केतूचा प्रभाव कमी होतो.
2) जर आपण कोणाला काही रक्कम उधार दिली आहे व ती व्यक्ति परत रिटर्न करत नसेल तर पूर्णिमा किंवा अमावस्या च्या दिवशी 11 किंवा 21 लवंग व कपूर बरोबर जाळावे व माता लक्ष्मीचे ध्यान करताना आपले पैसे परत मिळण्यासाठी प्रार्थना करावी आपले पैसे नक्की मिळतीत.
3) जेव्हा आपण कुठे इंटरव्ह्युला जाणार असाल तेव्हा जाताना 2 लवंग तोंडात दाबून ठेवावी मग तेथे गेल्यावर काढून फेकून द्यावी व देवाचे नाव घेत इंटरव्ह्यु द्यावा. आपल्याला नोकरी मिळण्याची संभावना वाढेल.
4) आपला कोणी दुश्मन असेल तर त्याच्या पासून मुक्ती मिळण्यासाठी: कधी कधी आपल्या मनात काही नसतानासुद्धा आपले कोणी दुश्मन होतात. अश्या पासून छुटकारा मिळण्यासाठी लवंगचा टोटका उपयुक्त आहे. त्यासाठी आपल्याला मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवसी संध्याकाळी 7 वेळा बजरंग बाण ह्याचे वाचन करावे. मग हनुमानजिच्या समोर 5 लवंग व कपूर जाळावे. लवंग जळल्यावर त्याची राख आपल्या कपाळावर लावावी असे केल्याने आपल्या दुश्मन कडून आपल्याला छुटकारा मिळू शकेल.
5) धन लाभसाठी: कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजीच्या समोर मोहरीच्या तेलामध्ये लवंग टाकून त्या दिव्यानि आरती करावी. असे म्हणतात की असे केल्याने धनलाभ होऊन आर्थिक समस्या दूर होतात.
6) बिघडलेली कामे नीट होतात: जर आपले कोणते काम बिघडले असेलतर त्यासाठी लवंगचा टोटका करावा. टोटका करण्यासाठी एक लिंबू घेऊन त्यामध्ये चार लवंग टोंचावी मग त्यानंतर 31 वेळा ॐ श्री हनुमते नम: हा मंत्र बोलावा. मग आपण जेथे जाऊ तेव्हा ते लिंबू आपल्या सोबत ठेवावे. त्यामुळे आपले बिघडलेले काम पूर्ण होईल.
7) घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असेल तर हा टोटका जरूर करावा. एक पणती घेऊन त्यामध्ये दोन लवंग व दोन कपूरच्या वड्या घेऊन त्या जाळायच्या आहेत. मग ती पणती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला ठेवावी. कपूर व लवंग पूर्ण जळल्यावर ती राख आपल्या घरात शिंपडावी त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा येईल असे आपल्याला 11 दिवस संध्याकाळी 7 वाजून 27 मिनिट ह्या वेळेसच करायचे आहे. 11 दिवस हा टोटका केल्यानंतर पणती आपण पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवून द्यायची आहे.
Disclaimer: हे टोटके आम्ही फक्त माहिती करिता देत आहोत त्याची गॅरंटी देत नाही.