Tasty Healthy Cream of Broccoli Soup Recipe in Marathi

Healthy Broccoli soup
Tasty Nutrition Cream of Broccoli Soup

सूप हा पदार्थ सर्वाना आवडतो. आपण रात्रीच्या जेवणामद्धे सूप व व हलका एखादा पदार्थ बनवू शकतो. ब्रोकोली सूप बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. तसेच ते टेस्टी सुद्धा लागते. आपण ब्रोकोली सूप ही क्रीम व दूध वापरुन बनवू शकतो. म्हणजेच क्रीम ऑफ ब्रोकोली सूप होय.

ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.

The Marathi language video Healthy Cream of Broccoli Soup in Marathi can of be seen on our YouTube Channel of Nutrition Cream of Broccoli Soup

ब्रोकोली हृदय रोगासाठी गुणकारी, कॅन्सर होण्यापासून बचाव, रोग प्रतिकार शक्ति वाढते, आपला मूड चांगला राहतो, गर्भावस्थामध्ये खूप फायदेशीर, वजन कमी करण्यास मदत, लिवरच्या आरोग्यासाठी ब्रोकोली, दात व हाड ह्याचे आरोग्य चांगले राहते, ब्रोकली पासून आपल्या शरीराची पचन शक्ति वाढते, डायबीटीससाठी उपयोगी, स्कीनसाठी उपयोगी, केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी

साहीत्य:
1 कप ब्रोकोली (तुकडे किंवा तुरे)
1 टे स्पून बटर किंवा तूप
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
¼ टी स्पून लसूण (चिरून)
1 टे स्पून मैदा
2 कप व्हेजिटेबल स्टॉक
½ कप दूध
1 टे स्पून क्रीम
मीठ चवीने
मिरे पावडर चवीने

Healthy Broccoli soup
Tasty Nutrition Cream of Broccoli Soup

कृती: प्रथम एका भांड्यात 3-4 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये ब्रोकोलीचे तुरे घालून 5 मिनिट तसेच ठेवा. व्हेजिटेबल स्टॉक बनवून घ्या. कांदा लसूण चिरून घ्या.

एका पॅनमध्ये बटर किंवा तूप गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा व लसूण घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये मैदा घालून परतून घ्या. गरम पाण्यात घातलेली ब्रोकोली काढून पॅन मध्ये घालून थोडी परतून घ्या. मग त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेऊन 5-7 मिनिट मंद विस्तवावर ब्रोकोली शिजवून घ्या. थंड झाल्यावर पाणी गाळून घेऊन बाजूला ठेवा. ब्रोकोली मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्या.

ब्रोकोलीचे वाटलेले मिश्रण परत पॅनमध्ये घेऊन त्यामध्ये दूध घालून चांगली उकळी आणा. उकळी आल्यावर त्यामध्ये चवीने मीठ व मिरे पावडर घालून फ्रेश क्रीम घालून मिक्स करून 2 मिनिट गरम करून घ्या.

गरम गरम क्रीम ऑफ ब्रोकोली सूप सर्व्ह करा. सर्व्ह करताना ब्रोकोलीच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.