Dark Chocolate Benefits Advantages And Disadvantages In Marathi

Health Benefit Dark Chocolate
Dark Chocolate Benefits for Heart, Skin, Blood Sugar, Cholesterol Eyes

घरच्या घरी चॉकलेट बनवा ते कसे लिंक वर क्लिक करा: Making Homemade Chocolates Marathi Recipe

चॉकलेट हा शब्द जरी आईकला तरी आपले मन प्रसन्न होऊन आपला चेहरा एकदम खुलून येतो. लहान मुले असो किंवा मोठी माणसे असो सर्व जणांना चॉकलेट आवडते. जर कोणाचा राग किंवा नाराजी दूर करायची असेल किंवा किंवा कोणाला खुश करायचे असेल तर चॉकलेट देवून त्यांना खुश करणे अगदी सोपे आहे. पूर्वीच्या काळी चॉकलेटचे अगदी बोटावर मोजण्या इतके प्रकार असायचे पण आता बाजारात आपल्याला नानाविध प्रकार पाहायला मिळतात. आता आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने नानाविध प्रकारचे चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेट बनवताना आपल्याला बाजारात तीन प्रकारचे बेस मिळतात. मिल्क कंपाऊंड, व्हाइट कंपाऊंड व डार्क कंपाऊंड असे तीन प्रकारचे बेस मिळतात. पण ह्यामध्ये डार्क कंपाऊंड अगदी मस्त लागते व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितवाह सुद्धा आहे. कारण ह्यामध्ये साखर नसते ते कोका पासून बनवलेले असते.

The Marathi language video Dark Chocolate Health Benefits and Losses in Marathi can of be seen on our YouTube Channel of Dark Chocolate Advantage And Disadvantage

डार्क चॉकलेट खूप लोकप्रिय आहे. डार्क चॉकलेट हे कोको बिन्स पासून बनवतात डार्क चॉकलेट मध्ये कोको, कोको बटर व साखर असते. त्यामध्ये आयर्न, कॉपर , जिंक, असे पोषक तत्व आहेत. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. आता आपण त्याचे आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत ते पाहू या.

Health Benefit Dark Chocolate
Dark Chocolate Benefits for Heart, Skin, Blood Sugar, Cholesterol Eyes

डार्क चॉकलेटचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे
डार्क चॉकलेट चे फायदे अनेक आहेत पण त्यातील काही महत्वाचे फायदे आपण पाहणार आहोत.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
अगदी योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट आपण सेवन केले तर ते आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. डार्क चॉकलेटमध्ये फ्लैवनॉल नावाचे तत्व आहे त्याच्या मुळे एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसेच त्याच बरोबर ब्लड प्रेशर नियमित राहते. कोलेस्ट्रॉल व ब्लड प्रेशर ही दोन्ही ह्रदयासाठी हानिकारक आहे. ते डार्क चॉकलेटच्या सेवनाने योग्य राहते.

डिप्रेशन व टेंशनसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर :
आज कालच्या स्पर्धेच्या जगात प्रतेक जण खूप टेंशनमध्ये जगत आहे त्याच्या परिणाम म्हणजे मग डिप्रेशन येते. त्यामुळे प्रतेकांचे मूड बदलतात, उदासीनता येते, चिडचिडे पणा येतो तर अश्या समस्यापासून आराम मिळण्यासाठी डार्क चॉकलेट सेवन करावे. डार्क चॉकलेटच्या सेवनाने डिप्रेशन च्या लक्षणात सुधार होऊ शकतो. महिलांसाठी डार्क चॉकलेट ही तनाव कमी करण्यास मदत करते. चॉकलेट पहिलेकी आपला मूड लगेच बदलतो.

कोलेस्ट्रॉलसाठी डार्क चॉकलेट फायदेमंद:
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. डार्क चॉकलेटमध्ये कोको पॉलीफेनोल्सचे तत्व आहे त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL Cholesterol) मध्ये वृद्धी होते. तसेच हृदयाचे आरोग्य व ब्लड प्रेशर योग्य राहते.

एंटीऑक्सीडेंटचे गुण:
आपल्या शरीराला रोगांपासून दूर ठेवायला मदत होते व आपले शरीर स्वस्थ राहते. जसे फळ व भाज्यामद्धे एंटीऑक्सीडेंट हा गुण असतो तसेच डार्क चॉकलेट मध्ये सुद्धा हा गुणधर्म आहे. कोकोमद्धे जास्त प्रमाणात एंटीऑक्सीडेंट गुण आहे.

सर्दी-ताप ह्यावर गुणकारी डार्क चॉकलेट:
सीझनमध्ये बदल झालकी आपल्या शरीराला छोट्या छोट्या कुरबुरी चालू होतात. त्यामध्येच सर्दी ताप येतो. त्यापासून आपल्याला वाचवायचे असेल तर डार्क चॉकलेटचे सेवन करावे. डार्क चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन (Theobromine) ही तत्व आहे. जो श्वसनाच्या संबंधीत काम करते. यामध्ये सर्दी-ताप सुद्धा आहे.

डोके शांत ठेवते:
डार्क चॉकलेट शरीराच्या आरोग्याच्या बरोबर डोके सुद्धा शांत ठेवते. तसेच आपली स्मरणशक्ति सुद्धा वाढते.

ब्लड प्रेशरसाठी उपयोगी:
डार्क चॉकलेट ब्लड प्रेशरला योग्य ठेवते. ज्याना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी डार्क चॉकलेट सेवन करावे. पण त्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्या.

कॅन्सरवरती लाभदायक:
कॅन्सर हा रोग अगदी गंभीर रोग आहे. डार्क चॉकलेट हा कॅन्सर वर उपयोगी नाही पण कॅन्सर होऊ नये म्हणून डार्क चॉकलेट सेवन करावे. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होत नाहीत

डोळ्याचे आरोग्य चांगले राहते:
डार्क चॉकलेट ही डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते असे म्हणतात की डार्क चॉकलेटचे सेवन केल्यावर दोन तासांनी डोळ्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते.

डायबीटीसच्या साठी शुगर फ्री डार्क चॉकलेट:
काही जणांच्या मते डार्क चॉकलेटच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. त्यामध्ये असणारे कोको ए त्यातील एंटी आक्सिडेंट गुण इंसुलिनला प्रतिरोध करते. व ब्लड शुगरचा स्तर कमी करते

शरीराचे वजन योग्य ठेवते :
डार्क चॉकलेटच्या सेवनाने वजन योग्य राहते. त्यामुळे पचनशक्ति चांगली होते व पोटाचे आरोग्य चांगले राहते. पण जास्त प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन म्हणजे वजन सुद्धा वाढू शकते.

डार्क चॉकलेट सेवनाचे तोटे किंवा नुकसान:
डार्क चॉकलेटमध्ये कैफीनची मात्रा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे डार्क चॉकलेटचे अति सेवन केल्याने त्याचे काय तोटे होतात ते पाहू या.
अनिद्रा, डोके दुखी किंवा माइग्रेन, चक्कर येणे, डिहाइड्रेशन होऊ शकते, चिंता, वजन वाढू शकते, हृदयाचे ठोके वाढू शकतात, पिंपल्स येऊ शकतात, छातीत जळजळ होऊ शकते त्यामुळे डार्क चॉकलेट प्रमाणात खाणे योग्य आहे.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.