Amazing Tips For Glowing Skin And Beauty In Marathi

Amazing Tips For Glowing Skin And Beauty For Girls and boys
Amazing Tips For Glowing Skin And Beauty For all

अमेझिंग घरगुती टिप्स आपली स्कीन व सौंदर्य वाढवण्यासाठी
Amazing Tips For Glowing Skin And Beauty In Marathi

आपण शाळा, कॉलेज, क्लास, नोकरीच्या निमित्ताने किंवा कामा निमित्ताने घरा बाहेर पडतो. घरच्या बाहेर पडल्यावर आपल्याला हवेतील दुषीत घटकाचा व प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होत असतो. मग आपली त्वचा नसतेज व कोरडी होते. त्यासाठी आपण अगदी महागडी केमिकल युक्त सौंदर्य प्र्साधणे वापरतो. त्यामुळे आपल्या त्वचेला अजून इजा होते. अश्या समस्यासाठी आपण घरगुती सहज व सोपे उपाय करू शकतो. व त्याचे दूरगामी चांगलेच परीणाम होतात व आपण अश्या प्रकारच्या सामस्या मधून बाहेर पडतो.

नितळ त्वचा, उजळलेला किंवा चमकदार चेहरा सर्वांना हवा असतो. पण ते सोपे पण नाही. प्रदूषण व धूळमाती च्या कारणाने चेहरा अगदी निस्तेज होतो. मग त्यावर मुरूम, पुटकुळया, डाग, टैनिंग व सुरकुत्या पडून आपला चेहरा अगदी खराब होतो.

आपली त्वचा सुंदर, नितळ, मुलायम होण्याकरीता काही खाली उपाय किंवा उपयोगी ब्यूटी टिप्स आहेत.

कच्चा आलू म्हणजेच कच्चा बटाटा:
कच्चा बटाटा घेवून सोलून थोडा त्याचा भाग कापून घ्या व त्या बटाटानी आपल्या चेहर्‍यावर घासून स्क्रब करा मग दुसर्‍या दिवशी कच्चे दूध त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचे वरील डाग हलके होतील. किसलेली काकडी त्वचेवर लावल्यास त्वचेचे क्लींजिंग व टोनिंग करता येते.

नारळाचे पाणी:
त्वचेवरील डाग काढण्यासाठी नारळाचे पाणी खूप उपयुक्त आहे. नाराळच्या पाण्यात एक चमचा मध घालून मिक्स करून ते पाणी आइस ट्रेमध्ये घालून त्याचा बर्फ जमा झाल्यावर रोज एक बर्फाचा क्युब घेवून हलक्या हातानी चेहर्‍यावर मसाज करा. 10 मिनिट झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे थोडे दिवस रिज करा. नारळाच्या पाण्यात कैराटिन असते ते नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.

Amazing Tips For Glowing Skin And Beauty For Girls and boys
Amazing Tips For Glowing Skin And Beauty For all

लिंबू हे खूप फायदेमंद आहेत
लिंबूहे आपल्या शरीरासाठी वरदानच आहे. लिंबू हे फक्त हेल्थ साठीच नाहीतर आपल्या ब्युटीसाठी पण खूप फायदेमंद आहे. रिकाम्यापोटी लिंबू पाणी, मध व पाणी सेवन केले तर आपले मेटाबॉलिजम ठीक राहते. तसेच लिंबू आपल्या त्वचेवर लावल्यास आपली स्कीन दागरहित सॉफ्ट बनते व आपली त्वचा उजळते.

लिंबामद्धे सर्वात मीठा गुण म्हणजे ऐंटी-एजिंग म्हणजेच ते आपले वय लपवते

लिंबामद्धे महत्वाचा गुण म्हणजे
लिंबू मध्ये ऐंटी-एजिंग अल्फा हाइड्रॉक्सी एसिड्स आहे त्यामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत व त्याच बरोबर आपल्या त्वचे रंग सुद्धा उजळतो. लिंबाला ऐंटी-एजिंग एजेंट सुद्धा म्हणतात. आता आपण आपली सुंदरता चमकदार दिसण्यासाठी लिंबाचा कसा उपयोग करायचा.

सॉफ्ट स्कीन असणार्‍यासाठी लिंबाचा कसा उपयोग करायचा.
लांबचा रस व मध मिक्स करून आपल्या स्कीनवर लावावा त्यामुळे स्कीन सॉफ्ट राहून छान चकाकी येईल.

लिंबूचा स्क्रब कसा बनवायचा
लिंबूरस, साखर, नाराळचे तेल व ऑलिव ऑइल मिक्स करून त्याचा स्क्रब तयार करून शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेवर लगेच त्याचा चांगला परीणाम दिसू लागतो.

लिंबाचा उपयोग थंडीच्या दिवसात फायदेमंद आहे
थंडीमध्ये लिंबुरस, गुलाब पाणी व ग्लिसरीनचे मिश्रण तयार करून लावावे त्यामुळे त्याच्यामुळे बर्‍याच समस्यापासून आपल्याला फायदा होतो. स्कीनवर चकाकी येवून स्कीन कोरडी होत नाही.

लिंबू वापरताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे
लिंबूहे एसिडिक आहे त्यामुळे लिंबूरस डायरेक्ट आपल्या स्कीनवर लावू नये. ते डायलूट करण्यासाठी गुलबजल म्हणजेच गुलाबपाणी वापरावे. किंवा मध व ग्लिसरीन मिक्स करूनच वापरावे. तसेच आपल्या स्कीनवर लिंबाचे मिश्रण लावल्यावर लगेच उन्हात जाऊ नये.

लिंबाचा फेस पैक कसा बनवायचा
लिंबूरसामध्ये पोपई, ऐलोवेरा व काकडीची पेस्ट बनवून मिश्रण तयार करा व आपल्या चेहर्‍यावरा लावा त्यामुळे स्कीन वरील दाग-धब्बे कमी होतील.

नारळाचे तेल व कपूर
धूळ माती व प्रदूषणच्या कारणांनी त्वचेवर दाने किंवा किल मुहासे येतात. नारळाच्या तेलात एक कपूरची वडी मिक्स करून घ्या. कपूर पूर्ण विरघळला पाहिजे. मग बनवलेले मिश्रण हलक्या हातांनी आपल्या चेहर्‍यावर लावावे. मग 10 मिनिट झाल्यावर थंड पाण्याने धुवावे. कच्च्या दुधानी रोज सकाळी आपला चेहरा स्वच्छ साफ करावा त्यांनी चेहर्‍या वरील डाग दूर होतात. हा उपाय एक महिना एक दिवसआड करावा.

मलाई व हल्दी हळद
एक चमचा दुधाची मलई व एक चिमुट हळद व 1/4 चमचा गुलाबजल मिक्स करून त्याचा मिश्रण बनवून आपल्या चेहर्‍यावर लावावे व गोलाकार पद्धतीने हलक्या हातांनी मसाज करावा. मग थोडावेळ तसेच ठेवावे. 2ओ मिनिट झाल्यावर कोमट पाण्यांनी चेहरा धुवावा. असे दोन महीने रोज करावे त्यामुळे आपली स्कीन साफ हौऊन डाग सुद्धा निघून जातील.

The Video of this text can be seen here : Amazing Tips For Glowing Skin And Beauty

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.