Simple Tips to Make Basic Cake In Marathi

Tips to Make Basic Cake
Simple Tips to Make Basic Cake

क्रीसमस स्पेशल साधा सोपा बेसिक केक व केक चांगला बनवण्यासाठी काही टिप्स

केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी वापरावी तसेच ओव्हन नीट चालतो की नाही ते बघावे.

केक करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या:
केक बनवताना आपल्याला जे साहीत्य लागते ते प्रमाण बद्ध म्हणजे बरोबर मोजून घ्यावे.
केक बनवण्याच्या आगोदर ओव्हन नीट चालतो का ते चालू करून बघावे. केक ओव्हनमध्ये ठेवण्या आगोदर ओव्हन गरम करून घ्या मगच भांडे आत ठेवा.
केक बनवताना मैदा ताजा व चांगल्या प्रतीचा वापरा.
केक बनवताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधी थोडा वेळ बाजूला काढून ठेवा. अंडी वापरताना चांगली फेटून घ्या.
केकचे मिश्रण बनवण्या अगोदर भांड्याला लोणी लावून ठेवा.

केक न फुगण्याची काही महत्वाची कारणे:
केकचे मिश्रण चांगले फेसले गेलेले नसल्यास
ओव्हन नीट गरम झाला नसल्यास किंवा व्होलटेज पुरेसे नसल्यास
साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यावर परत चपटा होतो.
बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जुना वापरल्यास किंवा दिलेल्या प्रमाणा पेक्षा बेकिंग पावडर जास्त झाल्यास केक फुगत नाही.

केक बनवताना लोणी घरगुती अथवा बाजारातील पांढरे लोणी वापरावे. जर पूर्ण लोणी वापरणे शक्य नसेल तर अर्धे लोणी व अर्धे डालडा वापरावे. केक बनवतांना साजूक तूप वापरू नये. लोण्या आयवजी मार्गारीन किंवा वनस्पती तूप वापरावे.

बेसिक केक कसा बनवावा
साहीत्य:
8 टे स्पून मैदा
7 टे स्पून पिठी साखर
6 टे स्पून डालडा अथवा लोणी
2 अंडी
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/4 कप दूध

Tips to Make Basic Cake
Simple Tips to Make Basic Cake

कृती:
प्रथम केक ज्या भांड्यात बनवायचा आहे त्या भांड्याला लोणी लावून त्यावर मैदा भुर भुरुन ठेवावा.
मैदा व बेकिंग पावडर चालून घ्या. साखर मिक्सर मधून बारीक करून घ्या.
अंडी फोडून काटे चमचानी अथवा एग बिटरनी चांगली फेटून घ्या. ओव्हन गरम करायला ठेवा.
लोणी व पिठी साखर चांगली फेसून घ्या. लोणी व पिठी साखर आपण जेव्हडी फेसू तेव्हडा केक हलका होतो.
मग लोणी व साखर फेसलेल्या मिश्रणात हळू हळू मैदा व फेटलेले अंडे घालून चांगले फेसून घ्या. मिश्रण चांगले फेसून झाल्यावर त्यामध्ये व्हनीला एसेन्स व दूध घालून मिश्रण एक सारखे करून लोणी लावलेल्या केकच्या भांड्यात ओता.
ओव्हन आगोदरच गरम करून घ्या व लगेच केकचे भांडे ओव्हनमध्ये ठेवा. ओव्हन वेळे नुसार सेट करून चालू करा.
केकचा रंग गोल्डन ब्राऊन आला की वीणायच्या सुईने चेक करा सुई काढलीकी कोरडी दिसली पाहीजे म्हणजे केक झाला असे समजावे. केक झाला की लगेच बाहेर काढावा व थंड झाल्यावर कापावा.

टीप:
समजा काही कारणा मुळे केक लगेच बेक करता आला नाही तर मिश्रण बेकिंग पावडर न घालता काही वेळ तसेच ठेवावे मग ओव्हन मध्ये केक ठेवताना बेकिंग पावडर घालून मग केक ओव्हनमध्ये ठेवावा.

Zatpat Easy Eggless Custard Cake in Pressure Cooker
Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes
Gajar Ka Cake Eggless Wheat Flour Carrot Cake in Pressure Cooker
Easy Eggless Marie Biscuit Cake In Pan For Kids
Eggless Choco Lava Cake in Idli Stand
Healthy Eggless Wheat Flour Cake
Delicious Chocolate Walnut Cake
Tasty Strawberry Marble Cake
Super Lemonade Cake
How to Make Surprise Cake in 5 Minutes
Eggless Tutti Frutti Cake without Butter in Pressure Cooker
Make Cake in Tea Mug in Microwave in 2 Minutes

The video in Marathi of this article can be seen here – Tips for Making Basic Cake at home

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.