Makhana Kaju Curry Recipe in Marathi

मखाने-काजू करी अथवा ग्रेव्ही: मखाने काजू करी ही आपण उपवासासाठी सुद्धा बनवू शकतो. ही करी बनवताना काजू, खसखस , डेसिकेटेड कोकनट, व दुध वापरले आहे. मखाने मध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-1, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्याच्या मुळे ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. ह्या ग्रेव्ही मध्ये काजू जास्त प्रमाणात वापरले आहेत त्यामुळे अश्या प्रकारची करी अथवा ग्रेव्ही पौस्टिक तर आहेच.

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जनासाठी

साहित्य:
१ कप मखाने
१/४ कप काजू
१ टे स्पून फ्रेश क्रीम
२ टे स्पून तूप
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी

ग्रेव्ही साठी:
१/२ कप काजू
१/४ कप खसखस
१/२ कप दुध
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट
२ हिरव्या मिरच्या

फोडणी करीता:
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे

Makhana Kaju Curry

माखणे काजू करी

कृती:
प्रथम काजू, खसखस, डेसिकेटेड कोकनट व दुध १ तास भिजत ठेवा. मग त्यामध्ये हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये काजू गुलाबी रंगावर तळून घेवून बाजूला ठेवा. मग त्यामध्ये मखाने घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर परतून घेवून बाजूला ठेवा.

मग त्याच कढईमधे तूप गरम करून जिरे घालून काजूची पेस्ट घालून तेल सुटे परंत परतून घ्या. मग त्यामध्ये धने पावडर, मीठ, मखाने, काजू घालून १ कप पाणी घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घ्या.

मखाने काजू करी उपवासाच्या डोश्या बरोबर गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना कोथंबीरे चिरून घाला.

About Sujata Nerurkar (2167 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*