Categories
Recipes in Marathi Sweets Recipes

Delicious Rice Payasam Recipe in Marathi

पायसम: पायसम ही एक आंध्रप्रदेश व कर्नाटक मधील लोकप्रिय डीश आहे. पायसम ही डीश आंध्रप्रदेश व कर्नाटकमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी बनवतात. आपण ही डीश स्वीटडीश म्हणून सुद्धा बनवु शकतो. पायसम बनवतात तांदूळ किंवा शेवया वापरून बनवतात.

The English language version of the Payasam recipe can be seen here – Sweet and Delicious Rice Payasam

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
५०० मिली लिटर दुध
२ टे स्पून तांदूळ
१/४ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
३ टे स्पून शहाळेचे ओले खोबरे (मलई)

 Rice Payasam
Delicious Rice Payasam

कृती: एका जाड बुडाच्या पसरट भांड्यात दुध गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून मंद विस्तवावर शिजत ठेवा.
तांदूळ चांगले शिजल्यावर त्यामध्ये साखर व वेलचीपूड घालून पाच मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मग विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून थंड करायला ठेवा. शहाळ्याच्या मलईच्या पातळ उभे तुकडे करून त्यामध्ये मिक्स करा.
पायसम थंड झाल्यावर ड्रायफ्रुटने सजवून सर्व्ह करा.

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *