टेस्टी शिमला मिर्च सलाड: शिमला मिर्च सलाड हे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. अश्या प्रकारचे सलाड पौस्टिक आहे कारण की ह्यामध्ये खसखस, तीळ, सुके खोबरे, शेगदाणे कुट वापरला आहे.
The English language version of the recipe and preparation method of this Shimla Mirch Salad can be seen here- Spicy Shimla Mirch Salad
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मोठ्या शिमला मिर्च
२ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून खसखस
२ टे स्पून सुके खोबरे (किसून)
२ टे स्पून तीळ
२ टे स्पून शेगदाणे कुट
मीठ चवीने
फोडणी करीता
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
![Shimla Mirch Salad](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2016/08/Shimlamirch-Salad-300x225.jpg)
साहित्य:
शिमला मिर्च धुवून मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे कापून घ्या. खसखस, तीळ व किसलेले खोबरे थोडेसे भाजून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची, चिरलेली शिमला मिर्च घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेऊन मंद विस्तवावर पाच मिनिट शिमला मिर्च शिजू द्यावी. मग त्यामध्ये खसखस, तीळ, खोबरे, शेगदाणे कुट घालून मिक्स करून घ्या. चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.