मँगो पनीर कटलेट: आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे अनेक प्रकार बनवता येतात. आपण आंब्यापासून मिल्कशेक, करंजी, मोदक, आईसक्रिम बनवतो. आंबा हा सर्व जणांना आवडतो. तसेच पनीर सुद्धा सर्वाना आवडते. पनीर व आंबा वापरून कटलेट बनवता येतात व ते चवीला उत्कृष्ट लागतात. मँगो पनीर कटलेट हे नाश्त्याला बनवू शकतो. कटलेट बनवतांना फुटणा डाळीचे पीठ वापरले आहे त्यामुळे कटलेट फुटत नाहीत व छान कुरकुरीत होतात.
The English language version of this Mango Cutlet preparation meth can be seen here – Delicious Mango Paneer Cutlets
मँगो पनीर कटलेट बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ कटलेट बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
२ मोठ्या आकाराचे बटाटे (किंवा ४ मध्यम आकाराचे बटाटे)
२ टे स्पून फुटणा डाळ पीठ
मिरे पावडर व मीठ चवीने
सारणासाठी:
१ कप आंब्याचे तुकडे
१/२ कप पनीरचे तुकडे
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टे स्पून काजू- बदाम तुकडे
८-१० पुदिना पाने (चिरून)
मिरे पावडर व मीठ चवीने
४ टोस्ट (पावडर करून) एछिक
तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मग त्यामध्ये फुटणा डाळीचे पीठ, मिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून त्याचे एकसारखे आठ गोळे बनवा.
सारणासाठी: आंब्याचे तुकडे, पनीरचे तुकडे, हिरवी मिरची, मिरे पावडर, पुदिनी पाने चिरून, मीठ घालून मिश्रण तयार करा व त्याचे एकसारखे आठ भाग बनवा.
कटलेट बनवण्यासाठी: एक बटाट्याचा गोळा घेवून त्यामध्ये आंब्याचे मिश्रण मिश्रण भरून गोळा चांगला बंद करा.
नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल गरम करून घ्या. बनवलेले कटलेट टोस्टच्या पावडर मध्ये घोळून मंद विस्तवावर शालो फ्राय करा तसेच हे कटलेट डीप फ्राय केले तरी छान लागतात.
गरम गरम आंबा पनीर कटलेट सर्व्ह करा.