Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi

Potato Sev for Diwali
Batata Sev for Diwali

बटाटा शेव : दिवाळी फराळ किंवा दीपावली फराळ म्हंटले करंजी, लाडू, चिवडा, अनारसे, चकली होय. पण शेव फराळात तर पाहिजेच त्याशिवाय मजाच नाही. बटाटा शेव ही चवीला फार स्वादिस्ट लागते. बनवायला तर खूप सोपी आहे. व झटपट होणारी आहे. मुलांना तर ही शेव खूप आवडते. आपण नेहमीच साधी शेव, टोमाटो शेव, लसूण शेव, पुदिना शेव बनवतो. आलू शेव बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल.

Batata Sev – बटाटा शेव बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य :
१ कप उकडलेल्या बटाट्याचा कीस (२ मध्यम आकाराचे बटाटे)
१ कप चनाडाळ पीठ (बेसन)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून तेल (गरम)
२ लवंगा (पावडर करून)
मीठ चवीने
तेल शेव तळण्यासाठी

Potato Sev for Diwali
Batata Sev for Diwali

कृती :

प्रथम बेसन चाळणीने दोन वेळा चाळून घ्या.
बटाटे उकडून सोलून १५ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याची साले काढून किसून अगदी लगदा बनवा (गुठळ्या रहाता कामानये.
बटाट्यामध्ये बेसन, लाल मिरची पावडर, लवंगा पावडर, मीठ व गरम तेल घालून चांगले मिक्स करून पीठ मळून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून गरम तेलातच सोरयानी शेव घाला व दोनी बाजूनी शेव पिवळ्या रंगावर तळून घ्या.
शेव बनवून झाली की एका पेपरवर थंड करून मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

The English language version of the Aloo Sev-Bhujia is published in this – Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.