तळलेली कोलंबी (कोलंबी फ्राय) ही कोलंबी स्टार्टर म्हणून करता येते. भात व सोल कढी बरोबर खूप छान लागते. नुसती खायला पण छान लागते. कोकणी लोकांची ही आवडती डीश आहे. चुरचुरीत चान लागते.
साहित्य : १५-२० मोठ्या कोलंब्या, १/२ टी स्पून हळद, १ टी स्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीने, तळण्यासाठी तेल, तांदळाची पिठी
कृती : कोलंबी साफ करून काळा धागा काढून टाकावा व स्वच्छ धुवावी. हळद, मीठ व लाल मिरची पावडर एकत्र करून त्यावर भूरभूरावे व अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर एका वेळी ७-८ कोलंब्या तांदळाच्या पिठात घोळवाव्या व खोलगट तव्यावर कडेने तेल सोडून दोन्ही बाजूनी तळाव्यात. तळून झालेली कोलंबी तव्याच्या कडेला सरकवावी व मध्यभागी तळण्यासाठी पुन्हा दुसऱ्या घालाव्यात. यामुळे त्यातील जादा तेल निघून येते व कोलंबी चुरचुरीत राहते. ही फ्राय केलेली कोलंबी सोलाची कढी व भाता बरोबर सर्व्ह करावी.