रताळ्याची भाजी ही उपासासाठी बनवतात. रताळ्याची भाजी ही चवीला छान आंबटगोड अशी लागते. रताळ्यात कॅलशीयम, फॉसफरस, सोडीयम, लोह, जीवनसत्व ए असते. त्यामुळे ती पौस्टिक आहेत.
साहीत्य :
२ मध्यम आकाराची रताळी
३ हिरव्या मिरची (तुकडे करून)
१/२ चमचा जिरे
२ चमचे तूप
२ टे स्पून शेंगदाण्याचा कुट
२ टे स्पून नारळाचा किस
कोथींबीर
१ टी स्पून लिंबू रस
मीठ
कृती : रताळी उकडून सोलून त्याचे बारीक तुकडे करावे. कढई मध्ये तूप तापवून त्यात जिरे, हिरव्या मिरचाचे तुकडे, फोडणी देवून त्यात रताळ्याचे तुकडे टाकावे व बरेच परतावे. मधून मधून झाकण ठेवावे. तुकडे गुलाबी झाल्यावर शेंगदाण्याचा कुट, मीठ, लिंबू रस टाकून कोथींबीर टाकावी. ही भाजी आंबट- गोड अशी छान लागते.