Restaurant Style Eggless Mayonnaise Sauce Recipe in Marathi

अंड्या शिवाय रेस्टॉरंट स्ताईल मियोनीज सॉस: ह्या आगोदर घरच्या घरी आपण अंडे वापरून मियोनीज सॉस कसा बनवायचा ते बघितले. आता आपण अंडी न वापरता मियोनीज सॉस घरी कसा बनवायचा ते बघू या. ज्यांना अंडे खायचे नाही किंवा चालत नाही त्यांना मियोनीज सॉस हा खर म्हणजे वेस्टन युरोप मधील लोकप्रिय सॉस आहे. मियोनीज सॉस हा ब्रेड स्लाईसला लाऊन, व्हेजबर्गर किंवा चपातीला लाऊन तसेच रशियन सलाड किंवा फळे कापून त्यामध्ये वापरण्यासाठी उपयोगी आहे. मियोनीज सॉसची चव अगदी अप्रतीम लागते. लहान मुलांना मियोनीज सॉस वापरून वरील दिलेले पदार्थ देता येतील. तसेच नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा देता येतील.

The English language version of the same Eggless Mayonnaise Sauce recipe and preparation method can be seen here – Restaurant Style Eggless Mayonnaise Sauce

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३/४ कप सॉस बनतो

साहित्य:
२ कप दुध (गाईचे)
३/४ कप दही
४ टे स्पून मोहरीचे तेल
साखर व मीठ चवीने
१ टी स्पून मिरे पावडर (ताजी थोडीशी जाडसर)
२ १/२ टे स्पून व्हेनीगर
२ टे स्पून पाणी

Homemade Mayonnaise Sauce Recipe

Restaurant Style Eggless Mayonnaise Sauce Recipe

कृती:
एका जाड बुडाच्या भांड्यात दुध गरम करून मग विस्तव मंद करून त्यामध्ये दही मिक्स करून घ्या. काही सेकंदात दुधाचा रंग बदलेल. मग विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या.
एका चाळणीवर स्वच्छ मोठा रुमाल घालून त्यावर दुधाचे मिश्रण ओतुन त्यावर फ्रीजचे थंड पाणी ओत. जास्तीचे पाणी काढून घ्या. आता पनीर तयार झाले.
मिक्सरच्या ब्लेंडर मध्ये तयार केलेले पनीर, मोहरीचे तेल, साखर व मीठ चवीने, मिरे पावडर , व्हेनीगर व दोन टे स्पून पाणी घालून एक मिनिट ब्लेंड करून घ्या. मियोनीज सॉस तयार झाला.
मियोनीज सॉस ब्लेंड करून झाल्यावर त्याची चव बघून त्यामध्ये मीठ किंवा व्हेनीगर कमी असेल तर परत थोडे वापरू शकता.

About Sujata Nerurkar (1842 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*